Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा आगार प्रमुख निष्क्रिय. - जमत नसेल तर खुर्ची खाली करा.- शिवसेना...

आजरा आगार प्रमुख निष्क्रिय. – जमत नसेल तर खुर्ची खाली करा.- शिवसेना आक्रमक. आजरा आगारात नियोजनाचा अभाव.

आजरा आगार प्रमुख निष्क्रिय. – जमत नसेल तर खुर्ची खाली करा.- शिवसेना आक्रमक. आजरा आगारात नियोजनाचा अभाव.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आजरा आधारावर तिरडी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदनाने आजरा आगार प्रमुख यांना देण्यात आले होते. याबाबत मोर्चा रद्द करा व बैठकीला बसून निर्णय घेऊ विनंती आगर प्रमुख यांनी केली होती याबाबत दि. २४ रोजी शिवसेना पदाधिकारी यांच्यासोबत आगार कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, ता. प्रमुख युवराज पोवार यांनी अनेक प्रश्नांचा भडीमार केला यामध्ये. आजरा तालुका हा डोंगराळ व ग्रामीण भाग असलेने आजरा शहर हि मुख्य बाजारपेठ आहे. तसेच शाळा कॉलेज, हॉस्पिटल व सर्व शासकीय कार्यालये देखील आजरा येथे असेलेने तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात एस.टी ने ये जा करत असतात. परंतु गेली अनेक महिने आजरा तालुक्यातील एस.टी चे वेळापत्रक चुकीचे व कोलमडल्या वेळेत बस बसस्थानकावर येत नाही. वस्तीच्या गाड्या बंद केलेल्या आहेत. काही फेऱ्या दुसऱ्या मार्गाने सोडल्या गेलेल्या आहेत त्यामुळे अनेक विद्यार्थी रात्री ८ वाजता घरी पोहचतात. तसेच नागरिकांना वेळेत कामावर पोहचता येत नाही.
महाराष्ट्रात एक नंबर ला असणारा आजरा आगार हा या व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळे बंद होण्याच्या मार्गावर आलेला आहे. यामुळे या अधिकाऱ्यांना व प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिवसेनेच्या तिरडी मोर्चा काढणार होती. बैठकीतून मार्ग निघतो का? यासाठी बैठकीला आम्ही आलो आहोत. आम्हाला आमच्या मागणीप्रमाणे लेखी पत्र देऊन पंधरा दिवसा त्या संपूर्ण मागण्या पूर्ण करा ज्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत.‌ व आगार मॅनेजर हे निष्क्रिय आहेत. त्यामुळे त्यांची बदली करा. या मॅनेजर ना पुन्हा पुन्हा निवेदन देऊन मागणी करून हे मॅनेजर सदर निवेदनाची माहिती जिल्हास्तरीय देखील देत नाहीत. बेजबाबदार अधिकारी आमच्या तालुक्यात नको. याबाबत कार्यालयात अधिकाऱ्यांना प्रश्नांचा भडिमार केला याबाबत डेपो मॅनेजर प्रवीण पाटील यांनी मौन पाळले प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे पदाधिकारी संतापले तुम्ही काहीतरी बोला उत्तरे द्या. शालेय शाळेची लहान मुले तुमच्यासमोर रोज रात्री आठला घरी जातो म्हणून रडत आहेत.
या ठिकाणी आपल्या पालकांना घेऊन बैठक चालू असताना एसटी बाबत फेरी बंद असल्याने तक्रार करण्यासाठी आली होती. त्या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांना आंदोलकांनी बोलून काल आहे विचारपूस केले असता वेळेत गाडी नसते याबाबत तक्रार करत तो विद्यार्थी चिमुकला डोळ्यात अश्रू आणून रडू लागला. शेवटी या बैठकीत पंधरा दिवसात मागणीप्रमाणे सेवा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन देण्याचे ठरले. यावेळी
शिवाजी आढाव, दिनेश कांबळे, शिवाजी इंगळे, महेश पाटील, अमित गुरव सह पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजरा आगार प्रमुख व व्यवस्थापक विभाग यांनी गाड्या कमी असल्याने वेळापत्रक कोलमडले आहे. लवकरच बंद असलेल्या फेऱ्या चालू करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. या बैठकीला एसटी महामंडळाचे वाहतूक निरीक्षक शितल चिखलवाडे कोल्हापूर, आजरा डेपो मॅनेजर प्रवीण पाटील, वाहतूक नियंत्रक आजरा राजू येसादे, कर्मचारी श्री जोशी, श्री खवरे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.