🟥राज्यातील अनेक भागात आज पावसाची शक्यता.- १७ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी..पहा..
🟣वैद्यकिय सेवा वेळेत न मिळाल्याने हरपवडे धनगरवाडा येथील रुग्णाचा मृत्यूस जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चौकशी करा. – आजरा उबाठा सेनेचे निवेदन.
🟥राज्यातील अनेक भागात आज पावसाची शक्यता.- १७ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी..पहा..
मुंबई :- प्रतिनिधी.
राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आजपासून राज्यातील काही भागांत पुन्हा एकदा पावसाचे आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने आज बुधवारी राज्यातील १७ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे, शेतीत आणि दैनंदिन जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता पुन्हा पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हवामान तज्ज्ञांनुसार, मान्सूनच्या विश्रांतीच्या काळात स्थानिक हवामान प्रणाली विकसित झाल्यामुळे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता निर्माण होत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. विशेषतः, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये चांगला पाऊस होऊ शकतो. नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि आवश्यक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषतः ज्या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तेथील लोकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडावे.
🟣वैद्यकिय सेवा वेळेत न मिळाल्याने हरपवडे धनगरवाडा येथील रुग्णाचा मृत्यूस जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चौकशी करा. – आजरा उबाठा सेनेचे निवेदन.
आजरा.,- प्रतिनिधी.

आजरा येथील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीन वैद्यकिय सेवा वेळेत न मिळाल्याने हरपवडे धनगरवाडा येथील रुग्णाचा मृत्यूस जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चौकशी करावी याबाबत आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तीन दिवसांपूर्वी हरपवडे येथील धनगरवाड्यावर एक नागरीक आजारी होता. त्याला उपचाराला नेताना रस्ता नसल्यामुळे वाड्यावर गाडी गेली नाही. शेवटी त्याला घोंगड्यावरुन रुग्णवाहीका उभी होती. तिथेपर्यंत न्यावे लागले. गडहिंग्लज येथे त्यांच्यावर उपचार झाले नाहीत. शेवटी त्याल सी.पी.आर मध्ये नेण्यात आले. सायंकाळी ५.०० वा कोल्हापूरात पोहचले. त्या ठिकाणी रुग्णशय्या उपलब्ध झाली नाही. रात्रभर तो रुग्ण अक्षरःश तडफडून तडफडून त्याचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाने आपला कारभार लोकांच्या लक्षात येवू नये म्हणून सकाळी ४.०० वा तो मृत्यू झाला होता तरी पण त्याला अतिदक्षता विभागात (ICU) मध्ये २ तास ठेवून नंतर मृत घोषित केले. हा सगळा प्रकार गंभीर व निषेधार्थ आहे. या जिल्ह्यात दोन मंत्री असूनही नागरिकांच्यावर अशी वेळ येते ही बाब शोभनिय नाही. तरी या सर्व प्रकाराला जबाबदार असणाऱ्या अधिकारी यांची चौकशी होवून योग्य ती कार्यवाही व्हावी. तसेच या धनगरवाड्यावर जाण्यासाठी रस्त्याची सोय नाही. त्यासाठी संबंधित विभागाला आदेश द्यावेत. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील तालुकाप्रमुख युवराज पोवार, तालुकाप्रमुख शिवाजी आढाव तसेच शिवसेना, युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
