🛑व्यंकटरावमध्ये नगरपंचायत मार्फत कचरा व्यवस्थापनाचे मार्गदर्शन.
🛑लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम.
🛑व्यंकटरावमध्ये नगरपंचायत मार्फत कचरा व्यवस्थापनाचे मार्गदर्शन.
आजरा.- प्रतिनिधी

आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये नगरपंचायत मार्फत स्वच्छ संरक्षण 2025 व माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत विद्यार्थ्यांना कचऱ्याचे प्रकार त्याच बरोबर कचरा व्यवस्थापन या बाबत मोलाचे मार्गदर्शन श्री पेडणेकर सर व त्यांचे सहाय्यक कांबळे सर यांनी केले. त्यांनी प्रश्न उत्तर च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बोलते केले. समर्पक उत्तर देणाऱ्याला चांगला पेन भेट दिला, त्याच बरोबर प्रशालेला कचऱ्याचे व्यवस्थापन असणारे कॅलेंडर भेट दिले. कापडी कचरा पेटी आणि प्रमाणपत्र ही प्रदान केले .6(A) विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. यावेळी प्राचार्य श्री एम एम नागुर्डेकर पर्यवेक्षिका सौ व्ही जे शेलार व वर्गशिक्षिका श्रीम. आर. एन. पाटील उपस्थित होत्या..
🛑लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम.-
मुंबई.- प्रतिनिधी.
🛑लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम
१) पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक
२) लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर प्रचंड मोठा आर्थिक भार पडत आहे.
३) जर महिलेचे लग्नं झाले असेल तर पतीचं आणि लग्न झाल नसेल तर वडिलांचे उत्पन्न जाणार शोधले
४) लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास संबंधित महिलेला लाडकी बहीण योजनेसाठी ठरवले जाणार अपात्र.
🛑बहिणीची छोटीशी प्रतिक्रिया..-
झेपत नाही तर योजनेचा अमिष दाखवले कशासाठी. वेगवेगळे निकष लावून अनेक बहिणींचे नाव कमी केले-
हे निकष पूर्वीपासून का ? लावले नाहीत. गरज संपली मते घेतला आता पुढच्या पाच वर्षात नवीन काहीतरी आणून जनतेची दिशाभूल कराल हे येणाऱ्या काळात खपवून घेतले जाणार नाही.. लवकरच आंदोलन उभे करू – महिला गट.
