ग्राहकांशी संगणमत करून बनावट सोने ठेवून घेवून ग्राहकांना कर्ज देऊन – मुथुट फिनकॉर्प लि. आजरा शाखेची फसवणूक ८ जणांवर गुन्हा दाखल.
आजरा.- प्रतिनिधी.
ग्राहकांशी संगणमत करून बनावट सोने ठेवून घेवून ग्राहकांना कर्ज देणे व त्यापैकी काही रक्कम स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी घेणे तसेच ग्राहकांनी कपंनीमध्ये तारण ठेवलेले खरे सोन्याचे दागिने बदलून त्याजागी बनावट दागिने ठेवून अपहार करण्याची घटना
मुथुट फिनकॉर्प लि. आजरा शाखेत घटली असल्याची फिर्याद
संदिप शिवाजीराव जामदार, वय 45 वर्षे, व्यवसाय एरिया मॅनेजर आजरा पोलिसात दिली आहे.
या गुन्ह्यातील हकीगत अपहार केलेला माल – एकुण 471.5 ग्रॅम ख-या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार (21,52,183/- रु कर्ज रक्कम) असून यातील
आरोपी क्र. १) दिनकर रामचंद्र वडर व आरोपी क्र. २) स्नेहल शिवांजी माडभगत यांनी आरोपी क्र. ३) इरशाद अहमद चाँद आरोपी क्र.४) शांताराम पांडुरंग कांबळे, आरोपी क्र.५) गणेश आनंदा सावंत, आरोपी क्र.६) गुणाजी विष्णु नेवगे, आरोपी क्र. ७) विजय तानाजी देसाई व आरोपी क्र.८) नोवेल जोसेफ लोबो, रा. शिवाजीनगर आजरा यांचेशी संगणमत करून त्यांचेकडून बनावट सोने मुथुट फिनकॉर्प शाखा आजरा येथे ठेवुन घेवुन त्यांना कर्ज रक्कम देवुन त्यापैकी काही रक्कम स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता घेवुन मुथुट फिनकॉर्प लि. आजरा शाखेची फसवणूक केली आहे.
तसेच ग्राहकनामे जीवन गोविंद शेवाळे रा. पोळगाव ता. आजरा व हारुन निजाम खान अलियास फकीर रा. जोशी गल्ली आजरा यांनी मुथुट फिनकॉर्प लि. कंपनीमध्ये तारण ठेवलेल्या सोन्याचे खरे दागिणे हे आरोपी क्र.१) व आरोपी क्र. २) यांचे कस्टडीमध्ये असताना त्यांनी परस्पर सदर सोन्याचे दागिणे हे पॅकेटमधून काढून त्याजागी बनावट दागिने ठेवून 21,52,183/- रु कर्ज रक्कमेच्या एकुण 471.5 ग्रॅम ख-या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केला असलेबाबत यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिलेने गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा.स.पो.नि. यांचे आदेशाने पो.स.ई. पाटील यांचेकडे दिला आहे.
