HomeUncategorizedमुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा सोहाळेत उत्साहात प्रारंभ.🟣 मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज...

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा सोहाळेत उत्साहात प्रारंभ.🟣 मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत, सोहाळे गावात ‘वृक्षारोपनाचा – वृक्षदिंडीअभिनव उपक्रम.

🟣मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा सोहाळेत उत्साहात प्रारंभ.
🟣 मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत, सोहाळे गावात ‘वृक्षारोपनाचा – वृक्षदिंडी
अभिनव उपक्रम.

🟣मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा सोहाळेत उत्साहात प्रारंभ.

आजरा.- प्रतिनिधी.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा सोहाळेत ता. आजरा येथे उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
राज्य शासनाच्या वतीने दि. १७ सप्टेंबर २०२५ ते दि. ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरु करण्यार आले आहे. त्या अंतर्गत दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत सोहाळे बाची च्या वतीने मान्यवरांच्या उपास्थितीत या अभियानाचा मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्ह‌णून नूतन गट‌विकास अधिकारी सुभाष सावंत उपस्थित होते.

गावच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली असून लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन त्यांनी केले. सोहाळे गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. भारती डेळेकर यांनी उपास्थितांना मार्गदर्शन करताना, “आपल्या गावाचा सर्वांगीण व शाश्वत विकास होण्यासाठी या अभियानात, गावातील सर्वांनी मोठ्या प्रमाणात सह‌भागी व्हावे असे आवाहन केले.

या कार्यक्रमासाठी प्रशासनाच्या वतीने सहा. गट‌विकास अधिकारी दिनेश शेटे, विस्तार अधिकारी कुंभार, ग्रामपंचायत सोहाळे ग्रामविकास अधिकारी अजित रणदिवे, ग्रा.पं. चे सर्व सदस्य व कर्मचारी, मंडळ अधिकारी सुंदर जाधव, महसूल अधिकारी सौ. रेखा कांबळे, कृषी अधिकारी सौ. मनीषा पाटील, आरोग्य विभागाचे अधिकारी कांबळे, विद्या मंदिर सोहाळे व अंगणवाडीचे सर्व शिक्षक वृंद बचत गटाचे समन्वयक, आणि पोलीस पाटील सोहाळे व बाची यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपास्थित होते,

🟣 मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत, सोहाळे गावात ‘वृक्षारोपनाचा – वृक्षदिंडी
अभिनव उपक्रम.

आजरा.- प्रतिनिधी.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत, सोहाळे ता. आजरा येथे गावातून ‘वृक्षारोपनाचा वृक्षदिंडी
अभिनव उपक्रम दि १९ सप्टेंबर रोजी मृदंग टाळाच्या गजरात अभंगाचा ताल, सजविलेली पालखी, पारंपारिक वेषभूशेतील ग्रामस्थ आणि शाळकरी वि‌द्यार्थी यांचे एक तालबद्ध आणि शिस्तप्रिय पण भक्तीभाव पूर्ण वातावरण आज सोहाळे गावात पहायला मिळाले निमित्त होते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ‘अनोख्या वृक्षदिंडी’ कार्यक्रमाचे..

ग्रुप ग्रामपंचायत सोहाळे बाची व सामाजिक वनीकरण विभाग गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे सोहाळेवाडी येथील गायरा‌नान ४५०० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. लोक – सहभागातुन ‘हरित गाव’ ही संकल्पना साध्य करण्यासाठी वृक्षारोपणाचा मोठा उपक्रम राबविण्यात आला.

वृक्षदिंडीसाठी आवश्यक पालखीचे पूजन सरपंच सौ. भारती डेळेकर व उपास्थित् महिला पदा‌धिकारी यांचे हस्ते करण्यात आले गावातील भजनी मंडळाच्या साथीने ग्रामस्थ, पदाधिकारी, सर्व कर्मचारी, वि‌द्यार्थी या दिंडीत सह‌भागी झाले होते. तसेच वृक्षारोपण कार्यक्रम स्थळी वृक्ष लागवड कार्यक्रम ची सुरवात सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बापू नेऊंगरे, संस्थापक अध्यक्ष संभाजी सरदेसाई व सामाजिक वनीकरण चे वनपाल संजय निळकंठ यांचे हस्ते करणेत आली. सदर कार्यक्रम साठी उपसरपंच वसंत कोंडूसकर, सदस्य सौ. निर्मला दोरुगडे आदीसह ग्रामपंचायत सर्व सदस्य, कर्मचारी, वनविभाग आजरा चे कर्मचारी, सौ. रेखा कांबळे महसूल अधिकारी,श्री. सूर्यकांत दोरुगडे, सोहाळे, सोहाळेवाडी गावातील भजनी मंडळे, विद्या मंदिर सोहाळे शाळेचे विद्यार्थी व शिक्षक स्टाफ, अंगणवाडी कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपास्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.