आजऱ्यातील नावलौकिक – जवाहर नागरी सह. पत संस्थेस २९ लाखाचा नफा. वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील मुस्लिम समाजाची अर्थवाहिनी संबोधल्या जाणाऱ्या जवाहर नागरी सहकारी पत संस्थेला २९ लाखाचा नफा झाला असल्याचे संस्थेचे संचालक समीर चाँद सर यांनी संस्थेच्या वार्षिक सभेत बोलताना म्हणाले सदर वार्षिक सभेस संस्थेचे चेअरमन इकबाल शेख हे प्रमुख उपस्थित होते. अहवाल वाचन व्यवस्थापक बशीर अहमद काकतीकर यांनी केले.
समीर चाँद सर वार्षिक सभेत बोलताना म्हणाले की, चालु आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवीमध्ये वाढ होऊन गतवर्षी वार्षिक उलाढाल १४ कोटीच्या आसपास असल्याचे म्हणाले, सभासदाना १० टक्के लाभांश देण्याचा निर्णय यावेळी घेणेत आला. संस्था स्थापन झाल्यापासून ते आजतागायत सर्वात जास्त गतवर्षाचा नफा व वार्षिक उलाढाल असल्याचे सांगण्यात आले. संस्थेचे कार्यक्षेत्र आजरा शहरापुरते मर्यादित वरुन कोल्हापूर जिल्हा करण्याचा ठराव देखील मांडण्यात आला व त्यास मंजूरी घेण्यात आली.
श्रध्दांजलीचा ठराव संचालक आसिफ दरवाजकर यांनी मांडला. यावेळी संस्थेचे संचालक आसिफ सोनेखान, असलम लमतुरे, इलीयास तकिलदार, इस्माईल बेपारी सर, सौ. शबनम मुल्ला, सौ. रुक्साना नसरदी, तसेच संस्थेचे कर्मचारी हाफिज भडगांवकर, इलियास दखाजकर, खलील दरवाजकर, मुस्ताक खेडेकर, आयुन मुल्ला, अकिन दरवाजकर, कर्मचारी हाफिज भडगावकर, रियाज दरवाजावर, खलिल दरवाजावर , मुस्ताक खेडेकर, आयुब मुल्ला, अकिब दरवाजावर सह क व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. वार्षिक सभा खेळीमेळीत पार पडली.संचालक तौफीक आगा यांनी आभार मानले.
