🟥आज २१ सप्टेंबर २०२५ रोजी खंडग्रास सूर्यग्रहण पण भारतात दिसणार नाही…का? पहा.
मुंबई.- प्रतिनिधी.
आज २१ सप्टेंबर २०२५ रोजी एक आंशिक सूर्यग्रहण होत आहे. जे भारतात दिसणार नाही कारण भारत जगाच्या दक्षिण आणि पूर्व गोलार्धात आहे. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री १०:५९ वाजता सुरू होईल,पहाटे १:११ वाजता ते सर्वाधिक असेल आणि पहाटे ३:२३ वाजता संपेल.
भारतात सूर्य उगवण्यापूर्वी हे ग्रहण संपेल, त्यामुळे सुतक काळ आणि इतर धार्मिक विधींची आवश्यकता नाही. सूर्यग्रहणाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती हे ग्रहण ‘खंडग्रास’ सूर्यग्रहण आहे. म्हणजे चंद्र सूर्याचा काही भागच झाकतो, संपूर्ण सूर्य नाही. पण हे भारतात दिसणार नाही. भारतामध्ये सूर्य उगवण्यापूर्वीच हे ग्रहण संपणार असल्याने ते भारतात दिसणार नाही.
भारतीय प्रमाण वेळेनुसार, हे ग्रहण रात्री १०:५९ वाजता सुरू होईल आणि पहाटे ३:२३ वाजता संपेल. ग्रहण भारतात दिसणार नसल्याने सुतक काळाची शक्यतो आवश्यकता नाही.
