Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजी - माजी सैनिक समस्या निवारण - सैनिक अदालत.- आजरा तहसील कार्यालयात...

आजी – माजी सैनिक समस्या निवारण – सैनिक अदालत.- आजरा तहसील कार्यालयात संपन्न.

आजी – माजी सैनिक समस्या निवारण – सैनिक अदालत.- आजरा तहसील कार्यालयात संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील आजी – माजी सैनिक समस्या निवारणकरिता मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान कोल्हापूर अंतर्गत आजरा ता. आजी – माजी सैनिक संघटना यांच्या वतीने आजरा तहसिलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. २३ रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात बैठक आयोजित केली होती.

यावेळी बोलताना तहसीलदार श्री माने म्हणाले आपल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी आपल्या कोणकोणत्या तक्रारी आहेत. त्या एकत्र पत्र द्यावं, परंतु एखाद्या कामाबाबत लागणारी कागदपत्रे काय जोडले आहे काय कमी आहे. कोणत्या कारणाने प्रलंबित आहे. यांची माहिती घ्यावी. तुमच्याकडे किती कामाचे अर्ज आहेत. जमा करा योग्य कागदपत्रे असतील तर आठ दिवसात आपले प्रलंबित काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु असे तहसीलदार श्री माने बोलताना म्हणाले.
स्वागत व प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय मोहिते यांनी आजी माजी सैनिकांच्या व्यथा मांडताना म्हणाले. आरोग्याबाबत, तसेच बहिरेवाडी येथील स्मारक, पंचायत समिती मधील विषय, पोलीस स्टेशन यांच्याकडे काही तक्रारी आहेत. त्याची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे असे श्री मोहीते म्हणाले.

Oplus_131072

यावेळी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, उपाध्यक्ष दिनकर जाधव, सुरेश हासबे, कृष्णा पाटील, तानाजी उत्तुरकर, अरविंद देसाई, दत्तात्रय सावंत, जोतिबा शेटे, निवृत्ती कुंभार, संभाजी घाटगे, विर पत्नी सह आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन दयानंद पाटील यांनी केले. आभार उपाध्यक्ष श्री जाधव यांनी मानले.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.