Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रअण्णा भाऊ स्मृतिपंधरवड्यानिमित्त शाखांतर्गत शालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न.

अण्णा भाऊ स्मृतिपंधरवड्यानिमित्त शाखांतर्गत शालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न.

अण्णा भाऊ स्मृतिपंधरवड्यानिमित्त शाखांतर्गत शालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

जनता शिक्षण संस्था संचलित आजरा हायस्कूल आजरामध्ये शाखांतर्गत अण्णा भाऊ स्मृतिपंधरवड्यानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे प्रायोजक अनिकेत चराटी भाजपा तालुकाध्यक्ष, संचालक, अण्णाभाऊ सहकारी सुतगिरण आजरा हे होते. या स्पर्धेसाठी इ. ८ वी ते इ. १० वी मधील शाखांतर्गत स्पर्धक विद्यार्थी सह‌भागी होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक ए. एल. तोडकर यांनी केले. एकूण १९ स्पर्धक सह‌भागी होते.

प्रथम क्रमांक – वेदिका विजय पोतदार आजरा हायस्कूल आजरा, द्वितीय क्रमांक- समृ‌द्धी उत्तम वांद्रे पेरणोली हायस्कूल पेरणोली, तृतीय क्रमांक – रिया संजय पाटील बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे, उत्तेजनार्थ प्रथम प्राजक्ता नामदेव चौगुले एरंडोळ हायस्कूल एरंडोळ व संजोल अरुण येसणे मडिलगे हायस्कूल मडिलगे, उत्तेजनार्थ दूसरा ऋतुजा अरविंद सातुशे मडिलगे हायस्कूल मडिलगे

यांनी पटकाविला. स्पर्धेतील सर्व सह‌भागी स्पर्धकाना सह‌भागाचे प्रमाणपत्र देण्यात आले. परीक्षक म्हणून सौ. गीता पोतदार, सौ. योगिता भोकरे, सौ. वैशाली देसाई यांनी काम पाहीले.

या स्पर्धेसाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे, डॉ. अंजनी देशपांडे, संचालक के. व्ही. येसणे, सल्लागार सौ. सुरेखा भालेराव, सौ. नूरजहाँ सोलापूरे, आय. के. पाटील उपमुख्याध्यापक सौ. एच. एस. कामत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक ए. आर. व्हसकोटी यांनी मानले. बाक्षिस वितरण कार्यक्रमाचे सूत्तनिवेदन व्ही. ए. पोतदार व संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन स्पर्धाविभागप्रमुख सौ. व्ही. एच. अडकूरकर यांनी केले. या स्पर्धा पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.