Home कोंकण - ठाणे 🛑१८ ऑगस्ट रोजी शक्तीपीठ महामार्ग विरोधात मोर्चा.- आजऱ्यात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष...

🛑१८ ऑगस्ट रोजी शक्तीपीठ महामार्ग विरोधात मोर्चा.- आजऱ्यात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय.🛑पवित्र प्रणालीमार्फत राज्यातील टप्पा दोनच्या शिक्षक भरती मध्ये अभियोग्यता धारक शिक्षकांच्यावर अन्याय का.? – कॉम्रेड शिवाजी गुरव.🛑आजरा आगाराची आर्थिक परिस्थिती कोलमडली कोणामुळे अधिकाऱ्यांची बैठक बोलवा.- आजरा मनसेचे तहसीलदार यांना निवेदन.- जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले.🛑व्यंकटराव येथे लोकमान्य टिळक पुण्यदिन व अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम संपन्न.

Oplus_131072

🛑१८ ऑगस्ट रोजी शक्तीपीठ महामार्ग विरोधात मोर्चा.- आजऱ्यात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय.
🛑पवित्र प्रणालीमार्फत राज्यातील टप्पा दोनच्या शिक्षक भरती मध्ये अभियोग्यता धारक शिक्षकांच्यावर अन्याय का.? – कॉम्रेड शिवाजी गुरव.
🛑आजरा आगाराची आर्थिक परिस्थिती कोलमडली कोणामुळे अधिकाऱ्यांची बैठक बोलवा.- आजरा मनसेचे तहसीलदार यांना निवेदन.- जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले.
🛑व्यंकटराव येथे लोकमान्य टिळक पुण्यदिन व अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम संपन्न.

🛑१८ ऑगस्ट रोजी शक्तीपीठ महामार्ग विरोधात मोर्चा.- आजऱ्यात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय.

आजरा – प्रतिनिधी.

Oplus_131072

शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांना व पर्यावरणाला उध्वस्त करणारा असल्याने या विभागातील शेतकऱ्यांचा विरोध दर्शवण्यासाठी सोमवार दि १२ रोजी आजरा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय आज येथे झालेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुकुंददादा देसाई होते.

सुरवातीला संघर्ष समितीचे निमंत्रक आणि श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई बैठकीमागील हेतू सांगताना म्हणाले की १२ जिल्ह्यातील शेतकरी शक्तीपीठच्या विरोधात लढत आहेत. हा मार्ग शेतकऱ्यांना आणि पर्यावरणाला उध्वस्त करणारा आहे. त्यातच भर म्हणून चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी नव्या मार्गाची मागणी करून शेतकऱ्यांच्या जमिनी आणि इथल्या निसर्गाची नासाडी करण्याच्या शासनाच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यामुळं आजची बैठक की आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आहे. लढ्याचे नियोजन करण्यासाठी आहे.
शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्यांनवर म्हणाले की हा रस्ता जरी देवाचे नाव घेऊन होत असला तरी तो केवळ अदानीसाठी होत आहे. अदानीची खनिजे गडचिरोलीहुन गोवा मार्गे परदेशात पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना बळी दिले जात आहे. त्यामुळं आमचा या महामार्गाला विरोध आहे.
बळीराजा संघटनेचे नितीन पाटील म्हणाले की हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत होऊ नये यासाठी प्रबोधन करणे गरजेचे आहे ते आपण सगळे मिळून करू. त्यासाठी गाववार बैठकांचे आयोजन करावे लागेल.
शिवसेनेचे युवराज पोवार म्हणाले की लोकांना सत्ताधारी आमदार निधी मिळणार नाही अशी धमकी देत आहे, लोकांना आपण शक्तीपीठचा धोका समजावून सांगितला पाहिजे.
अध्यक्षीय समारोपात मुकुंददादा देसाई म्हणाले की आजरा तालुक्यात अनेक प्रकल्प झाले त्यातील विस्थापितांचे अजून पुनर्वसन झालेले नाही, असे असताना हा महामार्ग शेतकऱ्यांच्या डोक्यावर का मारला जात आहे. या महामार्गाला पूर्ण शक्तीनिशी विरोध करूया.
यावेळी तानाजी देसाई, उमेश आपटे, दशरथ घुरे, शांताराम पाटील, नागेश चौगुले, बाळू पाटील, गोविंद पाटील, शिवाजी गुरव, शिवाजी इंगळे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. सुरवातीला अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले
.

यावेळी विद्याधर गुरबे, अल्बर्ट डिसोझा, रवी भाटले, रामदास पाटील, संजय तरडेकर, प्रकाश शेटगे, किरण पाटील, नारायण भडांगे, संभाजी सांबरेकर, विष्णू पाटील यांच्यासह दाभिल, शेळप, घाटकरवाडी, पारपोली, जेऊर, चितळे, भावेवाडी येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट.

दि १८ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मोर्चाला आ. सतेज पाटील, माजी खा. राजू शेट्टी आणि आ. राजेश पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

🛑पवित्र प्रणालीमार्फत राज्यातील टप्पा दोनच्या शिक्षक भरती मध्ये अभियोग्यता धारक शिक्षकांच्यावर अन्याय का.? – कॉम्रेड शिवाजी गुरव.

आजरा.- प्रतिनिधी.

पवित्र प्रणालीमार्फत राज्यातील टप्पा दोनच्या शिक्षक भरती मध्ये अभियोग्यता धारक शिक्षकांच्यावर अन्याय झाला असून खाजगी शैक्षणिक संस्थेतील भरती प्रक्रिया चुकीची झाल्याने अभियोग्यता धारकांना न्याय मिळणे बाबत कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी परिपत्रक काढले आहे. दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.‌

पवित्र प्रणालीमार्फत टप्पा दोनच्या शिक्षक भरती मध्ये अभियोग्यताधारक शिक्षकांच्या वर अन्याय झालेला आहे. शिक्षक भरती प्रक्रिया चुकीची झाली असून संस्था चालकांच्यासह अभियोग्यता धारकही कमालीचे नाराज झाले आहेत. पवित्र प्रणाली असे गोंडस नाव दिले मात्र ते फसवे निघाले. ना संस्थाचालकांच्या मनासारखे ना अभियोग्यता धारकांच्या मनासारखे झाले आहे. अभियोग्यता धारकांच्याकडून त्यांना पात्र असणाऱ्या शाळांची यादी दिली त्यामध्ये त्यांनी पसंती क्रम दिले, पसंती क्रम देताना साहजिकच स्वतःचा तालुका त्यानंतर स्वतःचा जिल्हा व त्यानंतर जवळचा जिल्हा असे पसंती दिली.

मात्र या दिलेल्या जिल्ह्यांपैकी उलटी गिनती करून या जिल्ह्यातील उमेदवार लांबच्या जिल्ह्यात लांबच्या जिल्ह्यातील त्याहीपेक्षा लांबच्या जिल्ह्यात उदाहरणार्थ लातूरचा उमेदवार सातारा जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्याचा उमेदवार सोलापूर जिल्ह्यात असे जाणीवपूर्वक केल्याची बोलले जात आहे. तसे झाल्याने संस्थाचालकांनी अध्यापनाचे काम थांबू नये म्हणून बऱ्याच पात्र शिक्षकांची नेमणूक पाच वर्षे ते सात वर्षे काहींनी दहा वर्ष आधीच केलेली असते त्यांनी पसंती क्रम दिलेला असतो मात्र एकूण रिक्त जागेपैकी एकही उमेदवार मुलाखतीच्या यादीत आलेला नाही असा बऱ्याच संस्थांना अनुभव आला आहे. त्यामुळे बऱ्याच संस्थांनी मुलाखतीसाठी उमेदवार आपल्याकडे आलेच नाहीत असे रेकॉर्ड करून पवित्र प्रणाली मार्फतच शासकिय यंत्रणेला कळवले आहे. त्यामुळे लांबच्या जिल्ह्यात मुलाखतीसाठी जाऊन सुद्धा अभियोग्यताधारक तेथे गेलेच नाहीत असे समजले जाते. याबाबत पवित्र प्रणाली यंत्रणेने कोणतीही नोंद ठेवलेली नाही त्यामुळे सहाजिकच त्या अभियोग्यता धारकांवर फार मोठा अन्याय झाला आहे.

या भरती प्रक्रियेत मुलाखती घेताना नियमाप्रमाणे पाठ निरीक्षण व मुलाखतीच्या वेळी निवड प्रक्रियेत वस्तुनिष्ठता व पारदर्शकता येण्याकरिता व्हिडिओ रेकॉर्ड करून जतन करणेबाबत सूचना आहेत असे असताना मात्र बऱ्याच ठिकाणी ऑन कॅमेरा मुलाखती झाल्याच नाहीत याबाबत निवड समितीने कोणतीच पर्यायी व्यवस्था दिली नाही. वास्तविक १:१० उमेदवार मुलाखतीसाठी देऊन ०९ अभियोग्यता धारक उमेदवारांची फरपट केली आहे. जि.प भरती मध्ये ज्याप्रमाणे थेट नियुक्ती केली जाते त्याप्रमाणे खाजगी संस्थांमध्येही थेट नियुक्ती करावी अशी मागणी अभियोग्यता धारकांची आहे.

अभियोग्यता धारकांचे फार मोठे हाल करून संस्थाचालकांना १:१० उमेदवार देऊन संस्थेला मदत मिळण्याची मुभा दिली आहे. जो उमेदवार थेट दिला असेल त्यांच्याकडून देखील इच्छेने मदत घेता येणे शक्य आहे. मात्र तसे न करता भरतीचा खेळ खंडोबा चालू आहे तो बंद करून जिल्हा परिषदेच्या भरती प्रमाणे थेट नियुक्ती करण्यात यावी किंवा जिल्हास्तरावर उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे. या प्रक्रियेत संस्थांना विश्वासात घेण्यात यावे किचकट प्रक्रिया बंद करून अभियोग्यता धारकांना न्याय देऊन त्यांची फरपट थांबवावी. वास्तविक नियमाने प्रकल्पग्रस्तांची जागा थेट भरती करावी लागते ती भरण्यात यावी त्यांना मुलाखतीची आवश्यकता नाही. प्रकल्पग्रस्तांची आधीच फरपट झालेली असते त्यांच्या जीवनातील उपजीविकेचे साधन प्रकल्पासाठी गेलेली जमीन त्यांच्या पुनर्वसनाचा झालेला विलंब हे देखील शासनाने विचारात घेणे गरजेचे आहे. त्यांच्या योग्यतेनुसार थेट नियुक्ती देण्याची गरज आहे. राहिलेली पुढील भरतीची प्रक्रिया जलद गतीने राबवून अभियोग्यता धारकांना न्याय मिळावा ही नम्र विनंती. शिवाजी गुरव यांनी केली आहे.

🛑आजरा आगाराची आर्थिक परिस्थिती कोलमडली कोणामुळे अधिकाऱ्यांची बैठक बोलवा.- आजरा मनसेचे तहसीलदार यांना निवेदन.- जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले.

आजरा.- प्रतिनिधी.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजरा तालुका वतीने आजरा आगाराबाबत निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आपल्या आजरा तालुक्यातील आजरा आगाराच्या ग्रामीण भागातील फेऱ्या कमी झाले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांना तालुक्याला येण्यासाठी काही वेळा चालत प्रवास करावा लागत आहे. तसेच अनेक वेळा रस्त्यामध्ये एसटी थांबवली जात नाही. मुंबई व पुणे सारख्या ठिकाणी अधिक फेऱ्या चालू करून स्थानिक गावामध्ये एसटीच्या फेऱ्या होत नाहीत.

तसेच आजरा एसटी डेपो आर्थिक अडचणीत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास. आजरा आगार बंद पडेल याबाबतच्या अडचणी काय आहेत. व ही परिस्थिती का येत आहे. याबाबतची योग्य माहिती व दप्तर डेपो मॅनेजर सह जबाबदार अधिकारी व मनसेचे पदाधिकारी यांची आपल्यासमोर तहसीलदार कार्यालय दालनात येणाऱ्या चार दिवसात बैठक बोलवावी यासाठी संबंधित अधिकारी यांना याबाबतची माहिती विचारून चाललेले प्रकार बंद करून आजरा डेपो व्यवस्थित चालण्यासाठी काय उपाययोजना करता येते यातून मार्ग काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, आगाराच्या दारात किंवा बस स्थानकावर जाऊन मोर्चा किंवा आंदोलन करून यातून मार्ग निघणार नाही.. यासाठी आगार प्रमुखांची जबाबदारी काय आहे व ते बे जबाबदारपणे का वागत आहेत. त्याची खरी कारण शोधावी लागतील आजरा आगार सुस्थितीत व चांगल्या पद्धतीने चालावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. या साठी चार दिवसात याबाबतची बैठक बोलावी अशी आपल्याला विनंती आहे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या नियोजनावर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी सरिता सावंत तालुका अध्यक्ष आनंदा घंटे सह पदाधिकारी मनसैनिक यांच्यासह आहेत.

🛑व्यंकटराव येथे लोकमान्य टिळक पुण्यदिन व अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा येथे लोकमान्य टिळक पुण्यदिन व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य एम एम नागुर्डेकर व पर्यवेक्षिका सौ व्ही जे शेलार यांचे हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. इयत्ता दहावी अ वर्ग व वर्गशिक्षक श्री एम एम एलगार यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले. रिया अरविंद देशमुख ,शिमरन भिकाजी पाटील व अदिती अशोक नरके यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. कु. सृष्टी संजीव नाईक (इ.10वी अ) हिने रेखाटलेले लोकमान्य टिळक यांच्या चित्राने सर्वांचे लक्ष वेधले. शिक्षकांबरोबरच प्राचार्य व पर्यवेक्षिका यांनीही चित्राचे कौतुक करून तिचा सत्कार करण्यात आला.
श्री एस वाय भोये यांनी आपल्या मनोगतामध्ये लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान, त्यांचे प्रसिद्ध वर्तमानपत्र केसरी यातून त्यांनी जनजागृती केली. इंग्रजांच्या अनेक निर्णयाच्या विरोधात आंदोलने केली त्यांच्यावर खटला नोंदवून न्यायालयातून त्यांना शिक्षा झाली मंडालेच्या तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले तिथे त्यांनी “गीतारहस्य “हा ग्रंथ लिहिला . स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळविणारच या आपल्या निर्णयाशी ते आयुष्यभर ठाम राहिले आणि देशाला स्वातंत्र्यही मिळाले..
व्ही टी कांबळे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचेविषयी आपल्या मनोगतात सांगितले की, दीड दिवसाची शाळा शिकलेले अण्णाभाऊ कामाच्या व भाकरीच्या शोधात जवळजवळ अडीचशे मैल वारणा ते मुंबई पायी प्रवास करून.. मुंबई गाठली. अनेक प्रकारची कामे केली. दुकानाच्या पाट्या वाचत ते वाचायला आणि लिहायला शिकले… लेखक आणि काव्य ही प्रतिभा अंगी असल्याने त्यांनी लेखनाला सुरुवात केली. अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह, प्रवास वर्णन त्यांनी लिहिले.. त्यांची फकीरा ही कादंबरी परदेशातल्या अनेक भाषेत छापली गेली.. यांच्या या लेखनातील अतुलनीय कामगिरीतून रशियामध्ये त्यांचा पुतळाही उभारला‌. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी असणारे अण्णाभाऊ हे लावणीकार, छक्कडकार, शाहीर, लेखक, कथा- कादंबरीकार, नाट्यकार, अभिनेते, वादक, संगीतकार म्हणून संपूर्ण देशभर सुप्रसिद्ध आहेत. त्यांचा आज जन्मदिवस.
त्यानंतर प्राचार्य श्री एम एम नागुर्डेकर यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. दहावीतील विद्यार्थी प्रणव भगवान पाटील व शलाका ओंकार गिरी यांनी केले. व आभार प्रदर्शन प्रेम रमेश येसणे यांनी मानले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.