Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजऱ्यात मराठी बांधवांचं.- मराठा योद्धा - मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा.-...

आजऱ्यात मराठी बांधवांचं.- मराठा योद्धा – मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा.- लाक्षणिक उपोषण.

आजऱ्यात मराठी बांधवांचं.- मराठा योद्धा – मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा.- लाक्षणिक उपोषण.

आजरा.- प्रतिनिधी.

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात आजरा तालुका मराठा बांधवांच्या व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आजरा तहसीलदार कार्यालय समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण दि १ रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी चालू असलेल्या आझाद मैदान वरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सदरचे उपोषण असल्याचे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात निघालेले मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल होऊन. आज तीन दिवस झाले आहेत.

जरांगे पाटील हे आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत.
दि. २९ रोजी पहाटेच मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो वाहनांनी मुंबईमध्ये प्रवेश केला आहे.

दोन वर्षांपूर्वी आरक्षणाची मागणी घेऊन मुंबईत आलेल्या मराठ्यांना मुंबईच्या वेशीवरूनच परत जावं लागलं होत. मात्र आज मुंबईतील आझाद मैदानावर आज मराठ्यांचं भगवं वादळं धडकलं आहे. ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे, तसेच सग्यासोयऱ्यांचा जीआर तात्काळ काढावा. अशा प्रमुख मागण्यांसाठी मराठा समाज एल्गार करत आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा बांधव मुंबईतील आझाद मैदानावर एकवटले आहेत. यांना पाठिंबावर सरकारने तात्काळ सर्व मागण्या मान्य कराव्या अशी मागणी सरकारकडे आंदोलकांनी केली आहे. या आंदोलनात बंडोपंत चव्हाण, संभाजी सरदेसाई, प्रकाश शिंदे, जयवंत सुतर, राजू होलम, सौ. नीलम इंजल, युवराज पोवार, सुनील शिंदे, कृष्णा पाटील, संभाजी हरेर, शामराव भादवणकर, आनंदा घंटे, अनिकेत चराटी, संजय पाटील, अमोल भांबरे, सुरेश सावंत, उत्तम कदम, संभाजी इंजल, संजय हरेर, प्रभाकर कोरवी, सह तालुक्यातील मराठा बांधवां सह सर्व जाती धर्माच्या नागरिकांचा सहभाग आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.