सर्व मुद्द्यांसाठी का? झाली नाही. ग्रामसभा .- सखोल चौकशी झाली पाहिजे.- गिजवणे ग्रामस्थांचे गटविकास अधिकारी पं. स. गडहिंग्लज यांना निवेदन
( अन्यथा ग्रामस्थ गिजवणे यांचे ग्रामपंचायतीच्या समोर आत्मक्लेश आंदोलन.)
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.
सर्व मुद्द्यांसाठी ग्रामसभा झाली पाहिजे होती. पण अशी ग्रामसभा न झाल्याने याची सखोल चौकशी झाली पाहिजे याबाबत गिजवणे ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी पं. स. गडहिंग्लज यांना निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
१) गिजवणे ग्रामपंचायतीच्या आज दि २० ऑगस्ट २०२५ रोजी कोरम पूर्ण असलेली ग्रामसभेतून सरपंच उपसरपंच व काही सदस्य उठून जातात सरपंच म्हणतात उठून जाताना म्हणतात की ग्रामसभेचा अध्यक्ष सचिव म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी हे असणार आहेत. असे कोणतेही अधिकार सरपंच यांना नाहीत. आजची ग्रामसभा ग्रामपंचायत अधिकारी यांनी पुढे चालू ठेवणे गरजेचे व आवश्यक होते. ग्रामपंचायत अधिकारी यांनी उपस्थित सदस्य यातील एक जणाला अध्यक्ष करून ग्रामसभा पुढे चालू करायला हवी होती. ते न करता ते सभेतून उठून गेलेले आहेत.
२)आज दि. २० रोजी कोरम पूर्ण असलेली आजची सुरू असलेली ग्रामसभा सर्व मुद्द्यांसाठी झाली पाहिजे होती. मात्र ती झालेली नाही. याबाबतीत सखोल चौकशी झाली पाहिजे
३)आपण यात लक्ष घालून सखोल चौकशी करावी. अन्यथा आम्ही गिजवणे ग्रामस्थ गिजवणे ग्रामपंचायतीच्या समोर आत्मक्लेश आंदोलन करणार आहोत.
ग्रामसभा पुढे सुरू राहिली पाहिजे होती. ग्रामसभेचा कोरम पूर्ण झालेला व उपस्थिती पूर्ण झालेली होती. याची नोंद घ्यावी. असे असताना ग्रामसभा रितसर व्हिडिओ शूटिंग मध्ये व पोलीस बंदोबस्तात सुरू होती.
वेगवेगळ्या मुद्द्यांची चर्चा चालू झाली व ती पूर्ण होत असताना मधूनच या ग्रामसभेतून सरपंच व काही सदस्य उठून गेलेले आहेत. त्यावेळी सरपंचांनी सांगितले आहे की, आजच्या ग्रामसभेचे अध्यक्ष सचिव हे असणार आहेत. हे कायदेशीरदृष्ट्या बरोबर व कायदेशीररित्या योग्य नाही. कायद्यामध्ये अशी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे आजची ही ग्रामसभा पुढे चालू राहिली पाहिजे होती. यामध्ये लोकशाही व संविधानिक मार्गे शांतते चर्चा झाली. पाहिजे होती. गिजवणे ग्रामपंचायतीच्या आज रोजीची कोरम पूर्ण असलेली ग्रामसभेतून सरपंच उपसरपंच व काही सदस्य उठून जातात. सरपंच म्हणतात उठून जाताना म्हणतात की ग्रामसभेचा अध्यक्ष सचिव म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी हे असणार आहेत. असे कोणतेही अधिकार सरपंच यांना नाहीत. आजची ग्रामसभा ग्रामपंचायत अधिकारी यांनी पुढे चालू ठेवणे गरजेचे व आवश्यक होते. यावेळी सौ.शशिका संजय पोटजाळे,सौ.वर्षा किरण पाटील व सौ.सुगंधा सुभाष कुंभार हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्या शेवटपर्यंत ग्रामसभेत उपस्थित होते. ग्रामपंचायत अधिकारी यांनी यातील एक जणाला अध्यक्ष करून ग्रामसभा पुढे चालू करायला हवी होती. ते न करता त्यांनी आजची ग्रामसभा घेतलेली नाही आहे. कोअर पूर्ण असलेल्या ग्रामस्थांची सर्वांची इच्छा होती. की आजच ही ग्रामसभा झालेली पाहिजे . रोजगार व शेतीचे कामे व इतर व्यवसाय कामे सोडून आम्ही सर्वजण ग्रामसभेला ग्रामपंचायतीने ठरवलेल्या दिवशी आज आलो होतो.
त्यावेळी उपस्थित कोरम पूर्ण झालेला होता. त्यानुसार व्हिडिओ शूटिंग ही ग्रामसभेचे झालेले आहे. मात्र ग्रामसभा ही झालेली नाही. गिजवणे ग्रामस्थ जे ग्रामसभेला उपस्थित होते. त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. तरी या सर्व घडामोडीची म्हणजे आजच्या ग्रामसभा न होण्याची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. ग्रामपंचायत बरखास्त तिचा प्रस्ताव शासनाकडे व वरिष्ठांकडे पाठवून द्यावा. नियमानुसार सुरू असलेली ग्रामपंचायतीची ग्रामसभा पुढे सुरू करून. शांततेत लोकशाही मार्गाने व संविधानिक मार्गाने मुद्द्यांची चर्चा झाली पाहिजे होती. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर.गणेश कळेकर, जनार्दन तोडकर, सागर शिंदे, मानतेश बन्नी, स्वप्नील कोरी, अभिनंदन पाटील, प्रभात साबळे, प्रकाश कडुकर, नेताजी बरकाळे, किशोर साबळे,अनिल सुतार, संतोष माने, सचिन लोहार,बंडा पाथरवट सह काही ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
चौकट.
सरपंच सौ. पौर्णिमा कांबळे.
आजची ग्रामसभा ही सर्व विषयावर व्यवस्थित चर्चा झाली. नागरिकांची प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित दिली. असा कोणताही प्रकार या ग्रामसभेत झालेल्या नाही. विरोधी ग्रामस्थांनी सुरळीत चाललेल्या कामात अडथळा आणण्याचा केविलवाना प्रयत्न आहे.. निवेदनात दिलेला असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सरपंच सौ. पोर्णिमा कांबळे यांनी माहिती दिली..
