🟣अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या आजरा तालुकाध्यक्षपदी गुंडू परीट, शहराध्यक्षपदी अभिषेक रोडगी
🟥एकाच दिवशी, एकाच पदासाठी दोन वेगवेगळे आदेश.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये कोल्डवॉर? चर्चांना उधाण
🟥माधुरी ‘हत्तीण’ पुन्हा नांदणी मठात येणार. वनतारा सकारात्मक.- कोल्हापूरकरांच्या लढ्याचा विजय
🟣अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या आजरा तालुकाध्यक्षपदी गुंडू परीट, शहराध्यक्षपदी अभिषेक रोडगी
आजरा :- प्रतिनिधी.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या आजरा तालुकाध्यक्षपदी गुंडू मारुती परीट (एरंडोल) यांची तर आजरा शहराध्यक्षपदी अभिषेक सदानंद रोडगी यांची निवड करण्यात आली. ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आजरा येथे झालेल्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र मध्य प्रांत सदस्य ऍड. सुप्रियाताई दळवी, जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, ग्राहक पंचायतीचे मार्गदर्शक नाथ देसाई, जिल्हा कार्यकारणी सदस्य रामदास चव्हाण उपस्थित होते.
चौकट.
आजरा तालुक्याची नूतन कार्यकारणी.
गुंडू मारुती परीट (तालुकाध्यक्ष), देविदास कृष्णा सूर्यवंशी (तालुका उपाध्यक्ष), किरण केसरकर (तालुका उपाध्यक्ष), मंगेश परशराम पोतनीस (तालुका सचिव), विकास सुतार (तालुका सहसचिव), सचिन इंदुलकर (तालुका कोषाध्यक्ष), नाथ देसाई (तालुका निमंत्रित मार्गदर्शक), अभिषेक सदानंद रोडगी (आजरा शहराध्यक्ष), दीपक बल्लाळ (आजरा शहर उपाध्यक्ष), राजश्री सावंत (तालुका महिला अध्यक्षा), गीता पोतदार (तालुका महिला उपाध्यक्ष), दिपाली सुतार (तालुका महिला उपाध्यक्ष), ज्योती पांडव (तालुका महिला सचिव)
🟥एकाच दिवशी, एकाच पदासाठी दोन वेगवेगळे आदेश.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये कोल्डवॉर? चर्चांना उधाण
मुंबई :- प्रतिनिधी

एकाच दिवशी एकाच पदासाठी दोन आदेश आणि दोन्ही अधिकाऱ्यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे महायुती सरकारमध्ये नक्की काय चाललं आहे याची चर्चा चांगलीच रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभाग आहे. परंतु या दोन्ही विभागांनी एकाच पदासाठी दोन वेगवेगळे आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही आदेश एकाच दिवशी काढले आहे. त्यामुळे राज्य सरकारची मात्र अडचण झाली आहे. अशा वेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्डवॉर सुरू आहे का? अशी चर्चा रंगली आहे.
बेस्ट महाव्यवस्थापक पदावरून श्रीनिवास हे सेना निवृत्त झाले. त्यामुळे हे पद रिक्त होते. त्यामुळे यापदावर अतिरिक्त कार्यभार दोन अधिकाऱ्यांना दिल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. नगरविकास विभागाने बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरीक्त भार अश्विनी जोशी यांना दिला. तसा आदेशही आढण्यात आला. त्याच वेळी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने आशीष शर्मा यांना या पदाचा अतिरिक्त पदभार दिला. त्याबाबत आदेशही काढण्यात आला. हे दोन्ही आदेश एकाच दिवशी काढण्यात आले हे विशेष.
आता एकाच दिवशी म्हणजे 5 ऑगस्टला दोन अधिकाऱ्यांना अतिरिक्त पदभार दिल्याने, कुणाच्या आदेशाचे पालन करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून संघर्ष सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यात ही घटना घडल्यामुळे शिंदेंना शह देण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी ही नियुक्ती केली नाही ना? असंही बोललं जात आहे. हे सर्व प्रकार होत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई आणि दिल्लीमधील वाढत्या भेटीगाठींमुळे या चर्चांना आणखी बळ मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील अंतर्गत कलह उघडपणे समोर आला आहे. कारण एकाच दिवशी एकाच पदासाठी दोन आदेश आणि दोन्ही अधिकाऱ्यांना अतिरिक्त पदभार देण्यात आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
🟥माधुरी ‘हत्तीण’ पुन्हा नांदणी मठात येणार. वनतारा सकारात्मक.- कोल्हापूरकरांच्या लढ्याचा विजय
कोल्हापूर – प्रतिनिधी

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. वनताराचे साईओ विहान कर्णीक आणि नांदणी मठाचे मठाधिपती यांची बैठक पार पडली. या बैठकीत महादेवी हत्तीणीला परत कोल्हापुरात नांदणी मठात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूरकरांचा हा मोठा विजय आहे. महाराणी हत्तीणीला परत नांदणी मठात पाठवण्यात यावं यासाठी कोल्हापूरकर प्रचंड आक्रमक झाले होते. कोल्हापूरकरांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावरही पदयात्रा काढली होती. कोल्हापूरकरांच्या माधुरीप्रती असणाऱ्या भावना पाहता वनताराने माधुरी हत्तीणीला परत नांदणी मठात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूरवासियांच्या भावना दुखवण्याचा कोणताही उद्देश नव्हता, नांदणी मठाची माधुरी हत्तीण ही लवकरात लवकर कोल्हापुरात परतणार, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा शब्द वनताराच्या अधिकाऱ्यांनी दिला. नांदणी मठामध्ये माधुरीसाठी एक मदत पुनर्वसन केंद्र उभारणार असल्याचंही वनताराच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच माधुरीला परत आणण्यासाठी न्यायालयाकडे आवश्यक तो पत्रव्यवहार करू असंही वनताराकडून स्पष्ट करण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये पाठवण्यात आलं आहे. मात्र स्थानिक जनतेच्या मागणीनुसार हत्तीणीला परत पाठवण्याबद्दल वनतारानं सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्या संबंधी नांदणी मठाधिपती आणि वनताराच्या अधिकाऱ्यांमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली.
माधुरी हत्तीणीला नांदणी मठामध्ये परत पाठवण्यासंबंधी सर्व ती प्रक्रिया करणार, त्यासाठी अत्यावश्यक सर्व पत्रव्यवहार करणार असल्याचं वनताराचे सीईओ विहान करनी यांनी सांगितलं. वनतारा, सरकार आणि नांदणी मठाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नांदणी मठामध्ये माधुरीसाठी सर्व त्या सुविधा निर्माण करण्यात येतील आणि नंतर माधुरीला परत पाठवण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. नांदणी मठातील महाराणी हत्तीणीच्या विषयी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. वन्य प्राण्यांचा नियमांचा विचार करुन काही गोष्टी सुप्रीम कोर्टात मांडण्यात आल्या होत्या. तसेच महाराणी हत्तीणीला गुजरातच्या वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात सुप्रीम कोर्टाने अनुमती दिली होती. त्यानुसार वनताराकडून महाराणी हत्तीणीला नेण्यात आलं होतं. महाराणी ज्या दिवशी नांदणी मठ सोडून गेली त्यादिवशी तिच्यादेखील डोळ्यांत पाणी होतं. तसेच या हत्तीणीसोबत कोल्हापूरकरांच्या भावना आहेत.
