Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रभादवण विकास सेवा संस्थेला ४ लाख १२ हजाराचा नफा… सभासदांना ५% लाभांश...

भादवण विकास सेवा संस्थेला ४ लाख १२ हजाराचा नफा… सभासदांना ५% लाभांश देणार.-चेअरमन संभाजी कांबळे. ( १०६ वी वार्षिक सभा उत्साहात संप्पन्न..)

भादवण विकास सेवा संस्थेला ४ लाख १२ हजाराचा नफा… सभासदांना ५% लाभांश देणार.-चेअरमन संभाजी कांबळे. ( १०६ वी वार्षिक सभा उत्साहात संप्पन्न..)

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

भादवण येथील भादवण विकास सेवा संस्थेला २०२४/२५ आर्थिक वर्षात ४ लाख १२ हजाराचा नफा झाला असून सभासदांना ५% लाभांश देणार असल्याचे वार्षिक सभेत चेअरमन संभाजी कांबळे यांनी जाहीर केले. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्री कांबळे होते. स्वागत प्रास्ताविक संचालक व माजी चेअरमन ‘पी. के. केसरकर यांनी केले, . प्रस्ताविकामध्ये गेल्या ३ वर्षा पूर्वी संस्थे मध्ये ७६२ सभासद होते त्या नंतर २०० शेतकऱ्या ना सभासदत्व दिले .श्रद्धांजलीचा ठराव संचालक माजी चेअरमण .मारुती देसाई यांनी मांडला, त्यानंतर .आम. पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांची महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट व पालक मंत्री कोल्हापूर पदी निवड झाली त्याच बरोबर कागल विधान सभचे आमदार मा. हसन मुश्रीफ यांची वेद्यकिय शिक्षण खात्याच्या मंत्री पदी निवड झाले बद्दल अभिनंदन करणेत आले .संस्था सचिव सुभाष पाटील यांनी अहवाल वाचन केले. यावेळी सर्व विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली.

यावेळी उपस्थित सभासदांनी दिलेल्या प्रश्नांना सचिव सुभाष पाटील यांनी उत्तरे दिली. या हंगामात पीक कर्ज व म. मुदत कर्ज वाटप २ कोटी २० लाख इतके वाटप झाले मागील ३ वर्षाच्या तुलनेत १ कोटी ४० लाख कर्ज शेतकऱ्यांना वाटप केले .असून स्वभांडवलातून ४० लाख इतके वाटप झाले आहे. संस्थेला चालू वर्षी ऑडीट वर्ग अ मिळाला आहे आपत्तीग्रस्त सभासदांना आर्थिक मदत केली आहे. सभासद कर्जाची ९९ % वसुली झाली आहे.

यावेळी आजरा कारखाना संचालक राजेश जोशीलकर, अनंत पाटील, विष्णू मुळीक, पी. जी. मुळीक यांनी चर्चेत भाग घेतला, सभेला व्हा. चेअरमन दत्तात्रय पाटील, संचालक दशरथ डोंगरे, रत्नापा कुंभार, गजानन गाडे, रुक्मिणी पाटील, रत्नाबाई केसरकर, एम. टी. मुळीक, दत्तात्रय पाटील यांच्यासह सभासद बाळू गाडे बाळासाहेब कदम, तुकाराम पाटील, दिनकर गोडसे सुधीर जाधव, गणपती कोलते . शंकर कांबळे नारायण नेसरीकर बाबुराव पाटील शामराव देसाई तुकाराम केसरकर आनंदा पाटील गणपती देवरकर संभाजी पाटील निवृती पाटील श्रीपती देवरकर .अर्जुन दोरूगडे, धोंडीबा जांभळे यांच्यासह सभासद उपस्थित होते. आभार संचालक अशोक गुरव यांनी मानले..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.