🟣आजरा क्रिडा संकुलाची इमारत खेळाडूंसाठी खुली करून कर्मचारी नियुक्ती करा.- शिवसेना उबाठाचे निवेदन
(अन्यथा शिवसेना स्टाईलने उद्घाटन करेल.)
🟣आरदाळ ग्रामस्थांची उत्तुर वीज वितरण कार्यालयासमोर निदर्शने.
आजरा क्रिडा संकुलाची इमारत खेळाडूंसाठी खुली करून कर्मचारी नियुक्ती करा.- शिवसेना उबाठाचे निवेदन
(अन्यथा शिवसेना स्टाईलने उद्घाटन करेल.)
कोल्हापूर.- प्रतिनिधी.
आजरा क्रिडा संकुलाची इमारत खेळाडूंसाठी खुली करून कर्मचारी नियुक्ती करावी याबाबत शिवसेना उबाठाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी यांना शिवसेना स्टाईलने उद्घाटन करू अशा आशयाचे निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष्याच्या वतीने आजरा तालुक्यामध्ये क्रिडा संकुल बांधण्यासाठी कोट्यावधी रुपये मंजुर झाले.
स्व. बाबासाहेब कुप्पेकर आमदार असताना या क्रिडा संकुलाला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर निधी अभावी व जागा रिकामी नसल्याने काम रखडले होते. यावेळी शिवसेनेने वारंवार बैठका, आंदोलने, मोर्चे काडुन हा प्रश्न मार्गी लावला होता.
त्या ठिकाणी क्रिडा संकुलाची इमारत कोटी रुपये खर्चुन बांधण्यात आली. दोन ते तीन वर्षे ही इमारत बांधुन तशीच पडुन आहे. आज त्या इमारतीच्या समोर व बाजुने झाडे झुडपे वाढुन आलेली असुन ती धुळ खात पडलेली आहेत. या इमातीमध्ये बॅडमिंटन, कबड्डी या सारखे अनेक इनडोअर खेळ आजरा तालुक्यातील खेळाडुंना खेळता येतील. आज आजरा तालुक्यात अनेक मुले व मुली राज्य स्तरीय विविध स्पर्धेत यश संपादन करत आहेत. त्याच बरोबर आपल्या विभागा मार्फत कर्मचारी नेमणुक केलेली नाही. आपल्या ढिसाळ करभारामुळे शासनाचा इतका निधी लागुन देखील या संकुलाचा फायदा खेळाडुना होत नाही. तरी पुढील आठ दिवसात तात्काळ हे क्रिडा संकुल कर्मचारी नेमणुक करुन खेळाडूंसाठी खुले केले अन्यथा आजरा शिवसेना आपल्या स्टाईलने या इमारतीचे उद्घाटन करुन हे संकुल खेळाडूंसाठी खुले करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, अवजड वाहतूक जिल्हाप्रमुख हर्षल पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार सह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.
🟣आरदाळ ग्रामस्थांची उत्तुर वीज वितरण कार्यालयासमोर निदर्शने.
आजरा – प्रतिनिधी.

आरदाळ ग्रामस्थांची वीज वितरण आजरा – उत्तुर कार्यालयासमोर दि. २३ रोजी निदर्शने करण्यात आली. स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध व पूर्व सूचना न देता गावात १३७ मीटर बसवण्यात आली आहेत. ती पूर्ववत जुनी मीटर बसवण्यात यावी या मागणीसाठी उत्तुर तालुका आजरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली
जुने मीटर बदलणाऱ्यांचा धिक्कार असो, वीज आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, आमचे जुने मिटर परत करा, बळजबरीने स्मार्ट मीटर बसवणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला त्यानंतर सहाय्यक अभियंता निखिल काळोजी यांना निवेदन देण्यात आले. व चर्चा करण्यात आली. यावेळी नवीन मीटर कसे चांगले आहे. हे सांगण्याचा अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला त्याचवेळी शिवाजी गुरव यांनी त्यांना सदर मीटर मध्ये प्रीपेड कार्ड बसवण्याची व्यवस्था आहे. का असे विचारले असता ते आपणास माहीत नाही. असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. यावर ग्रामस्थांनी आपल्या नवीन मीटर बाबत आम्हाला शंका आहे.
ती भविष्यात आमच्या तोट्याची आहेत असे सांगितले तसेच आरदाळ ग्रामपंचायतीकडे अस्तित्वात नसणारे मीटरचे बिल अनेक वर्ष लादले जात आहे. व चुकीची बिल आकारणी लादली आहे यावरही चर्चा झाली. या आंदोलनात शिवाजी गुरव, अमोल बांबरे, प्रतीक कुडवे, बाळू शिवणे, शंकर पुंडपळ, दिलीप शिंत्रे, बंडू सुतार, मारुती शिवणे, बापू शिवणे, शंकर पावले सर, संताराम शिवणे, आनंदा पावले, सचिन पावले, बापू यादव, सागर सुतार, इंदुबाई कांबळे, रेशमा कांबळे यांच्यासह आरदाळ ग्रामस्थ व इतर नागरिक उत्तुर विभागाची श्री रेडेकर, गायकवाड मॅडम, लाईनमन नामदेव पाटील, पोलीस हवालदार मकानदार सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.)
