पाटपन्हाळे ता. गुहागर येथील ग्रामस्थ यांचे दि. १५ ऑगस्ट रोजी उपोषण – जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना निवेदन.
( ३ वर्षा पासून शृंगारतळी, मधील पिकअप शेड स्ट्रीट लाईट कामे प्रलंबित.का? )
गुहागर.- प्रतिनिधी.
पाटपन्हाळे ता. गुहागर येथील ग्रामस्थ यांचे दि. १५/०८/२०२५ रोजी उपोषणाला बसणेबाबत जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना पाटपन्हाळे ग्रामपंचायत सरपंच व ग्रामस्थ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ग्रामपंचायत पाटपन्हाळे हद्दीमध्ये गेली ३ वर्ष शृंगारतळी बाजारपेठ मधील पिकअप शेड व शृंगारतळी बाजारपेठ मधील स्ट्रीट लाईट हि दोन्ही कामे राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत पूर्ण न झाल्यामुळे येथील ग्रामस्थ खूप आक्रमक झालेले असून आतापर्यंत येथील ग्रामस्थांना संबधित विभागाकडून तोंडी आश्वासने देण्यात आली. सदर वरील दोन्ही कामाबाबत ग्रामपंचायतने राष्ट्रीय महामार्ग व मनीषा कन्स्ट्रक्शन यांना वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे.
परंतु संबधित विभागाकडून कोणतेही ठोस निर्णय घेतले जात नाहीत. तरी पाटपन्हाळे ग्रामस्थांचे असे म्हणणे आहे वरील दोन्ही प्रश्न गणपतीपूर्वी मार्गी लागणे अत्यंत महत्त्वाचे आहे व प्रत्यक्ष काम करणे आवश्यक आहे. तरी सदर वरील दोन्ही कामे प्रत्यक्षात सुरू होईपर्यंत ग्रामस्थ उपोषण सुरु ठेवणार आहेत. सदर उपोषण तहसीलदार कार्यालय गुहागर या ठिकाणी बसणार असल्याचे निवेदनात देण्यात आले आहे आहे. यावेळी सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.
