Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रश्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे शालेय वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन.🟣कै. पांडूरंग बिडकर गुरूजी यांचे...

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे शालेय वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन.🟣कै. पांडूरंग बिडकर गुरूजी यांचे स्मृतीप्रित्यर्थ खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.

🟣श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे शालेय वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन.
🟣कै. पांडूरंग बिडकर गुरूजी यांचे स्मृतीप्रित्यर्थ खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.

🟣श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे शालेय वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन.

आजरा.- प्रतिनिधी.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा (जि. कोल्हापूर) संचालित ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत सांस्कृतिक मंचतर्फे आजरा तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. मंगळवार दिनांक १६ सप्टेबर २०२५ रोजी सकाळी १०.३० डॉ. जे. पी. नाईक सभागृह आजरा येथे संपन्न होणार आहे.

स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे.-
कै. लक्ष्मण धोंडिबा पाटील शालेय वक्तृत्व स्पर्धा (प्राथमिक गट) इयत्ता ५ वी ते ७ वी

विषय- १) स्वच्छता काळाची गरज
२) माझा भारत देश
३) जीवनात व्यायामाचे महत्व
४) ‘मृत्युंजय’ कार शिवाजी सावंत
५) आमुची माऊली संत ज्ञानेश्वर
कै. रमेश वामन टोपले शालेय वक्तृत्व स्पर्धा (माध्यमिक गट)

इयत्ता ८ वी ते १० वी

विषय –
१) ‘मृत्यंजय’ कारांचा कर्ण
२) भारतीय संस्कृती
३) आरोग्यम धनसंपदा
४) मोबाईल, ए आय आणि आपण
५) पुस्तकांची संगत… वाढेल आयुष्याची रंगत

दोन्ही गटांसाठी विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना अनुको १५०१, १२०१, १००१ व स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रत्येक शाळेला प्रत्येक गटासाठी दोन स्पर्धक पाठविता येणार आहेत. स्पर्धकांनी आपली नावे १५ सप्टेबर २०२५ पर्यंत शाळेमार्फत वाचनालयाकडे नोंदवावीत असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत, उपाध्यक्षा विद्या हरेर, कार्यवाह कुंडलिक नावलकर व सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी यांनी केले आहे.‌

🟣कै. पांडूरंग बिडकर गुरूजी यांचे स्मृतीप्रित्यर्थ खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.

आजरा.- प्रतिनिधी.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा (जि. कोल्हापूर) संचालित ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत सांस्कृतिक मंचतर्फे ग्रंथालयाचे माजी अध्यक्ष के पांडुरंग बिडकर (गुरूजी) यांचे स्मृतिप्रित्यर्थ खुली वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा बुधवार दिनांक १७ सप्टेबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता डॉ. जे. पी. नाईक सभागृह आजरा येथे संपन्न होणार आहे.

स्पर्धेसाठी विषय

१. ‘युगंधर’ : जीवनाची व्यापक मांडणी
२. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारत
३. अरण्यऋषी मारूती चितमपल्ली
४. ऑपरेशन सिंदूर
५. अवकाश संशोधक जयंत नारळीकर

विजेत्या प्रथम पाच कमांकांना अनुक्रमे रोख रूपये ५००१, ४००१, ३००१, २००१, १००१ व स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. भाषणासाठी १० मिनिटे वेळ दिला जाईल स्पर्धा सर्वासाठी खुली असुन मराठी भाषेत होईल स्पर्धकांनी स्पर्धेला स्वखर्चान येणेचे असून स्पर्धेसाठी प्रवेश फी नाही. स्पर्धकांकडे स्वतःचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी आपली नावे १५ सप्टेबर २०२५ पर्यंत नोंदवावीत असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अध्यक्ष वामन सामंत, उपाध्यक्षा विद्या हरेर, कार्यवाह कुंडलिक नावलकर व सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी यांनी केले आहे.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.