Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा आगाराला नवीन पाच बस. - रक्षाबंधनच्या शुभमुहूर्तावर केले पूजन.( पालकमंत्री ना....

आजरा आगाराला नवीन पाच बस. – रक्षाबंधनच्या शुभमुहूर्तावर केले पूजन.( पालकमंत्री ना. आबिटकर यांच्या प्रयत्नांना यश.)

आजरा आगाराला नवीन पाच बस. – रक्षाबंधनच्या शुभमुहूर्तावर केले पूजन.
( पालकमंत्री ना. आबिटकर यांच्या प्रयत्नांना यश.)

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील आजरा आगारात महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नाने व २४ एप्रिल २०२५ या तारखेच्या आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने, प्रवासी संघटना यांनी व नागरिकांनी केलेल्या मागणीवरून आज आजरा एस. टी, डेपो, महाराष्ट्र परिवहन मंडळ आजरा डेपोला पाच नवीन बस मिळाल्या आहेत. त्या गाडीचे पूजन आज दुपारी तीन वाजता आजरा स्टॅंडवर पूजन करण्यात आले.

यावेळी ता. प्रमुख संजय पाटील, सुधीर कुंभार, इंद्रजीत देसाई यांनी शासनाचे तसेच नाम. आबिटकर, परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांचे मनोगतातून अभिनंदन केले.


यावेळी भाजप ता. अध्यक्ष अनिकेत चराटी, अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, शहर प्रमुख विजय थोरवत, तसेच संतोष भाटले जोतिबा आजगेकर, गौरव देशपांडे, नाथ देसाई, सचिन इंदुलकर, पांडुरंग सावरतकर, मंदार बिरजे, राहुल नाईक, शंतनु पाटील, ऋतिक बिरजे, सार्थक कुंभार, श्रीनयन थोरवत,जावेद पठान, महेश दळवी, सह प्रवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.‌

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.