🟣हिंदी भाषा ही भारतीय संस्कृतीची ओळख प्राचार्य (डॉ.) ए. एन. सादळे.
🛑तालुकास्तरीय स्पर्धेत आजरा हायस्कूल क्रीडाविभागाचे सुयश.
🟣जंगल क्षेत्रावरील ( आकेशिया व निलगिरी ) – या विदेशी प्रजातीची झाडे काढून देशी प्रजातीची वृक्ष लागवड करावी – सरपंच परिषद मुंबई शाखा आजरा.
🛑हिंदी भाषा ही भारतीय संस्कृतीची ओळख प्राचार्य (डॉ.) ए. एन. सादळे.
आजरा.- प्रतिनिधी.

भारतीय घटनेनुसार हिंदी ही आपली राजभाषा आहे. संपूर्ण भारतीयांना एकत्र जोडून ठेवण्याचे काम हिंदी करत आहे. भारत देशात प्रत्येक राज्याची आपली स्वतंत्र भाषा आहे. परंतु सर्वजण जेव्हा एकत्र येताता तेव्हा एक – दुस-याशी संपर्क करण्याकरिता एका भाषेची गरज असते. ती गरज पूर्ण करण्यची क्षमता हिंदी भाषेत आहे. असे मत प्राचार्य (डॉ.) ए. एन. सादळे यानी व्यक्त केले. आजरा महाविद्यालयात हिंदी दिवसानिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की आपल्या भावना आणि विचारांना व्यक्त करण्याचे प्रमुख साधन म्हणजे भाषा होय. परंतु आपली मूळं आणि संस्कृती याना जोडण्याचं कामदेखील भाषाच करते. आणि हे काम हिंदी भाषा अत्यंत प्रभावीपणे करत आहे. तीच आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख आहे.
हिंदी दिवसानिमित्त हिंदी शब्दशोध, हिंदी शुद्ध लेखन, हिंदी कथाकथन व हिंदी वाक्यप्रचार लेखन स्पर्धांचे आयोजन हिंदी विभागामार्फत करण्यात आले होते. यातील विजेत्या स्पर्धकाना मान्यवरांच्या शुभहस्ते ग्रंथ, पेन व पुष्प देऊन गौरविण्यात आले. स्पर्धांमधील विजेते (अ) हिंदी शब्दशोध – प्रथम क्रमांक – वंदना भागोजी कस्तुरे, द्वितीय क्रमांक – नागेश लक्ष्मण गाडीवड्डर, तृतीय क्रमांक- माधुरी उदय कांबळे, (आ) शुद्ध लेखन – प्रथम क्रमांक तेजल तानाजी कांबळे, द्वितीय क्रमांक हर्षाली किरण पारके, तृतीय क्रमांक —स्मिता बळवंत आडसोळ, (इ) हिंदी कथाकथन प्रथम क्रमांक तमन्ना जबिला जमाल, द्वितीय क्रमांक – विठ्ठल बयाजी वरक, तृतीय क्रमांक-अथर्व उदय सुतार, (ई) वाक्यप्रचार लेखन – प्रथम क्रमांक – विठ्ठल बयाजी वरक, द्वितीय क्रमांक- तेजल तानाजी कांबळे, तृतीय क्रमांक वंदना भागोजी कस्तुरे.
स्वागत व प्रास्ताविक प्रो. (डॉ.) अशोक बाचुळकर यानी केले. श्रीमती संजीवनी कांबळे यानी आभआर मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रत्नदीप पवार यानी केले. यावेळी व्होकेशनल विभागाचे पर्यवेक्षक श्री. मनोज पाटील, मराठी विभागप्रमुख प्रो. (डॉ.) आनंद बल्लाळ, श्री. शेखर शिऊडकर, ज्युनियर विभागाचे श्री. विनायक चव्हाण, श्री. अनिल निर्मळे व विद्यार्थी उपस्थित होते.
🛑तालुकास्तरीय स्पर्धेत आजरा हायस्कूल क्रीडाविभागाचे सुयश.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा हायस्कूल आजरा प्रशालेचे तालुकास्तरीय स्पर्धेत क्रीडाविभागाचे सुयश. या क्रीडा स्पर्धा क्रीडासंकूल, आजरा येथे पार पडल्या. तालुकास्तर कबड्डी स्पर्धेमध्ये १७ वर्षे वयोगट मुले, खो खो स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगट मुली, खो-खो १७ वर्षे वयोगट मुले या संघांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. या सर्व विजयी विदयाथ्याना क्रीडा शिक्षक एम. एस. गोरे, सो. एम. पी. चव्हाण यांनी अनमोल मार्गदर्शन केले. या सर्व विदयार्थ्यांना जनता शिक्षण संस्थेचे चेअरमन अशोकअण्णा चराटी, सर्व संचालक, सल्लागार, मुख्याध्यापक ए. एल. तोडकर, उपमुख्याध्यापक सी. एच. एस. कामत, पर्यवेक्षक ए. व्हसकोटी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आर. प्रोत्साहन मिळाले.
🟣जंगल क्षेत्रावरील ( आकेशिया व निलगिरी ) – या विदेशी प्रजातीची झाडे काढून देशी प्रजातीची वृक्ष लागवड करावी – सरपंच परिषद मुंबई शाखा आजरा.
आजरा.- प्रतिनिधी

सन १९९० च्या दशकामध्ये डोंगरी प्रदेशामध्ये वृक्षाछादन वाढावे या उद्देशाने शासनाने वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवला होता, त्यामध्ये आकेशिया व निलगिरी अशा प्रकारच्या विदेशी प्रजातींच्या झाडांची मोठ्या प्रमाणात लागण करण्यात आली होती. या झाडांच्यामुळे डोंगररांगा अच्छादीत झाल्या परंतु या झाडांच्या पानझडीमुळे त्याखालील जमिनीचा नैसर्गिक पोत बदलून त्या आम्लयुक्त व्हायला लागल्या आहेत. याबाबत सरपंच परिषद मुंबई शाखा आजरा यांनी आजरा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सदर वृक्षांचा परिणाम, गवत उगवणीवर तर झालाच परंतु जमिनीतील जीवजंतुंच्या जीवनचक्रावर देखील झाल्याचे निदर्शनास येत आहे. जंगलामध्ये प्राण्यांसाठीचा चारा/गवत हे पुरेसे उपलब्ध नसलेने वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा शेत पिकाकडे वळवलेला आहे. आणि त्यामुळे शेतपीकांचे अतोनात नुकसान वन्यप्राण्यांकडून होत असून शेतकरी हवालदील झाला आहे.
विदेशी प्रजातीच्या लागवडीमुळे जमिनी नापिक होऊन जमिनीतील जीवजंतूंच्या जीवनचक्रावर परिणाम होऊन विविध वन्यजीवांच्या अन्नसाखळ्यांवर ताण येत आहे.
विदेशी वृक्षामध्ये (आकेशिया, निलगिरी) जमिनीतील पाणी शोषुन घेण्याची क्षमता तीव्र असल्याने जमिनीतील पाणी साठ्यामध्ये घट होण्याचे प्रमाण वाढून भुजल पातळी खालावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पाणी टंचाईसारख्या समस्या उद्भवताना दिसत आहेत.
३० ते ४० वर्षे आर्युमान असणाऱ्या आकेशिया / निलगिर या विदेशी वृक्षांची लागण महाराष्ट्र शासनाच्या (वन विकास महामंडख FDCM) या विभागाद्वारे सन १९९० ते १९९५ या कालावधीमध्ये आपल्या भागातील (आजरा / गडहिंग्लज / चंदगड/गारगोटी/राधानगरी ) जंगलामध्ये करणेत आली आहे. त्यांचे आर्युमान पूर्ण झाले असलेने सदरच्या ठिकाणचे वृक्ष काढनू त्याठिकाणी देशी प्रजातींच्या झाडांची लागण करणे गरजेचे आहे.
गेले तीन ते चार वर्षे सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) मार्फत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आवजा पुरतरण संवर्धनासाठीचे विविध उपक्रम राबवले जातात त्यामध्ये देशी प्रजातीची वृक्ष लागवड, त्याचबरोबर वणवा निर्मुलन मोहीम, यासारख्या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनामध्ये काम महाराष्ट्र मध्यवर्ती कार्यालय करत असताना, असे लक्षात आले की, सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये असलेल्या झाडांच्या विदेशी प्रजाती ( आकेशिया/गिलगिरी ) कमी करुन त्याठिकाणी देशी प्रजातीची वृक्षलागवड करणे अत्यंत गरजेचे आहे. तरच वन्य जीवांच्या अन्नसाखळ्या सदृढ होऊन वनसंपदा समृध्द होईल.

त्यासाठी आकेशिया व निलगिर या प्रजातींची झाडे काढून त्याठिकाणी देशी प्रजातींची लागण करणेसाठीचा उपक्रम शासनस्तरावर प्रभाविपणे राबविणेत यावा अशी विनंती सरपंच परिषद मुंबई शाखा आजरा यांनी केली आहे.
यावेळी सुभाष एल. सावंत यांनी पंचायत समिती आजरा गट विकास अधिकारी पदाचा पदभार स्विकारला त्याचबरोबर आजरा तालुक्याचा अतिरिक्त भार असलेले पंचायत समिती गडहिंग्लजचे गट विकास अधिकारी संतोष नागरिळक यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम पंचायत समिती कार्यालयामध्ये यथोचित पणे सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) च्या वतीने पार पडला. सरपंच परिषदेच्या महिला तालुकाध्यक्षा (पेरणोली सरपंच) सौ.प्रियांका जाधव व जिल्हा कार्यकारीणी सदस्या ( मलिग्रे सरपंच ) शारदा गुरव यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. तालुका उपाध्यक्ष विलास जोशिलकर (सरपंच मेंढोली) व सुलगावचे सरपंच पांडूरंग खवरे यांचे हस्ते नागटिळक यांचे कार्याबद्दल आभार/अभिनंदन व्यक्त करण्यात आले. चांगल्या कार्याच्या अपेक्षा सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष जी. एम. पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी सहा.गट विकास अधिकारी दिनिश शेटे सो, टि.पी.ओ कुंभार साहेब, वेळवट्टीचे सरपंच मारुती पवार ,हरपवडे सरपंच सागर पाटील,चाफवडेचे सरपंच धनाजी दळवी, दाभिलचे सरपंच – युवराज पाटील,. मुरुडेचे सरपंच – अनिल पाटील, बुरुडेच्या सरपंच वैशाली गुरव,पोळगावच्या सरपंच – सौ. माधुरी गुरव, होनेवाडीच्या सरपंच. प्रियांका आजगेकर, बेलेवाडीच सरपंच – पांडूरंग कांबळे, हतिवडे सरपंच सौ. शकुंतला सुत्तार, पेरणोलीचे उपसरपंच संकेत सावंत, कासार कांडगांवच्या सरपंच सौ. सुनंदा गुरव, देऊळवाडीच्या सरपंच सौ.यशोदा पवार, बुरुडेचे उपसरपंच सुनिल बागवे आदी उपस्थित होते.
