श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान.- आजरा प. स. आरोग्य विभाग
आजरा.- प्रतिनिधी.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय मुंबई यांच्या पत्रानुसार. आजरा तालुक्यामध्ये दि.२७/०८/२०२५ ते ०५/०९/२०२५ या कालावधीत समुदाय आरोग्य शिबीरे अंतर्गत श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान ४ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २७ उपकेंद्रा मध्ये राबविण्यात आला. त्यामध्ये
१) रक्तदान शिबीरे.
२) गोल्डन कार्ड
३) आभा कार्ड.
४) वंदना गोल्डन कार्ड
५) अवयवदानचे फॉर्म भरुन घेणे ६) प्लॅस्टीक मुक्ती बाबत जनजागृती करणे
७) ECG काढणे
८) नेत्र तपासणी
९) कर्करोग तपासणी.
१०) रक्तदाब/मधुमेह तपासणी या तपासण्या सार्वजनिक गणेश मंडळामध्ये करण्याबाबत कळविले होते.
त्यास अनुसरुन आजरा तालुक्यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळामध्ये पुढीलप्रमाणे लाभार्थीची आरोग्याचे शिबीरे घेऊन तपासण्या करण्यात आल्या.
१) एकूण शिबीरे – ११७
२) एकूण बाह्यरुग्ण तपासणी-५००९
३) ECG काढणे-७२४) गोल्डन कार्ड-६०३
५) आभा कार्ड-६६४
६) वंदना गोल्डन कार्ड-५७.
७) अवयवदानचे फॉर्म भरणे-५२२
८) कर्करोग तपासणी-२९४
९) रक्तदाव/ मधुमेह तपासणी-२२५२
१०) नेत्र तपासणी – ३५७
११) रक्तदान केलेले एकूण लाभार्थी – २८५ इ. कार्याक्रम तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पंचायत समिती आजरा यांच्या सुचनेनुसार ४ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २७ उपकेंद्रा मध्ये राबविण्यात येऊन तालुक्यातील सर्व संबंधीत लाभार्थीना आरोग्याच्या तपसाणी करुन सेवा देण्यात आलेल्या आहेत.
या श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियाना साठी तालुक्यातील सर्व वैद्यकिय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी यांनी या मोहिमेअंतर्गत लाभार्थी यांची तपासणी करुन मोलाचे सहकार्य केले आहे. तसेच तालुक्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळानी मोलाचे सहकार्य या अभियाना अंतर्गत केलेले आहे. याबाबत डॉ. आर. जी, गुरव तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती आजरा यांनी याबाबत सर्वांचे आभार व्यक्त केलेले आहे. तसेच पुढील भविष्यात येणाऱ्या आरोग्याच्या कार्यक्रमास असेच सहकार्य मिळणेबाबत इच्छा व्यक्त केली.
