Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रलाटगांवातील समाज मंदिरांची दर्शनी भिंत कोसळली.( समाज मंदिर नव्याने बांधून मिळावे समाज...

लाटगांवातील समाज मंदिरांची दर्शनी भिंत कोसळली.( समाज मंदिर नव्याने बांधून मिळावे समाज बांधवांची मागणी.)

लाटगांवातील समाज मंदिरांची दर्शनी भिंत कोसळली.
( समाज मंदिर नव्याने बांधून मिळावे समाज बांधवांची मागणी.)

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा लाटगांव येथील समाज मंदिरांची भिंत दि. २९ रोजी रात्री कोसळली असून नव्याने समाज मंदिरांची उभारणी करुन द्यावी. अशी मागणी येथील समाज बांधवांनी केली आहे‌.

या समाज मंदिरांचे बांधकाम १९९६/९७ साली झालं होतं मंदिराला २९ वर्ष पूर्ण झाली आहेत. अती पावसाने व बांधकाम जीर्ण झाल्याने मंदिराच्या समोरील भिंत पडली असून समाज मंदिरामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुर्ती आहे.‌

सद्यस्थितीत पावसाचे प्रमाण अधिक असल्याने शिल्लक बांधकाम देखील कोसळू शकत यापूर्वी ग्रामपंचायत स्तरावर लोकप्रतिनिधी यांच्याकडे नव्या समाज मंदिराची वेळोवेळी मागणी केली होती. परंतु याकडे दुर्लक्ष झाले आहे.‌ तेव्हा आता तरी समाज मंदिरात नव्याने बांधण्यात यावे. अशी मागणी शासनाकडे समाज बांधवांनी केली आहे.‌ यामध्ये मसणू कांबळे विष्णू कांबळे, धोंडीबा कांबळे, विश्राम कांबळे, महादेव कांबळे, संजय जाधव, आप्पा सदू कांबळे, विष्णु कांबळे, आप्पा कृष्णा कांबळे सह समाज बांधवांनी तात्काळ या समाज मंदिराकडे प्रशासनाने पहावे व नव्याने बांधकाम करून द्यावे असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.