Homeकोंकण - ठाणेउद्योजकांसाठी बारामती एमआयडीसीचे कार्य अग्रेसर : वैभव नावडकर प्रांताधिकारी🟣वंजारवाडी मध्ये इस्रो,नासा मध्ये...

उद्योजकांसाठी बारामती एमआयडीसीचे कार्य अग्रेसर : वैभव नावडकर प्रांताधिकारी🟣वंजारवाडी मध्ये इस्रो,नासा मध्ये निवड झालेल्या विद्यार्थी चा सन्मान🟣ग्राहकांना गुणवत्ता दर्जा देण्यासाठी कटिबद्ध: हनुमंत तांबे

🟣उद्योजकांसाठी बारामती एमआयडीसीचे कार्य अग्रेसर : वैभव नावडकर प्रांताधिकारी
🟣वंजारवाडी मध्ये इस्रो,नासा मध्ये निवड झालेल्या विद्यार्थी चा सन्मान
🟣ग्राहकांना गुणवत्ता दर्जा देण्यासाठी कटिबद्ध: हनुमंत तांबे

🛑उद्योजकांसाठी बारामती एमआयडीसीचे कार्य अग्रेसर : वैभव नावडकर प्रांताधिकारी
( वृषारोपन, स्वछता मोहीम व गुणवतांचा सन्मानाने एमआयडीसीचा वर्धापन दिन संपन्न.)

बारामती :- प्रतिनिधी

राज्यातील प्रत्येक उद्योग व उद्योजक टिकला पाहिजे त्याला सर्व प्रकारच्या सेवा सुविधा मिळाल्या पाहिजेत या साठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने केलेले कार्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे त्यामध्ये बारामती अग्रेसर असल्याचे प्रतिपादन बारामतीचे प्रांत अधिकारी वैभव नावडकर यांनी केले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा ६३ वा वर्धापन दिन (शुक्रवार ०१ ऑगस्ट २०२५) बारामती कार्यालय येथे संपन्न झाला.
या वेळी वैभव नावडकर मार्गदर्शन करत होते याप्रसंगी राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक संभाजी होळकर ,महाराष्ट्र चेंबर्स चे चेअरमन शरद सूर्यवंशी, बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन अध्यक्ष धनंजय जामदार व
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, कार्यकारी अभियंता विजय पेटकर व उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यालयाचे अधिकारी सचिन यादव,बाळराजे मुळीक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ चंद्रकांत महस्के, तहसीलदार गणेश शिंदे,गटविकास अधिकारी किशोर माने, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम,महावितरण चे कार्यकारी अभियंता सोलनकर व प्रकाश देवकाते , तालुका कृषी अधिकारी महेश हाके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता मनोज जगताप व विविध खात्यातील अधिकारी आणि एमआयडीसी चे अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय उपस्तीत होते.

बारामती एमआयडीसी ची स्थापना झाल्या पासून ते आज पर्यंत प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांचे योगदान आहे त्यामुळे वर्धापन दिन साजरा करताना कौटुंबिक स्नेह मेळावा च्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी म्हणून सदर कार्यक्रमाचे नियोजन केले असून या पुढेही उद्योग व उद्योजक यांना नेहमी सेवा सुविधा देण्यासाठी व बारामती एमआयडीसी प्रथम क्रमांकावर ठेवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी सांगितले

एमआयडीसी स्थापन झालेपासून ते आता पर्यंत राज्यातील प्रगती व बारामती मधील विकास यांचा आढावा घेऊन घेऊन मा. शरद पवार ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या योगदानाची माहिती मान्यवरांनी मगोगत मध्ये दिली.

एमआयडीसी अधिकारी व कर्मचारी यांचे पाल्य यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल व २५ वर्ष सेवा पूर्ण केल्याबद्दल कार्यकारी अभियंता बारामती विजयानंद पेटकर, उपअभियंता जेजुरी सिद्धार्थ कदम यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सकाळच्या सत्रात एमआयडीसी कॉलनी येथे वृषारोपन व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली
प्रास्ताविक सहायक अभियंता सौ. व्ही. जी. चौलंग यांनी केले.

राहुल लोंढे यांनी बासरी व पियानो वादन करून विविध गाणी सादर केली, वेबसिरीज ‘चांडाळ चौकटी’ च्या करामती मधील कलाकारांनी सामाजिक प्रबोधन करून तंटामुक्त ही नाटिका सादर केली
सूत्रसंचालन सावळेपाटील व आभार क्षेत्र महाव्यवस्थापक गणपत कोळेकर यांनी मानले.

चौकट:

बारामती एमआयडीसी स्थापन झाल्यापासून आशा प्रकारचा प्रथमच कार्यक्रम झाला असून कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांना सामावून घेतले, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून कौतुक केल्याबद्दल कर्मचारी व कुटूंबीय यांनी समाधान व्यक्त करून असे प्रेरक कार्यक्रम दरवर्षी व्याहवेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

🟣वंजारवाडी मध्ये इस्रो,नासा मध्ये निवड झालेल्या विद्यार्थी चा सन्मान

बारामती:- प्रतिनिधी.

दि.३ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वंजारवाडी येथे ग्रामपंचायत वंजारवाडी व स्नेहबंध प्रतिष्ठानच्या वतीने इस्रो आणि नासा निवड चाचणी परीक्षेच्या द्वितीय राऊंड मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व १० विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.जिल्हा परिषद शाळा वंजारवाडी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांन शालेय साहित्य वाटप करून सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.
ग्रामपंचायत वंजारवाडीच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर शहा यांचा सत्कार सरपंच जगन्नाथ वणवे यांच्या हस्ते सचिव सौ. अनिता काटकर यांचा सत्कार उपसरपंच सौ चिन्मयनंदा नितीन चौधर यांनी व सौ स्मृती शिंदे यांचा सत्कार मुख्याध्यापिका सौ सुरेखा भालेराव यांनी केला, प्रतिष्ठानचे क्रियाशील सदस्य मेजर अनिल कायगुडे यांचा सत्कार विद्यमान सदस्य सागर दराडे यांनी केला, तसेच सदस्य डॉ.युवराज जराड पाटील सत्कार विद्यमान सदस्य गोरख चौधर यांनी केला. यावेळी स्नेहबंध प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत वंजारवाडी चे ग्रामपंचायत अधिकारी निलेश लव्हटे, गावचे पोलीस पाटील पोपट राजाराम चौधर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष चौधर, जिल्हा परिषद शाळा वंजारवाडी अध्यक्ष सौ ज्योती वणवे, जि.प शाळा वंजारवाडी मा. अध्यक्ष संतोष चौधर, अशोक सूर्यवंशी, ग्रामस्थ पोपट जगताप, संदीप मालुसरे, व ग्रामस्थ उपस्तीत होते.
स्नेहबंध प्रतिष्ठानच्या वतीने सचिन वणवे आणि सौ अभिजीता जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. आभार वनिता भुतकर यांनी
मानले.

🛑ग्राहकांना गुणवत्ता दर्जा देण्यासाठी कटिबद्ध: हनुमंत तांबे
( सेंचुरी वाईन्स च्या वर्धापन दीना निमित्त विद्यार्थ्यांचा व गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मान.)

बारामती :- प्रतिनिधी.

अधिकारी व कर्मचारी यांनी गेल्या २५ वर्षात महत्वपूर्ण दिलेले योगदान आणि संतुष्ट व समाधानी ग्राहक हीच आमची खरी ओळख असून ग्राहकांना उत्तम दर्जा आणि गुणवत्ता देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन सेंचुरी वाईन्स प्रा .लि .चे चेअरमन हनुमंत तांबे यांनी केले.
पिंपळी येथील सेंचुरी वाईन्स प्रा लिमिटेड या कंपनीचा २५ वा वर्धापन दिना निमित्त (शनिवार ०२ ऑगस्ट) आयोजित कार्यक्रमात हनुमंत तांबे मार्गदर्शन करत होते.
या प्रसंगी सेंचुरी वाईन्सचे संचालक संदीप तांबे ,संचालिका आशाताई तांबे व प्रा. आर. डब्ल्यू. जोशी, डॉ चंद्रकांत खानावरे शुगर फॅक्टरीचे टेक्निकल डायरेक्टर टी.एम.कर्णे, अतिरिक्त अधीक्षक विक्रीकर विभागचे प्रकाश पाटील, गोदिया उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, चार्टड अकाउंटंट रोहित रानडे, संघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बारामती दिलीप शिंदे,पांडुरंग झगडे गुरुजी व्यवस्थापक विकास उदघट्टी आणि अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय आणि राज्यातील व इतर राज्यातील वाइनरी उत्पादक उपस्तीत होते.
२५ वा वर्धापन दिन हे केवळ निमित्त असून ग्राहकांनी दाखवलेला विश्वास ,दिलेली प्रेरणा व पाठींबा या मुळे यशस्वी व्यवसाय झालेला आहे व या पुढेही नवनवीन ग्राहक जोडत जाणार असल्याचे संचालक संदीप तांबे यांनी सांगितले.
सर्वसामान्य शेतकरी कौटुंबिक परिस्थिती असताना सुद्धा जिद्द, चिकाटी ,आत्मविश्वास या जोरावर शिक्षण घेऊन मुबंई, ठाणे परिसरात व्यवसायास संधी असताना सुद्धा हनुमंत तांबे यांनी आपल्या गावाकडील मातीशी इमान राखून व्यवसायाची गरुड झेप घेऊन स्थानिकांना रोजगार दिला व बारामती चे नाव व्यवसायाच्या माध्यमातून उज्वल केले असल्याचे विविध मान्यवरांनी मनोगत मध्ये सांगितले.
या प्रसंगी गुणवंत कर्मचारी यांचा कुटूंबा सहित सन्मान व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे
श्रीनिवास परेश वाघमोडे, उत्कर्षा डोंबाळे,हर्षदा जमदाडे,कुणाल जमदाडे आणि साहसी बाईक राईडर्स रोहित शिंदे यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले तर गायन सलीम सय्यद यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.