स्मार्ट मीटर न बसविणे बाबत.- आरदाळ ग्रामस्थ करणार.- धरणे आंदोलन.
आजरा.- प्रतिनिधी
स्मार्ट मीटर न बसविणे बाबत आरदाळ ता. आजरा – ग्रामस्थ करणार आजरा उत्तुर महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात धरणे आंदोलन करणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक देण्यात आली आहे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
आजरा महावितरण कार्यालय कडून अदानीच्या खाजगी कंपनीकडून खाजगी कामगार कोणतीही पूर्व सुचना न देता गावातील १३७ मीटर बसवण्यात आलेली आहेत. तरी सदरची स्मार्ट मीटर तात्काळ काढून घ्यावीत. व पूर्वीची होती ती मीटर द्यावी व पुन्हा एकही मीटर गावात बसवू नये यासाठी अशी आरदाळ ग्रामस्थ आज दिनांक – २५/०९/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता आपले आजरा महावितरण कार्यालया समोर धरणे आंदोलन करणार आहोत. असे प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे.
या आंदोलनात कॉम्रेड शिवाजी गुरव, प्रतीक कुडवे, बापूसाहेब शेळके, तानाजी गुरव, आनंदा सुतार, बाळशिवणे, भिकाजी शिवणे, बाळू जाधव, विठ्ठल पवार सह महावितरण चे ग्राहक सहभागी होणार आहेत.
