🛑सतत विज खंडित – बील मात्र अधिकच..- मशीनरी प्रॉब्लेम व आर्थिकदृष्ट्या व्यावसायिक नुकसान.. महावितरणला काजू व्यावसायिकांचे निवेदन.
🛑 लोकनियुक्त सरपंच सौ. भारती डेळेकर यांना राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कार प्रदान.
💥सतत विज खंडित – बील मात्र अधिकच..- मशीनरी प्रॉब्लेम व आर्थिकदृष्ट्या व्यावसायिक नुकसान.. महावितरणला काजू व्यावसायिकांचे निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.

सतत विज खंडीत होते त्याच बरोबर कमी व्होल्टेज मुळे मशीनरी प्रॉब्लेम व आर्थिकदृष्ट्या व्यावसायिक नुकसान होत आहे. या बाबत विज मंडळ आजरा उपअभियंता अष्टेकर यांना निवेदन देताना असोसिएशन चे सदस्य प्रकाश कोंडूसकर, दीपक देसाई, दयानंद भुसारी, परेश पोतदार, उत्तम सलामवाडे, जयशिंग खोराटे, सुरेश चौगले, भास्कर निकम, विकास फळणेकर, निशांत जोशी, तानाजी बोलके, बाबुराव मांजरेकर, युवराज पोवार इतर या पूर्वी पण एक निवेदन दिले होते. याबाबत पुन्हा स्मरण पत्र म्हूणन पुन्हा निवेदन दिले आहे. तालुक्यातील घरगुती, इंडस्ट्रिअल, शेतीपंप याची मागणी आणि वापर याचा विचार करता अजून एक सबस्टेशन ची मागणी करावी. त्यासाठी योग्य जागा गायरान किंवा ग्रामपंचायत हद्दीतील उपलब्ध करुन दयावी लागेल, तसेच जंगल हद्दी मधून असलेल्या विद्युत वाहिनींवर पाऊसाळी सिजन मध्ये वादळ वाऱ्याने झाडे बेटे उमळून पडतात किंवा फांदया घासतात त्या साठी जंगल हद्दीमधून केबल टाकण्यात यावी, तसेच इथून पुढे पावसाळी सिजन पूर्वी सदर प्रश्न येऊ नये याची दक्षता घेऊन काम व्हावे तसेच वरिष्ठ कार्यलयाकडे केबल मागणी करावी. उपाभियंता अष्टेकर यांनी प्रश्न समजवून घेऊन उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी तालुक्यातील काजू व्यावसायीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🛑 लोकनियुक्त सरपंच सौ. भारती डेळेकर यांना राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कार प्रदान.
आजरा.- प्रतिनिधी.

आपल्या अभिनव कल्पनेद्वारे गाव ग्रामस्थांचा विकास केलेल्या सरपंचांचा ग्रामरत्न सरपंच
राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा लोणावळा येथील सेरेनीटी रिसॉर्ट मध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय सरपंच परिषद व पंचायत राज विकास मंच यांच्या संयुक्त वतीने करण्यात आले होते.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात आजरा तालुक्यातील सौ.भारती कृष्णा डेळेकर, लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत सोहाळे बाची, ता. आजरा यांना राज्यस्तरीय ग्राम रत्न सरपंच पुरस्कार देऊन मानसन्मान करणेत आला.
सौ. डेळेकर लोकनियुक्त सरपंच सरपंच पदाचे संपूर्ण मानधन शैक्षणिक कामासाठी देण्याऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या महिला सरपंच असून त्यानी
सन 2023 मध्ये मिळालेल्या सरपंच मनाधन मधून अनंत विद्या मंदिर सोहाळे शाळेच्या आवारातील हॅन्ड वॉश स्टेशन नूतनीकरण करणे व सन 2024 मध्ये मिळालेल्या सरपंच मानधन मधून विद्या मंदिर बाची शाळेच्या आवरातील हॅन्ड वॉश स्टेशन नूतनीकरण करून शाळेच्या सौन्दर्यात भर पाडली. तसेच स्वच्छता हा ग्रामजीवनाचा आत्मा बनला पाहिजे – हा गाडगेबाबांचा संदेश ध्यानी ठेवून सरपंच सौ. डेळेकर यांनी गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्याचा धडाका लावला आहे . तसेच बहुजन, वंचित आणि आर्थिकहष्ट्या मागास असलेल्या ग्रामस्थांसाठी वेळोवेळी मोफत आरोग्य शिबीरान्चे आयोजन करून गावातील शेकडो लोकांना वैद्यकीय उपचारांचा लाभ दिला आहे . गावातील महिला स्वयंसिद्ध होण्यासाठी त्यांनी आपल्या गावात विविध उपक्रमांचे प्रशिक्षण कार्यक्रम चालू केले आहेत. वृद्ध आणि दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्या कायम प्रयत्नशील आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे – हे तुकोबांचे वचन प्रत्यक्ष कृतीत उतरले असून गायरान, माळरानावर हजारो वृक्षांचे रोपण आणि संवर्धन करत आहेत. अशा उपक्रमाचे मुल्यमापन् करुन् त्यान्ची पुरस्कार साठी निवड करनेत आली.
सदर कार्यक्रमला माजी आयुक्त रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान चेअरमन चंद्रकांत दळवी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे जलतज्ञ अनिल पाटील
जल अभ्यासक सतीश खाडे इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच त्यांनी ग्रामविकासाच्या विविध संकल्पनेवर सरपंचांना मार्गदर्श
अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील, राज्य उपाध्यक्ष शशिकांत मोरे प्राज्य कार्यकारिणी सदस्य संजय कांबळे राहुल गावित दादासाहेब तांदळे रुपेश गांधी पद्माकर मोराडे राज्य संपर्क प्रमुख सचिन जगताप पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रदीप माने विदर्भ प्रभारी प्रमोद गमे किशोर पक्किडे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब काळे पुणे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उज्वला गोकुळे शेतकरी नेते भारत यादव माढा पंचायत समिती उपसभापती प्रसिद्धी पाटील कादंबरी पाटील जयंत पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण उर्फ माऊली ढाणे ई.मान्यवर उपस्थित होते.
ग्रामरत्न सरपंच सोहळा अत्यंत थाटामाटात झाला याशिवाय ग्रामविकासाच्या अभ्यासकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे सरपंचांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. पुरस्कारामुळे आम्ही ग्रामीण महाराष्ट्र गाव खेडी यांच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नाची खऱ्या अर्थाने दखल घेतली गेली अशी भावना पुरस्कार विजेत्या सरपंचांनी व्यक्त केली. आमच्यासाठी ग्रामरत्न सरपंच या पुरस्काराची कल्पना राज्यांमध्ये प्रथमच मांडून त्याची अत्यंत यशस्वीपणे अंमलबजावणी करणारे जयंत पाटील हे खरे आमचे प्रेरणास्थान आणि आदर्श असल्याचे सरपंचांनी सांगितले.
शेवटी आभार राज्यसंघटक संजय कांबळे यांनी आभार मानले.
चौकट
तसेच दि. २ ऑगस्ट रोजी दै. पुढारी यांच्या वतीने सरपंच सन्मान सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यात सौ.भारती कृष्णा डेळेकर यांना आदर्श सरपंच पुरस्काराने जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री, यांचे हस्ते कार्तिकेयन एस (मुख्य कार्यकारी जिल्हाअधिकारी अमोल येडगे यांचे उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे.