Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रडॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन चा स्तुत्य उपक्रम. ( ग्रामीण बालकलाकारांना...

डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन चा स्तुत्य उपक्रम. ( ग्रामीण बालकलाकारांना भविष्यात चित्रपटात संधी. अभिनेता व कास्टिंग डायरेक्टर अमोल दोरुगडे )

डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन चा स्तुत्य उपक्रम. ( ग्रामीण बालकलाकारांना भविष्यात चित्रपटात संधी. अभिनेता व कास्टिंग डायरेक्टर अमोल दोरुगडे )

उतूर :- वार्ताहर

डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन व विद्यार्थी विकास परिषद, कोल्हापूर महाराष्ट्र राज्य विभागीय कार्यालय, उत्तूर यांची वतीने आयोजित कलाकार आपल्या भेटीला कलाकारांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद ही कार्यशाळा उतूर येथील वसंतरावदादा पाटील विद्यालयात येथे उत्साहात पार पडली.

उतूर येथील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कलाकारांशी हितगुज साजत कलाक्षेत्रात यशस्वी कसे होता येईल यांचे माहिती देऊन भविष्यात ग्रामीण भागातील बालकलाकारांना येणाऱ्या आगामी मालिका व चित्रपटासाठी नक्कीच संधी देऊ व डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन हा स्तुत्य उपक्रम असून यांचा उपयोग विद्यार्थ्यांनी करून घ्यावा असे मत अभिनेता व कास्टिंग डायरेक्टर अमोल दोरुगडे यांनी व्यक्त केले. तर झी टीव्ही होम मिनिस्टर फेम एन के बाबा यांनी आपण लिहलेल्या गाण्याचे सादरीकरण करत विद्यार्थ्यानी ध्येय व जिंद्दीच्या जोरावर यशस्वी होता येईल ग्रामीण भागातच मोठे मोठे कलाकार लपलेला असतात त्याचे उदाहरणासह माहिती देऊन विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.

उद्घाटन लोकनियुक्त सरपंच किरण आमणगी सर यांनी केले. युवा उद्योजक अश्विन भुजंग, ग्रामपंचायत सदस्य संदेश रायकर, सामाजिक कार्यकर्त्या अरुणा दोरुगडे, लोककला महोत्सव समिती कार्याध्यक्ष गणपती नागरपोळेसर यांच्या प्रमुख उपस्थितीत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस एस कांबळे हे होते. कार्यक्रमाचे उदघाट्न लोकनियुक्त सरपंच किरण आमंणगी सर यांनी करून या सारख्या कार्यशाळातुनच आपल्याला नव नवीन शिकण्यास मिळते अशीच आजची कार्यशाळा चित्रपट सृष्टीतील दादासाहेब फाळके हेही कोल्हापूर येथीलच असून त्यांनी चित्रपट सृष्टीचा पायाला रचला,असे मत व्यक्त केले.
पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन अध्यक्ष डॉ. सचिन पोवार यांनी केले. मुख्याध्यापक एच. एस. कांबळे, सदेश रायकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आर व्ही थोरवत, डी व्ही मोहिते, विठ्ठल कदम, आनंदा हसबे, उत्तम तोरगले, नितीन ससाणे, कु.गडकरी मॅडम, तेजस्विनी पाटील, कल्पना भाईगडे आदी उपस्थित होते. सूत्र संचालन एच. एस. हळवणकर यांनी तर आभार ए.व्ही. गुरव मॅडम यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.