Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रतुमचे वन्य प्राणी तुम्ही सांभाळा.- नाहीतर आमची शेती भाडेतत्त्वावर करायला घ्या.( मडीलगेत...

तुमचे वन्य प्राणी तुम्ही सांभाळा.- नाहीतर आमची शेती भाडेतत्त्वावर करायला घ्या.( मडीलगेत वन विभागाचे नुकसान भरपाई बाबत चर्चासत्र.- शेतकरी वन कर्मचारी यांच्यात संवाद.)

तुमचे वन्य प्राणी तुम्ही सांभाळा.- नाहीतर आमची शेती भाडेतत्त्वावर करायला घ्या.
( मडीलगेत वन विभागाचे नुकसान भरपाई बाबत चर्चासत्र.- शेतकरी वन कर्मचारी यांच्यात संवाद.)

आजरा – प्रतिनिधी.

तुमचे वन्यप्राणी राहायला जंगलात व खायला आमच्या शेतात येतात आमच्या शेत पिकाचे नुकसान झाल्यास आपल्याकडून पंचनामा करून झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई काडीमोड दिली जाते. एकतर शंभर टक्के नुकसान भरपाई द्या नाहीतर आमची शेती तुम्ही भाडेतत्त्वावरती घ्या. व वार्षिक उत्पन्न आहे. इतकी रक्कम आम्हाला द्या. व तुमचे वन्य प्राणी आमच्या शेतात आल्यास आम्हाला कोणती अडचण नाही. असा शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. आजरा तालुक्यातील मडीलगेत येथे वन विभागाचे नुकसान भरपाई बाबत चर्चासत्राचे ग्रामपंचायत यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.

oplus_131074

अध्यक्ष स्थानावरून सरपंच बापू निऊगरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वन्य प्राण्यांपासून अलीकडच्या काळात शेतकऱ्यांच्या पिकांचे अधिक नुकसान होत आहे. परंतु त्याची काडीमोड नुकसान भरपाई दिली जाते. अनेक वेळा शेतकऱ्यांच्याकडून दिलेली प्रकरणे निकाली देखील न करता नुकसान भरपाई मिळाली नाही. तर काही शेतकऱ्यांनी आपली नुकसान झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळाली असल्याचे सांगितले. याबाबत कोणत्या पिकाला किती नुकसान भरपाई आहे कोण कोणते प्राणी पासून नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाई दिली जाते.

याबाबतची माहिती वन विभाग कर्मचारी श्री. मुजावर यांनी देताना म्हणाले यापूर्वी मागील वर्षात एकुण ७२ प्रकरणे मंजूर होऊन मडिलगे गावात ४ लाख ७५ हजार नुकसान भरपाई निधी दिली आहे. चालू वर्षामध्ये वन्य प्राण्याकडून आपल्या पिकाचे नुकसान झाल्यास आपल्याला पंचनामा करून योग्य ते सहकार्य केले जाईल. यापूर्वी आपल्याला काही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसेल तर यापुढे असे होणार नाही. आपल्या पिकाची पाहणी करून योग्य ती नुकसान भरपाई दिली जाईल असे बोलताना श्री मुजावर म्हणाले .

या बैठकीला के. व्ही. येसणे, शेतकरी अशोक पोवार, निवृत्ती पाटील, विश्वजीत मुंज, सदाशिव पोवार, गणपती घाटगे, पांडुरंग मुंज, बाळू जाधव, बबन पाटील, मारुती राठोळ, सह शेतकरी ग्रामस्थ विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.