तालुक्यातील सन. २०२५ ची. महिलांची नेतृत्व विकास कार्यशाळा.- एरंडोळ ता. आजरा येथे उत्साहात संपन्न
आजरा.- प्रतिनिधी.
एरंडोळ ता. आजरा येथे दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी welead अंतर्गत,कोकण विकास सोसायटी, पणजी व सामाजिक संवेदना संस्था, आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने, आजरा तालुक्यातील महिलांची नेतृत्व विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्षा एरंडोळ सरपंच सरिता पाटील यांनी “सावित्रीबाई फुले” यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
पाहुण्यांचे स्वागत ग्रामपंचायत एरंडोळ सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी केले. उपसरपंच भीमराव माधव यांनी एरंडोळ गावात welead ची महिलांच्या नेतृत्व विकास कार्यशाळा होत असल्याबद्दल आनंद होत असल्याचे सांगून, आपल्या गावची निवड केल्याबद्दल कोकण विकास सोसायटीचे धन्यवाद मानले.
कार्यक्रमाचा उद्देश, प्रस्तावना सामाजिक संवेदना संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश मोरुस्कर यांनी केले. आजरा तालुक्यातील पारपोली, पेरणोली, एरंडोळ ,हाळोली- मेंगडेवाडी, गवसे व कानोली या “महिला सरपंच ” असलेल्या ग्रामपंचायत कार्यक्रमामध्ये कोकण विकास सोसायटीच्या सहकार्याने महिलांच्या नेतृत्व विकास, कार्यक्षमता,सक्षमीकरण व बळकटीकरण यांच्या वाढीचा कार्यक्रम “तीन”वर्षे घेण्यात येणार आहे.यामध्ये पहिल्या टप्यात निवड केलेल्या प्रत्येक गावात ओळख,जागरूकता कार्यक्रम, महिला सरपंच, महिला सदस्य यांचे पंचायतराजविषयी प्रशिक्षण, पुरुष सदस्य व युवा वर्ग यांचेही प्रशिक्षण घेण्यात येईल.यशदा वा सगळ्यात चांगल्या संस्थांच्या प्रशिक्षकामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जेणेकरून, वैयक्तिक विकासाऐवजी सर्वांगीण ग्रामीण विकास,निडर नेतृत्व घडावे हाच उद्देश या कार्यक्रमाचा आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक तहसीलदार आजरा श्री माने बोलताना म्हणाले “welead “या महिलांच्या विकास नेतृत्वाची कार्यशाळा कोकण विकास सोसायटी, पणजी व सामाजिक संवेदना संस्था,आजरा या आजरा तालुक्यात घेत असल्याबद्दल आजरा तहसीलदार म्हणून मला आनंद होत असल्याचे सांगितले. कुटुंब, ग्रामपंचायत आणि सामुदायिक जागांमध्ये निर्णय घेण्यावर भर देत नेतृत्वाच्या भूमिकेत महिलांच्या सहभागाचे महत्व अधोरेखित केले.महिलांना सक्षम,बळकट करण्यासाठी आणि स्थानिक प्रशासन घडवण्यात सक्रीय योगदान देणारे म्हणून पुढे येण्यास प्रोत्साहन दिले. एकल महिला, ज्येष्ठ महिला यांना आपल्या विभागामार्फत व महिला बाल विकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याबाबत न दचकता माझ्याकडे यावे. अशा महिलांचे प्रश्न मी तात्काळ सोडविण्याचे “Welead”च्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित कार्यशाळेतील महिलांना त्यांनी आश्वासित केले. त्याचप्रमाणे,”Welead ” च्या कार्यक्रमानिमित्त कोकण विकास सोसायटी व सामाजिक संवेदना संस्थेने पुढाकार घेतल्यास आपण शासनाच्या विविध योजनांचे स्टॉल लावून महिलांच्या संदर्भातील विविध योजना गाव-गावात पोचवून मार्गी लावून महिलांना विकासाच्या प्रक्रियेत आणि शकतो.
कार्यक्रमाचा भाग म्हणून,महसूलविभाग आजरा यांनी लक्ष्मी मुक्ती योजनेतर्गत महिलांच्या नावे ७/१२ जमीन मालकी हक्कांचे अमूर्त दस्तवेज वाटप केले. जे महिलांच्या जमीन आणि मालमत्तेच्या हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्वाचा टप्पा आहे. एकूण पाच अशी कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली. जी. महिलांच्या मालकी बळकट करण्याच्या दिशेने आणि “welead”उपक्रमात अधिक सहभागाला प्रेरणा देण्याच्या दिशेने या महत्वपूर्ण पाऊल असल्याचे म्हटले.
गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांनी आपल्या भाषणात राष्टीय ग्रामीण उपजीविका अभियान(NRLM) आणि शाश्वत विकास निर्देशांकवर भर देऊन,राज्य सरकारच्या विविध योजनांच्या विषयी माहिती दिली.अशा उपक्रमांमुळे महिला सक्ष
सक्षमीकरण आणि शाश्वत समुदाय विकासात थेट कसा हातभार लागू शकतो यावर त्यांनी भर दिला.
या कार्यक्रमाचे वक्ते लेखक, विविध चळवळीचे नेते संपत देसाई यांनी आपल्या भाषणाची सुरुवात तुकाराम महाराज यांच्या पक्तींनी केली.
तुका म्हणे ,होय मनाशी संवाद |
आपलाच वाद आपणाशी ||
आपणच आपल्या मनाशी बोलले पाहिजे.संवाद साधला पाहिजे.आपण स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत.तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण आपल्याला न्याय देऊ शकतो.म्हणून,आपण बाहेरच कमी आणि आतलं अधिक पहावं.तेव्हाच,खऱ्या अर्थाने आपण आपली प्रगती करतो.
महिला सृजनशील असतात.त्या नव्याची नवीन निर्मिती करतात.जगात जे – जे काही चांगले आहे,त्याची निर्मिती स्त्रियांनी केली आहे.
स्त्रिया उत्तम गृहिणीबरोबर चांगली व्यवस्थापक आहेत. त्यामुळे,त्यांना कोणत्याही क्षेत्रात कमी समजू नये. म्हणूनच,त्या पुरुषांपेक्षा उत्तम चांगले नेतृत्व करू शकतात.याच भारताच्या पोलादी पंतप्रधान इंदिरा गांधींनी “पंधरा” वर्षे निर्विवाद देशाचे नेतृत्व केले. त्यांच्याच नेतृत्वात बांग्लादेशाला चारीमुंड्या करून त्यांनी नेतृत्व सिद्ध केले होते.
“Welead” यांनी यापुढे स्त्रियांच्या बरोबर पुरुषांसाठी नेतृत्व विकास कार्यशाळा घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. महिलांमध्ये विविध गुण,कामाची क्षमता,नेतृत्व गुण असल्याने,महिलांना चूल- मुल या पाशात न पाहता,अडकविता कर्तुत्ववान, नेतृत्वक्षम म्हणून पहावे.
या कार्यक्रमाच्या मुख्य वक्त्या सामाजिक कार्यकर्त्यां लता पाकले यांनी तहसीलदार समीर माने यांनी राबवलेल्या लक्ष्मी मुक्ती योजनेचे स्वागत केले.या योजनेच्या अंतर्गत राबणाऱ्या महिलांच्या नावे जास्तीत जास्त ७/१२ नोंदी महिलांनी करून घेतल्या पाहिजेत व त्याचा लाभ उपस्थित महिलांनी उठविला पाहिजेत. त्यामुळे,महिलांना जमिनीचा हक्क मिळाल्यामुळे त्यांना स्वयंपूर्णतेकडे जाता येईल.
“महिलाराज” बाबत बोलताना महिला पदाधिकाऱ्यांनी सर्व कारभार समजून घेऊन स्वतः कार्यभार सांभाळावा. गावातील गरीब,गरजू व कष्टकरी महिलांच्या मागणीस प्राधान्य देऊन त्यांचा स्तर उंचावण्याकरिता मुद्देसुद माहिती दिली. ग्रामपंचायतमधील निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांनी जास्तीत – जास्त भाग घेऊन आपले मुद्दे, म्हणणे सक्षमपणे मांडावे असेही सांगितले.
महिलांनी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, विकास या क्षेत्रात ठोस भूमिका घेतली पाहिजे.महिलांचे नेतृत्व म्हणजे फक्त राजकारण नव्हे,तर समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे.
गटचर्चा,प्रश्नोत्तरे,अनुभवकथन या माध्यमातून महिलांना नेतृत्वाचे धडे देण्यात आले.कार्यक्रमातील महिलांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आनंद, उत्साह आणि सकारात्मकता स्पष्टपणे दिसत होता. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून सरपंच सरिता पाटील यांनी “Welead”च्या नेतृत्व विकास कार्यशाळेने आमच्या गावातील महिलांना नव- नवीन शिकण्यास मदत झाली. अशा प्रकारचा कार्यक्रम म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना सक्षम,नेतृत्वक्षम बनविणारा आहे. या कार्यक्रमाचा उपयोग नवीन महिलांना शिकण्याची उर्जा देतो व दिली. म्हणून, आजचा कार्यक्रम एरंडोळ येथे होणे म्हणजे आपले नेतृत्व कामी लागल्याचे सारखे आहे.
या कार्यक्रमासाठी याप्रसंगी गटविकास अधिकारी सुभाष सावंत, कोकण विकास सोसायटी पणजीचे डायरेक्टर फा.रॉयस्टन, प्रसिद्ध लेखक व विविध चळवळींचे नेते कॉ.संपत देसाई,कार्यक्रमाच्या वक्त्या सामाजिक कार्यकर्त्यां लता पाकले, स्टेट समन्वयक सोपीया, कार्यक्रम समन्वयक राजेंद्र कांबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे मंडळ अधिकारी जाधव, ग्रामहसूल अधिकारी निकम, उपसरपंच भीमराव माधव, पेरणोली सरपंच, पारपोली सरपंच हाळोली-मेढेवाडी सरपंच उपस्थित होते. विकास सोसायटी पणजीचे फा.रॉयस्टन, स्टेट समन्वयक सोपीया, कार्यक्रम समन्वयक राजेंद्र कांबळे, ग्रामपंचायत क्षेत्रातील महिला सदस्य,नेतृत्व घडवू पाहणाऱ्या विविध ग्रामपंचायत क्षेत्रातील महिला, शासकीय अधिकारी, गावातील पदाधिकारी उपस्थित होते.
आभार उपसरपंच भीमराव माधव यांनी आभार मानले.
