महाराष्ट्र परिवाहन महामंडळाच्या आजरा आगाराची परिस्थिती बिकट – किलोमीटरसाठी बाहेरच्या फेऱ्या कशासाठी.
( दिशाहीन आजरा – आगाराला व आगर प्रमुखांना दिशा देण्याची गरज.)
आजरा.- संभाजी जाधव.
आजरा येथील महाराष्ट्र परिवाहन महामंडळाच्या आजरा आगाराची परिस्थिती अत्यंत नाजूक असून आर्थिक अडचणीत आहे. याला जबाबदार तालुक्यातील प्रवासी नागरिक किंवा अन्य कोणीही नसून व्यवस्थापन व आगार प्रमुख आहेत. आजरा डेपो अशाच पध्दतीने अजून दोन चार महिने चालला तर आजरा आगार बंद होऊ शकतो.
याची वेगवेगळी कारणे आहेत. यामध्ये प्रामुख्याने तालुक्यातील स्थानिक नेहमीच्या फेऱ्या कमी करून किलोमीटर वाढण्यासाठी मुंबई पुणे अन्य ठिकाणी एसटीच्या फेऱ्या वाढवल्यामुळे गेलेले चालक / वाहक यांचा पगार देखील निघत नाही. परतीच्या प्रवासात आजरा आगारात एसटी आल्यानंतर शिल्लक रक्कम साधारणता डिझेल व कामगार पगार देखील निघत नाही. अशा फेऱ्या करून आजरा आगार अधिक किलोमीटर मिळवण्याच्या नादात आगाराला आर्थिक अडचणीत का? आणत आहे.
तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये अनेक फेऱ्या काही गावांमध्ये एसटीची नाहीत. कोल्हापूर वगळता. स्थानिक फेऱ्या तरी अधिक फायदा होऊ शकतो. परंतु असे न होता. मागील अनेक दिवसापासून नवे डेपो मॅनेजर व अधिकारी आल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण का? झाली. तालुक्यातील काही नागरिकांनी व संघटनांनी याबाबत वेळोवेळी जबाबदार डेपो मॅनेजर अधिकारी यांना सूचना दिल्या काही वेळा तहसीलदार यांनी देखील सूचना दिल्या असल्याची समजते. तरी देखील यामध्ये सुधारणा होताना दिसत नाही. ही परिस्थिती अशीच राहिली तर आजरा आगार बंद करण्याची वेळ येईल यासाठी तालुक्यातील सरपंच संघटनासह विविध संघटना शैक्षणिक संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना यामध्ये वेळेत लक्ष घालून आगार व्यवस्थापन प्रमुख अधिकारी यांच्याशी तहसील कार्यालयाच्या दालनात बैठक बोलवून याबाबत योग्य ती कारणे व मार्ग नाही काढला तर.. नक्कीच आपला आजरा आगार दोन-चार महिन्यांमध्ये आर्थिक अडचणीमुळे बंद होऊ शकतो. अशी परिस्थिती आहे.
तर दुसरीकडे बस स्थानकावरील कंट्रोल केबिन मधील कर्मचारी प्रवासी वर्गाला योग्य ती माहिती देत नाहीत. भ्रमणध्वनीवरून कॉल करून एसटी ची माहिती विचारल्यास सदर कॉल घेतला जात नाही. दहा कॉल केल्यानंतर एक कॉल घेतला जातो. दि. २९ रोजी सायंकाळी ५.३० वा. याबाबतचा काही अनुभव घेतला. चार मोबाईल वरून दहा कॉल केले तरी देखील कॉल घेऊन उद्धटपणे माहिती दिली जाते. खरी परिस्थिती काय आहे की पाहण्यासाठी बस स्थानकावर येऊन बाजूला उभारून कॉल केला असता संबंधित अधिकारी हे इतर कर्मचारी घेऊन चर्चा करत बसले असतात परंतु आलेल्या कॉल कडे बघत देखील नाहीत हा काय प्रकार आहे..
मागील मौजे चाफवडे ग्रामस्थांना उद्धटपणे उत्तरे दिल्यानंतर बस स्थानकावरती रास्ता रोको करण्यात आला होता. संबंधित कंट्रोलदार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. व त्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणा वरुन हरवण्यात आले होते. असे प्रकार सातत्याने या आगारात होत आहेत. आपण तालुक्यातील जबाबदार सुज्ञ नागरिक किंवा लोकप्रतिनिधी म्हणून वेळेत या आगाराकडे किंवा या व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांच्याकडे लक्ष नाही दिल्यास. आजरा आगार बंद पडल्यास आश्चर्य वाटू नये. याबाबत चालक वाहक किंवा अन्य कर्मचारी देखील योग्य अशी माहिती देत नाहीत. आपण आगार प्रमुखांना भेटा अशी उत्तरे दिली जातात. त्यामुळे नेमका काय प्रकार चालला आहे. हा समजेना पण किलोमीटरसाठी स्थानिक फेऱ्या बंद करून आर्थिक अडचणींचा सामना कशासाठी करत आहेत. तर दुसरीकडे काही वेळा वाहक चालक त्या – त्या प्रवासी बस स्थानकावर थांबले असताना व एसटीमध्ये प्रवासी नसताना देखील एसटी थांबवली जात नाही.. अशाही अनेक तक्रारी आहेत.
हे तालुक्यातील नागरिकांना शोधावे लागेल.. परंतु निश्चितपणे वेळेत याकडे लक्ष नाही दिल्यास..व तहसीलदार यांच्याकडे मागणी करून संबंधित विभागाला बोलून घेऊन याबाबत मार्ग काढावा व दिशाहीन झालेल्या आगारप्रमुखांना व आगाराला आगाराला दिशा द्यावी. अशी मागणी विद्यार्थी वर्ग व नागरिकांच्याकडून होत आहे.