आजऱ्यात शिवसेनेच्या प्राथमिक व क्रियाशिल सभासद नोंदणीचा सुरवात.- नाम. प्रकाश आबिटकर संपर्क कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील शिवसेना संपर्क कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूब कल्याण तथा पालक मंत्री कोल्हापूर यांच्या सुचनेनुसार शिवसेनेच्या प्राथमिक व क्रियाशिल सभासद नोंदणीचा सुरवात उपजिल्हा प्रमुख राजेंद्र सावंत यांच्या उपस्थितीत व तालुका प्रमुख संजय पाटील यांचे हस्ते करणेत आली.
त्या प्रसंगी आजरा जि. प. संपर्क प्रमुख जितेंद्र भोसले उपतालुका प्रमुख काकासो देसाई आत्मा कमिटी आध्यक्ष इंद्रजीत देसाई शहर प्रमुख विजय थोरवत माजी ग्राम पंचायत सदस्य दयानंद निऊंगरे, युवराज पाटील, सुनिल दिवेकर, रणजीत सरदेसाई, विजय कोंडुस्कर व इतर पदाधीकारी उपस्थीत होते त्या प्रसंगी तालुका प्रमुख संजय पाटील यांनी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री नाम.श्री. शिंदे यांचे हात बळकट करणेसाठी पहिल्या टप्यात पाच हजार प्राथमिक सदस्य नोंदणी करणार आसून एक हजार क्रियाशिल सदस्य नोंदणी या चार दिवसात पूर्ण करणार असे आदेश आहेत.
अजूनही या शिवसैनिकांना सभासद फॉर्म मिळाले नाहीत. त्यांनी मा नामदार प्रकाश आबीटकर संपर्क कार्यालय आजरा येथे उपलब्ध केले आहेत संतोष भाटले विजय थोरवत यांचेशी संपर्क साधावा आसे अवाहन केले आहे.
