Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रपुणे येथील पीडित मुलींना न्याय मिळाला - तपास अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी.- आजरा...

पुणे येथील पीडित मुलींना न्याय मिळाला – तपास अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी.- आजरा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निवेदन.🟣ग्रामपंचायत मौजे आरळगुंडीच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करून – दोषींवर कारवाई व्हावी – संग्राम सावंत.

🛑पुणे येथील पीडित मुलींना न्याय मिळाला – तपास अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी.- आजरा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निवेदन.
🟣ग्रामपंचायत मौजे आरळगुंडीच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करून – दोषींवर कारवाई व्हावी – संग्राम सावंत.

🛑पुणे येथील पीडित मुलींना न्याय मिळाला – तपास अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी.- आजरा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निवेदन.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

पुणे येथील पीडित मुलींना न्याय मिळवून देण्याबाबत व या प्रकरणात सहभागी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करण्याबाबत. आजरा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका विवाहित महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून पुणे येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांकडे मदत मागितली. ४ – ५ मुलींनी तिला त्या मुलीचा जीव वाचावा म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली. आपत्कालीन परिस्थिती असल्यामुळे त्यातील २ मुलींनी सदर पीडित मुलीला आपल्या आपल्या खोलीवर एका रात्रीसाठी ठेवून घेतले व दुसऱ्या दिवशी सकाळी ती पीडित मुलगी निघून गेली. याबद्दल निवृत्त पोलीस उपनिरीक्षक असणाऱ्या त्या पीडित मुलीच्या सासऱ्यांनी या तीन मुलींच्या घरी व कामाच्या ठिकाणी पोलिस पाठवून त्या मुलींना धमकावले. या मुलींना बेकायदेशीरपणे पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच जातीयवाचक शिवीगाळ करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात मूळ पीडित मुलगी असणाऱ्या मुलीचा सासरी होणारा छळ, तिला मदत करणाऱ्या मुलींचा होणारा शारीरिक, मानसिक छळ आणि जातीवाचक शिवीगाळ या संपूर्ण गोष्टी अतिशय गंभीर आहेत. या प्रकरणात पुण्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करून एफ आय आर दाखल करून घेण्याची विनंती केली परंतु पोलिसांनी अतिशय बेजबाबदारपणे या मागणीकडे दुर्लक्ष केले.

गेले तीन दिवस अशी एफ आय आर नोंदवून घेतलेली नाही उलट अतिशय बेजबाबदारीची उत्तरे दिलेली आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या कार्यकर्त्यांना तब्बल चौथ्या दिवशी अप्पर पोलीस आयुक्त यांनी पोलिस निरीक्षकांकडून अशा प्रकारचा अॅट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करता येणार नाही असे लेखी दिले आहे. पोलीस अधिकाऱ्यांची ही कृती अतिशय गंभीर आणि पोलीस यंत्रणेच्या संवेदनशीलतेविषयी शंका निर्माण करणारी आहे.
या प्रकरणातील सर्व पिढीत मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी विविध मागणी केलेले आहेत. यामध्ये.

चौकट

१) या संपूर्ण प्रकरणात पीडित व्यक्ती असलेल्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून आपण तात्काळ हस्तक्षेप करावा आणि या मुलींना न्याय मिळवून द्यावा.
२) या मुलींना अयोग्य वागणूक देणाऱ्या आणि जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ व भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करावेत.

३) सदर सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी.

४)सासरच्या छळाने आश्रयासाठी बाहेर आलेल्या मूळ पीडित मुलीला संरक्षण व सुरक्षितेची खात्री द्यावी.

आमच्या या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास आम्हाला संविधानिक मार्गाने राज्यव्यापी जनआंदोलन करावे लागेल. तरी सदर गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल
घेऊन योग्य ती कारवाई करावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य कॉम्रेड काशिनाथ मोरे, शांताराम पाटील, संजय घाटगे, गीता पोतदार, दौलत राणे, भिकाजी कांबळे, हिंदुराव कांबळे, रघुनाथ काटकर सह समितीच्या सदस्यांच्या सह्या आहेत.

🟣ग्रामपंचायत आरळगुंडीच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करून – दोषींवर कारवाई व्हावी – संग्राम सावंत.

भुदरगड‌- प्रतिनिधी.

Oplus_131072

ग्रामपंचायत आरळगुंडीच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी. अशा मागणीचे निवेदन मुक्ती संघ समितीचे संग्राम सावंत व ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदन म्हटले आहे.
सन -२०२२/२३ ते सन -२०२४/२५ या कालावधीतील मागण्यांच्या संदर्भात सखोल व बिनचूक सविस्तर कारभाराची चौकशी करून दोषींवर ताबडतोब कारवाई झालीच पाहिजे. याबाबतीतला सविस्तर अहवाल व लेखी स्वरूपात संघटनेला मिळाला पाहिजे. या संदर्भातील निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर, गटविकास अधिकारी पंचायत समिती भुदरगड आणि ग्रामपंचायत आरळगुंडी यांना अनेक वेळा निवेदन दिलेली आहेत.मात्र कारवाई केली जात नाही.

तिमाजीनगर आरळगुंडी या गावामधील रस्त्या व गटर्स करताना बेकायदेशीर व अनाधिकृतपणे रस्ता रूंदीकरण करण्यासाठी मोडतोड व झाडे पाडून करून केलेला आहे. असे करणाऱ्या लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करणेबाबत

नागरिकांच्या खाजगी मालमत्तेवर खाज‌गी हक्क असेल आणि बेकायदेशीरपणे मोडतोड झाली असेल, तर ज्यांनी मोडतोड केलेली आहे.त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

सरपंच/ग्रामपंचायत अधिकारी व सर्व संबंधित सदस्य यांनी कायदेशीररित्या प्रक्रिया केलेली नाही.उलट अधिकार नसताना लोकांना बेकायदेशीर नोटीसा काढून नोटीस मधून बेकायदेशीर बाबींची प्रक्रिया केलेली आहे. म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.या मागण्यांसह इतर निवेदनातील सर्व मागण्यांसाठी तसेच मौजे आरळगुंडी येथील संबंधित ग्रामपंचायतीच्या कामाबाबत प्रशासकीय कारवाई झाली पाहिजे.गुरूवार दि.१४ ऑगस्ट २०२५ पासून गारगोटी पंचायत समिती कार्यालय समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत.

मौजे आरळगुंडी येथील संबंधित सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत अधिकारी व सदस्यांनी आणि गावातील काही लोकांनी अधिकार कक्षेबाहेर विषयात लक्ष घालून कारवाई व्हावी

ग्रामपंचायतीने गंभीर उणिवा व गैरप्रकार, अपहार, दप्तर उपलब्ध न होणे, खोटी व बनावट कागदपत्रे तयार करणे, याबाबत संबंधितीतांनी केलेल्या अनियमितता बाबतीत त्यांच्यावर प्रशासकीय चौकशी झाली पाहिजे. तसेच विविध मागण्यांच्या आधारे ग्रामपंचायत आरळगुंडी ता.भुदरगड यांच्या संदर्भातील झालेल्या कामांची सखोल चौकशी करून,स्वयंस्पष्ट कायदेशीर दृष्टीने अहवाल तयार करावा. ते दोषी असल्यास ग्रामपंचायत आरळगुंडी संदर्भात प्रशासकीय कारवाई झाली पाहिजे. आजपर्यंत ग्रामपंचायत,आरळगुंडी व पंचायत समिती,भुदरगड यांना दिलेला तक्रार अर्जानुसार व संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. आमच्या मागण्यांबाबतीत आम्ही मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने बेमुदत ठिय्या गुरुवार दि.१४/८/२०२५ रोजी पासून आरळगुंडी ग्रामपंचायत बाबतीतील विविध मागण्यांसाठी व होणाऱ्या दफ्तर दिरंगाई बाबतीत भुदरगड पंचायत समिती कार्यालयासमोर “बेमुदत ठिय्या आंदोलन” सुरू होणार आहे.
आतापर्यंत दिलेल्या तक्रार अर्ज व निवेदनाबाबतीत आणि आता बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत. निवेदनातील मागण्यांसंदर्भात गटविकास अधिकारी यांनी यात गांभिर्यपूर्वक लक्ष घालून याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारवाई केली जावी.याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना निवेदन दिले आहे.सुस्पष्ट व बीनचुक अहवाल पारदर्शकपणे आणि कायदेशीरदृष्ट्या तयार व्हावा.
यासाठी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू ठेवावे लागणार आहे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर मुक्ती संघर्ष समितीचे संग्राम सावंत, पारूबाई पाटील, पूजा पाटील, गीता पाटील, सारिका देवेकर, मीना पाटील, बयाबाई पाटील, शकुंतला जाधव, कृष्णा शेटके, रंजना पाटील, हिराबाई पाटील, मारूती अं. पाटील, युवराज पाटील, विनोद देवेकर, सुनिल जाधव, दत्तात्रय पाटील, रोहित पाटील, सौरभ पाटील, राजाराम पाटील, दयानंद पाटील, धनाजी शेटके, मारूती पाटील, दिंगबर विटेकरी, प्रमोद पाटील, राहुल दास; रामचंद्र दास; कृष्णा कांबळे सह ग्रामस्थांच्या सह्या आहेत
.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.