Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र गोकुळ दूध संघाच्या अडीअडचणी – दूध संलग्न वाढीविषयी उद्या आजऱ्यात मार्गदर्शन मेळावा.-...

गोकुळ दूध संघाच्या अडीअडचणी – दूध संलग्न वाढीविषयी उद्या आजऱ्यात मार्गदर्शन मेळावा.- चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली होणार संपर्क सभा.🟣सभासदांचा विश्वास, शिस्तबध्द सहभाग व एकजूट हेच रवळनाथ संस्थेचे भांडवल : अभिषेक शिंपी.

Oplus_131072

गोकुळ दूध संघाच्या अडीअडचणी – दूध संलग्न वाढीविषयी उद्या आजऱ्यात मार्गदर्शन मेळावा.- चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली होणार संपर्क सभा.
🟣सभासदांचा विश्वास, शिस्तबध्द सहभाग व एकजूट हेच रवळनाथ संस्थेचे भांडवल : अभिषेक शिंपी.

🟣गोकुळ दूध संघाच्या अडीअडचणी – दूध संलग्न वाढीविषयी उद्या आजऱ्यात मार्गदर्शन मेळावा.- चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली होणार संपर्क सभा.

आजरा.- प्रतिनिधी.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाशी संलग्न असणाऱ्या आजरा तालुक्यातील प्राथमिक सहकारी दूध संस्थांचे चेअरमन, संचालक मंडळ, सदस्य व सचिव यांची संपर्क सभा शनिवार दि. २३/८/ २०२५ रोजी दुपारी १ वा. अण्णा भाऊ सांस्कृतिक हॉल आजरा हायस्कूल आजरा येथे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर सभेस दूध संघाच्या अडीअडचणी व दूध संकलन वाढीविषयी विषयाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या सभेला माजी चेअरमन विश्वास पाटील, अरुण डोंगळे, तसेच संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर , कार्यकारी संचालक योगेश गोडबोले आदी उपस्थित राहणार आहेत. तरी संपर्क सभेत वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

🟣सभासदांचा विश्वास, शिस्तबध्द सहभाग व एकजूट हेच रवळनाथ संस्थेचे भांडवल : अभिषेक शिंपी.
( संस्थेला २५ लाखांवर नफा : रवळनाथ पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत.)

आजरा : प्रतिनिधी.

Oplus_131072

श्री रवळनाथ पतसंस्था ही स्वतःची आहे अशी भावना आपल्या सर्वाच्या मनात आहे. त्यामुळे आपला विश्वास, शिस्तबध्द सहभाग व एकजूट हेच आपल्या संस्थेचे भांडवल आहे. संस्थेला आर्थिक वर्षात २५ लाखांवर नफा झाला असून मागील वर्षापेक्षा चालू आर्थिक वर्षात संस्थेला साडेपाच लाखांवर जादा नफा झाला आहे. ठेवीमध्येही ६ कोटीने वाढ झाली असून सध्या संस्थेकडे २१ कोटींवर ठेवी असल्याचे प्रतिपादन चेअरमन अभिषेक शिंपी यांनी केले ते संस्थेच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक व जि. प. चे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी प्रमुख उपस्थित होते.
संस्था सभागृहात संस्थेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. स्वागत संस्थेचे मॅनेजर विश्वास हरेर यांनी केले. श्रध्दांजलीचा ठराव संचालक इब्राहीम इंचनाळकर यांनी मांडला. पुढे अध्यक्षस्थानावरून बोलताना अध्यक्ष अभिषेक शिंपी म्हणाले, गेल्या वर्षभरात बँकेने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. ठेवींमधे वाढ होत असून कर्ज वितरणात पारदर्शकता ठेवली आहे. हळदी-कुंकू कार्य क्रमाच्या माध्यमातून महिलांचा सहभाग वाढवून बचतीच्या माध्यमातून ठेवी सुरू केल्या आहेत. भविष्यात या माध्यमातून महिलांकरिता एखादा उदयोग उभारण्याकरिता मदत होणार आहे. चांगल्या वसुलीमुळे चांगला नफाही झाला असून याचे सर्व श्रेय केवळ संचालक मंडळालाच नव्हे तर प्रत्येक सभासदाला जाते ही एक सामुदायिक शक्ती असून संस्थेला प्रगतीपथावर नेण्याकरिता याहीपुढे आपण सर्वांनी विश्वास ठेवून अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढवून ठेवी वाढविण्यावरोवरच कर्जे यासह संस्थेच्यावतीने राबविण्यात येणारया विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वाचे सहकार्य व मदतीची गरज असल्याचे स्पष्ट केले.


आपली संस्था नुसती आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून ती लोकजीवन उन्नत करणारी, रोजगार निर्माण करणारी आणि समाजाला आधार देणारी चळवळ असून भविष्यात डिजीटल बैंकिंग सेवा सुरू करण्यासह शेतकरी, उदयोजकांना आर्थिक मदतीचा हात देणे, पर्यावरण उपक्रम राबविण्याचेही नियोजन असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सभेपुढील विषय व अहवाल वाचन संस्थेचे मॅनेजर विश्वास हरेर यांनी केले. यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना संचालक मंडळाकडून समर्पक उत्तरे देण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक जयवंतराव शिंपी यांनी मार्गदर्शन केले.
सभेत सभासदांच्या दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत पााल्यांचा व ज्येष्ठ सभासदांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचे संस्थापक जयवंतराव शिंपी यांचाही सत्कार संस्थेच्यावतीने संस्थेचे सभासद के. जी. पटेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
सभेला व्हा. चेअरमन समीर गुंजाटी, सर्व संचालक यासह सचिन शिंपी, एस. पी. कांबळे, आप्पासो पाटील, सदाशिव डेळेकर, विलास पाटील, अहमदसाब मुराद, अशोक पोवार, सिकंदर दरवाजकर, हुसेन दरवाजकर यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संचालक विक्रम पटेकर यांनी मानले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.