🟣सरपंच मानधन रक्कमेतून शाळेतील विध्यार्थ्यांना स्वेटर वाटप.- सुळेरान ग्रुप ग्रामपंचायत
🟣स्वामी विवेकानंद नागरी पतसंस्था. आजरा- कर्मचारी यांना भरघोस वेतनवाढ कर्मचारी संघटना व संस्था व्यवस्थापनामध्ये करार.
🟣भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक – प्रा. राजा माळगी.- आजरा महाविद्यालय व्याख्यानमाला.
🟣सरपंच मानधन रक्कमेतून शाळेतील विध्यार्थ्यांना स्वेटर वाटप.
( आजरा – सुळेरान ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच शशिकांत कांबळे यांचा अनोखा उपक्रम.)
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील सुळेरान ग्रुप ग्रामपंचायत येथे हर घर तिरंगा या कार्यक्रमाचे अवचीत्त साधून ग्रामपंचायत सुळेरान येथे दि १४ रोजी सरपंच शशिकांत कांबळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत वि. म. सुळेरान, वि. म. धनगरमोळा व वि. म. घाटकरवाडी येथील सर्व विध्यार्थ्यांना आपल्या सरपंच मानधनाच्या रक्कमेतून ३५ स्वेटर वाटप केली.
सद्या पावसाळी थंडीमुळे सदर स्वेटर घेताना विध्यार्थी व पालक, ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी सुळेरान मुख्याध्यापिका सावंत मॅडम, धनगरमोळा मुख्याध्यापिका कोंडुसकर मॅडम व घाटकरवाडी मुख्याध्यापक परीट सर गावातील अंगणवाडी सेविका व मदतनीस उपसरपंच जयश्री जयसिंग पाटील, सदस्य मायकल बारदेस्कर व सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष दिपक पाटकर, वन कमिटी अध्यक्ष तानाजी जाधव, माजी सदस्य सुरेश पाटील, जयसिंग पाटील, माजी सदस्य दिलीप खरुडे, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष गंगाराम मेगुलकर, माजी पोलीस पाटील शिवाजी पाटील, ग्रामपंचायत अधिकारी सुर्यकांत जाधव व ग्रा.प. कर्मचारी बावतीस बारदेस्कर चंद्रकांत खरुडे आणि ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. तसेच याच कार्यक्रमामध्ये वि.म. सुळेरान शाळेसाठी हेल्पिंग हँड्स युध सर्कल या संस्थेमार्फत विध्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य सौरभ पाटील, प्रथमेश गाईगंडे व राजेश पाटील यांच्या मार्फत प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ग्रामपंचायत अधिकारी श्री जाधव यांनी केले. या प्रसंगी ग्रामस्थ व कर्मचारी यांनी मनोगत व्यक्त केली. हा विभाग तुलनात्मक दुर्गम आहे. या भागात सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यक्रम घेण्यात आला. दि.१४ ऑगस्ट ध्वजवंदन नंतर सदर स्वेटर वाटप कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे पालकांच्या कडून कौतुक होत आहे.
🟣स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या, आजरा कर्मचारी यांना भरघोस वेतनवाढ कर्मचारी संघटना व संस्था व्यवस्थापनामध्ये करार.
आजरा.- प्रतिनिधी.

राज्यस्तरीय पतसंस्था असलेली स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पत संस्था कर्मचारी यांना सुमारे रुपये ५० लाखाची भरघोस वेतनवाढ देणेत आली. कर्मचारी संघटना व संस्था व्यवस्थापना मध्ये २०२५ ते २०२७ या तीन वर्षाकरीता करार झाला. सदरची वेतन वाढ ही दिनांक – ०१/०१/२०२५ पासुन लागु केली जाणार असलेचे संस्थेचे चेअरमन श्री. दयानंद सिध्दाप्पा भुसारी यांनी सांगीतले.
वेतनवाढ करारावर व्यवस्थापन व कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी यांनी स्वाक्ष-या केल्या. सदरची वेतन वाढ ही रुपये ५,१६६ ते ९,४४० इतकी भरीव देणेत आली आहे. संस्थेच्या प्रगती मध्ये कर्मचारी यांची भुमीका अत्यंत महत्वाची असते. कर्मचारी यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन कर्मचारी यांना दिलेली वेतनवाढ ही केवळ आर्थिक फायदा नसुन कर्मचाऱ्या करीता एक प्रकारची प्रेरणा व सन्मान असलेचे संस्थेचे चेअरमन श्री. दयानंद सिध्दाप्पा भुसारी यांनी सांगीतले.
संस्थेचे ३१ मार्च २०२५ अखेर वसुल भागभांडवल रु ४,६०,२१,२०० एकूण ठेवी -रुपये-१७०,३९,६७,७४५ कर्जवाटप रुपये १५५,४४,८८,१९९, खेळते भांडवल रु-२१०,२९,१७,५८० व निव्वळ नफा रु १,११,२०,९०२ इतका आहे.
कर्मचारी पगारवाढ करारावेळी संस्थेचे. चेअरमन दयानंद भुसारी, व्हा.चेअरमन सुधीर कुंभार, संचालक नारायण सावंत, रविंद्र दामले, रणजित पाटील, शिवाजीराव येसणे, गणपत जाधव, विश्वजित मुंज, राजेंद्र चंदनवाले, सुधिर चोडणकर, मुकुंद कांबळे, संचालिका सौ. सुनिता कुंभार, सौ. सारीका देसाई, सुकाणु समिती सदस्य मलिककुमार बुरुड, अरुण देसाई, उतम कुंभार संस्थेचे जनरल मॅनेजर अर्जुन कुंभार, कर्मचारी संघटना उपाध्यक्ष जोसेफ लोबो, संस्थेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कर्मचारी संघटना उपाध्यक्ष जोसेफ लोबो यांनी आभार मानले.
🟣भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक – प्रा. राजा माळगी.
( आजरा महाविद्यालयात कै. क्रांतिसिंह नाना पाटील व्याख्यानमाला संपन्न.)
आजरा – प्रतिनिधी.

भारतीय स्वातंत्र्य चळवळ आपल्याला खऱ्या अर्थाने समजून घ्यायची असेल तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. राजा माळगी यांनी नुकतेच येथे व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि जनता एज्युकेशन सोसायटीच्या आजरा महाविद्यालयातील मराठी विभाग व विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने कै. क्रांतिसिंह नाना पाटील व्याख्यानमालेअंतर्गत साताऱ्याच्या प्रतिसरकारच्या चळवळीचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान या विषयावर प्रा. माळगी बोलत होते.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांचे अत्यंत मोलाचे योगदान असून देखील समाजाला आज त्यांचा पूर्णपणे विसर पडलेला आहे. त्यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त कोठेही मोठा कार्यक्रम झालेला नाही.
इंग्रजी राजसत्तेला आव्हान देताना सुमारे दीड हजार गावातील जनतेने इंग्रजी सत्तेला विरोध करून तब्बल शेहेचाळीस महिने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारला पाठिंबा दिला होता. धुळ्याचा खजिना लुटल्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्या लुटलेल्या खजिन्यातील पै पै चा हिशोब देणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे व्यक्तिमत्त्व आजच्या पिढीला समजणे गरजेचे आहे. इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी स्वतःचे पाच हजाराचे सैन्य उभे करणारे, त्यांच्यासाठी शस्त्र प्रशिक्षण केंद्र उभे करणारे, स्वतःची स्वतंत्र न्यायव्यवस्था स्थापन करणारे, सत्यशोधक समाजाच्या विचारांनी महिलांना वागवणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अनन्यसाधारण असे आहे. सध्याच्या स्वार्थी राजकारणाच्या प्रवाहात क्रांतिसिंह नाना पाटील यांचे कार्य प्रेरणादायी असे आहे, असे प्रा. माळगी शेवटी म्हणाले.
संचालक कृष्णा येसणे म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी अनेकांचे योगदान समजून घेणे आणि त्याची जाण ठेवणे, ही आपली जबाबदारी आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांनी केले. प्रा. विनायक चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. रमेश चव्हाण यांनी तर विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी आय. के. पाटील, प्रा. दिलीप भालेराव, उपप्राचार्य डी. पी. संकपाळ, पर्यवेक्षक मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते संपत देसाई त्याचबरोबर मोठ्या संख्येने शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

