Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रगोकुळच्या नव्या पशुखाद्य गोडावून चा शुभारंभ संपन्न. ( गोकुळ च्या संचालिका श्रीमती...

गोकुळच्या नव्या पशुखाद्य गोडावून चा शुभारंभ संपन्न. ( गोकुळ च्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांचे शुभहस्ते. )🛑व्यक्तिमत्व व कौशल्य विकास प्रशिक्षण.- आजरा महाविद्यालय.🟣केंद्रसरकारने ट्रॅक्टर व ट्रॉलीला ब्लॅकबॉक्स बसवणे बंधनकारक केलेल्या निर्णयाला विरोध दर्शवणेबाबत.- आजरा उबाठा सेनेचे निवेदन.

🛑गोकुळच्या नव्या पशुखाद्य गोडावून चा शुभारंभ संपन्न. ( गोकुळ च्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांचे शुभहस्ते. )
🛑व्यक्तिमत्व व कौशल्य विकास प्रशिक्षण.- आजरा महाविद्यालय.
🟣केंद्रसरकारने ट्रॅक्टर व ट्रॉलीला ब्लॅकबॉक्स बसवणे बंधनकारक केलेल्या निर्णयाला विरोध दर्शवणेबाबत.- आजरा उबाठा सेनेचे निवेदन.

गोकुळच्या नव्या पशुखाद्य गोडावून चा शुभारंभ संपन्न. ( गोकुळ च्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांचे शुभहस्ते. )

आजरा.- प्रतिनिधी.

कोल्हापूर जिल्हा सह. दुध संघाच्या (गोकुळ) च्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या पशुखाद्य गोडावून चा शुभारंभ गोकुळ च्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांच्या हस्ते मोठया उत्साहात पार पडला. यावेळी कोल्हापूर जिल्हा बँकेचे व आजरा साखरचे संचालक सुधीर देसाई प्रमुख उपस्थित होते. वेळवट्टी (ता. आजरा) च्या फाटयावर हे गोडावून सुरू करण्यात आले आहे. प्रारंभी डॉ. धनाजी राणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यक्रमात भादवणवाडी येथील महालक्ष्मी दुध संस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सौ. स्वाती पाटील यांचा सत्कार गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना श्रीमती अंजनाताई रेडेकर म्हणाल्या आजरा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पशुखाद्य वेळेवर पोहोचले जात नव्हते. ब-याच संस्थेच्या तक्रारी येत होत्या. संघाकडून मोठ्या ट्रकने पशुखाद्य पुरविले जाते. छोटया छोटया वाडीवस्त्यांवर या कामाला अडथळा येतो. वेळेवर पशुखाद्य पोहोचत नाहीत त्यामुळे संस्थांची व दुध उत्पादक शेतक-यांची होणारी अडचण लक्षण घेवून छोटया गाडीने त्यांना वेळेवर पशुखाद्य पुरविण्याच्या दृष्टीने आज-यामध्ये गोडावून सुरू करण्यात आले आहे. यामुळे संस्थांना नियमित व वेळेवर पशुखाद्याचा पुरवठा होईल असा विश्वास त्यांनी दिला. यावेळी बोलताना श्री.देसाई म्हणाले आजऱ्याचा पश्चिम भाग हा डोंगराळ व दुर्गम आहे. येथे पशुखाद्य वेळेवर पोहोचत नाही त्यामुळे येथील संस्थांनी केलेल्या मागणीची दखल घेवून रेडेकर मॅडमनी हे केंद्र सुरू केल्याबद्दल आभार मानले. या कार्यक्रमाचे आभार सिध्दार्थ तेजम यांनी मांडले. या कार्यक्रमाला लहु पाटील, किरण पाटील, गिता उत्तुरकर, विष्णू पाटील, अशोक पाटील, उदय झित्रे, नागोजी तानवडे, अशोक बोलके, वर्षा होडगे, उज्वला पोतनीस, प्रणिती पाटील यांच्यासह पश्चिम विभागातील विविध दुध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

🛑व्यक्तिमत्व व कौशल्य विकास प्रशिक्षण.- आजरा महाविद्यालय.

आजरा.- प्रतिनिधी.

जनता एज्युकेशन सोसायटी आजरा संचालित, आजरा महाविद्यालय आजरा येथे तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या वविद्यार्थिनींसाठी महाविद्यालयाच्या IQAC व कॉम्प्युटर सायन्स (संगणकशास्त्र) विभागाच्या वतीने दिनांक ५ ऑगस्ट २०२५ ते १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत ‘Employability Enhancement and Youth Livelihood’ हा कौशल्यवृद्धी करणारा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला.

नांदी फौन्डेशन पुणे यांच्या महिंद्रा प्राईड क्लासरूम या प्रकल्पाच्या माध्यमातून या सात दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करणेत आले. या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यामातून विद्यार्थीनीना रोजगार प्राप्त करण्यासाठी आवश्यक त्या सर्व कौशल्यांचा वृद्धीसाठी प्रशिक्षित केले गेले. नांदी फौन्डेशन चे प्रशिक्षण समन्वयक श्री. पंकज दंडगे आणि प्रशिक्षक श्रीमती. हिमानी सावंत यांच्या सहाय्याने हा प्रशिक्षण वर्ग सुफळ संपन्न झाला. या प्रशिक्षणातून सहभागी विद्यार्थिनींचे कौशल्य विकसित होऊन त्यांना त्याचा उपयोग पुढील व्यावसायिक जीवनात होणार आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी संस्थेचे चेअरमन अशोकअण्णा चराटी यांच्यासह सर्व संचालक मंडळाची प्रेरणा मिळाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे व कार्यालय अधिक्षक योगेश पाटील तसेच विज्ञान, वाणिज्य व बी. सी. ए. विभागातील सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

🟣केंद्रसरकारने ट्रॅक्टर व ट्रॉलीला ब्लॅकबॉक्स बसवणे बंधनकारक केलेल्या निर्णयाला विरोध दर्शवणेबाबत.- आजरा उबाठा सेनेचे निवेदन.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

केंद्रसरकारने ट्रॅक्टर व ट्रॉलीला ब्लॅकबॉक्स बसवणे बंधनकारक केलेल्या निर्णयाला विरोध दर्शवणेबाबत.आजरा उबाठा सेनेचे आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.‌ केंद्रीय रस्त्ये आणि वाहतुक महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांनी घेतलेल्या नवीन निर्णयामुळे विमानाप्रमाणे ट्रॅक्टर व ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स बसवणे बंधनकारक केले आहे. दि. 18 जूलै 2025 जीएसआर 485(ई) या मसुदेची अधिसुचना जाहिर केली. या मसुदेप्रमाणे विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर व ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स बसवणे बंधनकारक केले आहे. ब्लॅक बॉक्स हा ट्रक, चारचाकी किंवा विमानामध्ये वापरले जाते. यामध्ये (ईडीआर) इव्हेंट डेटा रेकॉर्ड असे म्हणतात. हे उपक्रम वाहनातील सर्व माहिती साठवून ठेवते. हा ब्लॅक बॉक्स नावाने जरी ब्लॅक असला तरी याचा रंग हा काळा नसून केशरी किंवा पिवळा असतो. यामध्ये मायक्रोचिप, सेन्सर, डेटा चिप असते तर काही मॉडेल मध्ये जीपीएस प्रणालीसुद्धा असते. हे उपक्रम अपघातानंतर वाहनाची हालचाल, वेग, ब्रेकिंग, इंजिनची माहिती इ. गोष्टींची नोंद करून ठेवते. विमानामध्ये ब्लॅक बॉक्स असल्यामुळे इंजिनची स्थिती, वेग, दिशेतील बदल यासारखी माहिती मिळते. तर हे उपक्रम आता ट्रॅक्टरमध्ये बसवणे बंधनकारक केले आहे.

मालवाहतुक ट्रॅक्टरमध्ये अपघात झालाच तर या ट्रॅक्टरचा वेग किती होता, ब्रेक कितीवेळ दाबला गेला. ट्रॅक्टरने दिशा अचानक का बदलली, अशा सर्व प्रश्न उत्तरे पोलिस व विमा कंपनी यांना मिळू शकणार आहेत. त्यामुळे अपघाताचे खरे कारण लक्षात येईल असा केंद्र सरकारचा दावा आहे. पण उपकरणाला बसवण्यासाठी साधारणता पन्नास हजार खर्च अपेक्षित आहे. यामध्ये ब्लॅकबॉक्स एआयएस 140 प्रमाणित जीपीएस याची किंमत 8 ते 15 हजार आहे. यामध्ये जीपीएस बसवणे 1 ते 2 हजार वसीमकार्डमध्ये वार्षिक रिचार्ज 1200 ते 2500 येऊ शकतो. या नंतर ब्लॅकबॉक्सची किंमत 15000 ते 25000 आहे. तो बसवण्याची मजूरी 2000 ते 3000 इतकी असते. आणि ट्रॉलीसाठी कपलिंग सिस्टीम लावायची तर त्याची किंमत 5000 ते 10000 असते. या जोडणीसाठी 500 ते 1000 पर्यंत खर्च येतो. या सर्व खर्च पाहिला तर कमीतकमी 31000 ते जास्तीत जास्त 56000 च्या घरात जातो. सध्या शेतक-यावर निर्णय लागू जरी केले नसले तरी टप्प्याटप्याने हे लागू केले जातील जस की जीपीएस चा निर्णय । आक्टोंबर 2026 पासून व ईडीआरचा निर्णय 1 एप्रिल 2027 पासून अमलात येईल अशी माहिती आहे. सध्या या निर्णयाचा मसूदा प्रसिद्ध केला आहे. 18 ऑगस्ट 2025 पर्यंत हरकत मागवल्या आहेत.

तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या निर्णयाच्या विरोधात असून शेतकऱ्याच्या पाठिशी ठाम उभा आहे. तरी हा निर्णय रद्द नाही केला तर शिवसेना केंद्र सरकारच्या विरोधात ट्रॅक्टर मोर्चा घेऊन याला विरोध करेल. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, ता. प्रमुख युवराज पोवार, गिरणी कामगार संघटनेचे शांताराम पाटील, हिंदुराव कांबळे, युवा सेनेचे महेश पाटील, अमित गुरव, सुयश पाटील, प्रशांत वंजारे, सह युवा सेना शिवसेना पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.