जनता गृहतारणमार्फत कर्मचाऱ्यांना जादाची वेतन वाढ.
आजरा.- प्रतिनिधी.
जनता गृहतारणमार्फत कर्मचाऱ्यांना जादाची वेतन वाढ.
मार्च २०२५ अखेर १०० कोटी ठेवींचे उद्दिष्ट संस्थेने ठरविलेले होते. हे उद्दिष्ट कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण झाले, त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून जादाची एक वेतन वाढ देत आहोत. याचा फायदा संस्थेला नक्कीच होणार. असे प्रतिपादन चेअरमन मारूती मोरे यांनी केले. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये वार्षिक वेतन वाढ दिली जाते. यावर्षी ही जादाची वेतन वाढ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
ही वाढ सप्टेंबरच्या पगारापासून रोखीने देण्यात येईल. शिवाय नेहमीची ऑक्टोबरची वेतनवाढ सुद्धा त्यांना देण्यात येईल. या वेतन वाढीमुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. स्वागत प्रास्ताविक करताना व्हाईस चेअरमन अशोक बाचुळकर यांनी सांगितले की सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे कर्मचाऱ्यांना पगार देणारी ही संस्था आहे. त्यांना दैनिक भत्ता, आणि घर भाडे दिला जातो.
या वेतनवाढीमुळे सरासरी आठशे रुपयांची वाढ कर्मचाऱ्यांच्या पगारात झाली आहे.
