Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना अध्यक्षांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव...

वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना अध्यक्षांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट.🛑आजरा तालुक्यामध्ये दहा हजार देशी प्रजातीची झाडे लावण्याचा संकल्प.- आजरा सरपंच परिषद (मुंबई)🛑आजरा शहर व उपनगरातील खड्डे मुलवणे व औषध फवारणी करणे बाबत.- समीतीचे निवेदन🛑”महसूल सप्ताह २०२५” आजरा “महसूल दिन.- महसूल सप्ताह उत्साहात होणार शुभारंभ”- तहसीलदार समीर माने.

Oplus_131072

🛑वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना अध्यक्षांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट.
🛑आजरा तालुक्यामध्ये दहा हजार देशी प्रजातीची झाडे लावण्याचा संकल्प.- आजरा सरपंच परिषद (मुंबई)
🛑आजरा शहर व उपनगरातील खड्डे मुलवणे व औषध फवारणी करणे बाबत.- समीतीचे निवेदन
🛑”महसूल सप्ताह २०२५” आजरा “महसूल दिन.- महसूल सप्ताह उत्साहात होणार शुभारंभ”- तहसीलदार समीर माने.

🛑वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना अध्यक्षांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यास आर्थिक सक्षम करण्यासाठी साखरे बरोबर उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु कारखाना कार्यस्थळ असलेली गवसे व दर्डेवाडी ही गावे शासनाच्या इको – झोन मध्ये येत असल्याने उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारणीत अडचणी येत आहेत.

सदर बाब कारखाना व्यवस्थापनाने या पूर्वी आदरणीय खासदार शरदचंद्र पवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांचे सूचनेवरून व मार्गदर्शनाखाली आज कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद उर्फ उदयसिंह देसाई, व्हा.चेअरमन सुभाष देसाई, संचालक उदयसिंह पोवार, कार्यकारी संचालक संभाजी सावंत व कन्सलटंट श्री.मेगाने यांनी दिल्ली येथे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान कारखान्याची स्थापना १९९० साली झाली असून त्यानंतर तब्बल १६ वर्षांनी इको सेन्सेटीव्ह झोनचा आदेश झाला असलेचे मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी ना.भूपेंद्र यादव यांनी आपल्या प्रस्तावा बाबत सकारात्मक निर्णय घेऊन कारखान्या समोरील उपपदार्थ प्रकल्प निर्मिती मधील इको- झोनची अडचण निश्चित दूर केली जाईल असे आश्वासन दिले.
त्यानंतर राष्ट्रीय सहकार विकास निगम नवी दिल्ली येथे मुख्य संचालक साखर व्ही. के. दुबशी, असिस्टंट डायरेक्टर मोहम्मद फैजल यांची भेट घेऊन कारखान्यास अजून कमीत कमी व्याजदराची कोणती कर्जे उपलब्ध होतील याबाबतची माहिती घेऊन त्याच्या अटीशर्ती बाबत चर्चा केली.

🛑आजरा तालुक्यामध्ये दहा हजार देशी प्रजातीची झाडे लावण्याचा संकल्प.- आजरा सरपंच परिषद (मुंबई)

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

आजरा तालुक्यामध्ये दहा हजार देशी प्रजातीची झाडे लावण्याचा संकल्पआजरा सरपंच परिषद (मुंबई) यांच्या वतीने करण्यात आला आहे.
‌ पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत विविध उपक्रमाच्या माध्यमातून सरपंच परिषदेतच्या वतीने काम करत आहे. त्यामध्ये ‘वणवा निर्मुलन मोहिम’ या उपक्रमामध्ये आपणा सर्वांच्या सहकार्याने जंगलातील वणवे रोखण्यासाठी वन विभागाला खुप चांगल्या प्रकारे यश येत आहे. त्यामुळे जळीत होणाऱ्या जंगल क्षेत्रामध्ये कित्येक प्रमाणात घट झाल्याचे वन विभागाच्या संबंधीत असलेल्या वन आग्नी पोर्टलच्या निष्कर्षामध्येही नोंद होत आहे. जळीताचे प्रमाण घटल्यामुळे झाडे – वेली याबरोबरच पशु – पक्षी, किटक, वन्यप्राणी व असंख्य जीवजंतुना वाचवण्यामध्ये आपण सरपंच महोदयांचा मोलाचा वाटा आहे.
आजरा तालुक्यात असणाऱ्या समृध्द जंगल क्षेत्रामध्ये वृध्दी व्हावी यासाठी देशी प्रजातीची झाडे गावोगावच्या परिसरामध्ये लावणे अशा प्रकारचा संकल्प सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) ने हाती घेतला आहे. त्यासाठी देशी प्रजातीची ‘पन्नास रोपे’ प्रत्येक ग्रामपंचायतीस विनामुल्य देण्याचे निश्चित करण्यात आले असून त्याच्या जोडीला ग्रामपंचायतीने आणखी पन्नास झाडे द्यावीत. अशी एकुण शंभर देशी प्रजातीची झाडे प्रत्येक गावामध्ये लावली जावीत अशी संकल्पना आहे.

त्याचबरोबर वाढदिवस साजरा करताना इतर गोष्टीबरोबरच त्यामध्ये ‘वृक्ष लागवड’ याचा देखील अंतर्भाव असावा, तसेच आई-वडील यांचे स्मरणार्थ झाडे लावली जावीत हा विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले असून अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून या हंगामामध्ये आजरा तालुक्यामध्ये दहा हजार देशी प्रजातीची झाडे लावण्याचा संकल्प सरपंच परिषद (मुंबई) ने हाती घेतला आहे.

स्मशानभुमीचा परिसर, गायरानातील क्षेत्र किंवा लगतचे जंगल क्षेत्र त्याचबरोबर पाणंद रस्त्याच्या दुतर्फाची जागा वृक्ष लागवडीसाठी निवडावी,Geo Tag केलेले फोटो ग्रामपंचायतीच्या P.C. ला साठवून ठेवावेत. रोपांच्या संवर्धनाची जबाबदारीही ग्रामपंचायत स्तरावर व्हावी अशा प्रकारचा संकल्पन केला गेला आहे. तरी सर्व सरपचं महोदयांनी आपल्या गावच्या परिसरामध्ये यंदाच्या या हंगामामध्ये जास्तीत जास्त देशी प्रजातीची वृक्ष लागवड करुन पर्यावरण संवर्धनासाठीच्या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवाव असे आवाहन सर्वानुमते करण्यात आले. यावेळी तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, राजु पोतनीस राज्य सरचिटणीस, जी.एम. पाटील जिल्हाध्यक्ष कोल्हापूर, पांडूरंग तोरगल्ले तालुका अध्यक्ष
सौ. प्रियांक जाधव तालुका अध्यक्षा, सौ.रत्नप्रभा भुतुर्ले . उपाध्यक्ष, विलास जोशीलकर.. उपाध्यक्ष, सौ. समिक्षा देसाई .. कार्याध्यक्ष, युवराज पाटील . कार्याध्यक्ष, पांडूरंक खवरे सरपंच सुलगाव, लहु वाकर, सरपंच किटवडे, अनिल पाटील, सरपंच मुरुडे, धनाजी दळवी . सरपंच चाफवडे, सौ वैशाली गुरव सरपंच बुरुडे, आजरा सुत गिरणी अधिकारी आदी उपस्थित होते.

🛑आजरा शहर व उपनगरातील खड्डे मुलवणे व औषध फवारणी करणे बाबत.- समीतीचे निवेदन

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

आजरा शहर व उपनगरामधील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीस त्रास होत आहे. तसेच आरोग्याच्या समस्याही निर्माण झालेल्या आहेत. या पार्श्वभुमीवर अन्याय निवारण समितीकडून विविध मागण्या करण्यात येत आहेत. या बाबतचे निवेदन आजरा नगरपंचायत यांना देण्यात आले आहे.‌ दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

खड्डे व चिखलयुक्त रस्त्याची दुरावस्था :-

१)आजरा शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर खड्डे पडले असून तेथे चिखल साचलेला आहे. पावसाळी काळात ही स्थिती अधिकच बिकट होत आहे.

२) गणेश चतुर्थीच्या पार्श्वभुमीवर मुरुम टाकणेयाची आवश्यकता :

गणेश चतुर्थीच्या काळात शेती खत गोडावून पासून कुंभार गल्ली व रामदेव गल्ली येथून गणपतीच्या मुर्तीची ने-आण केली जाते. या मार्गावरुन गांधीनगर रोड, भाई-भाई टॉकीज, वाणी गल्ली, चाफे गल्ली, शिवाजीनगर भागात मुर्ती नेल्या जातात. त्यामुळे सदर मार्गावरील खड्डे दिनांक ७ ऑगस्ट २०२५ पूर्वी मुरुम टाकुन तातडीने मुजवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे गणेश मुर्तीचे विसर्जन परोली रस्त्यावरील पुल वडाचागोंड, संताजी पुल व शिवाजीनगर घाट याठिकणी जाणाऱ्या रस्त्यावरील सुध्दा खड्डे मुरुमाने मुजवून घ्यावेत व विसर्जनाच्या विकाणी योग्य व्यवस्था करणेत यावी. सदर ठिकाणचा चिखल हटवावा व झुडपे तोडून परिसर स्वच्छ करावा. भारतनगर, आयडीयल कॉलनी, रवळनाथा कॉलनी याठिकाणी परिस्थिती अतीशय गंभीर असून दि. ७ऑगस्ट २०२५ पर्यंत सदरच्या जागेचे सर्व खड्डे मुजवून रस्ता लेव्हल करून घ्यावेत.

३) औषध फवारणी बाबत :

शहर व उपनगरातील गटारी साफ न झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे साथीचे रोग जसे की डेंग्यु, मलेरिया यांचा धोका निर्माण झाला आहे. म्हणून संपूर्ण परिसरात औषध फवारणी तातडीने करावी.

कामे पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा :

वरील सर्व कामे ७ ऑगस्ट २०२५ पूर्वी पूर्ण न झाल्यास कुंभार गल्ली येथे चिकलाच्या डबक्यात स्थानिक रहिवाशी यांचे बरोबर बसुन निदर्शन करणेत येईल. त्यानंतर दररोज इतर भागातील पाणी साचलेल्या ठिकाणी व चिखल झालेल्या ठिकाणी टप्याटप्याने आंदोलन केले जाईल.

५) पाणी पुरवठा सुधारावा :

सद्या शहर व उपनगरांना पुरवले जाणारे पाणी अस्वच्छ व गढुळ स्वरुपाचे आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. कृपया स्वच्छ, शुध्द व नियमित पाणी पुरवठा सुनिश्चित करावा. जेणे करून पाण्यामुळे होणारे आजार टाळता येतील.

६) भाई भाई टॉकीजच्या बाजुचा रस्ता स्वच्छ करून मिळणे बाबत :

भाई भाई टॉकीज व फडके थाळी यांचे मधुन जाणारा रस्ता बराच खराब झाला आहे. शाळेतील मुलांना जाणे येणेसाठी फार त्रासाचे होत आहे. तरी सदरचा रस्ता स्वच्छ करणेत यावा.

७) गोठण गल्ली ते चराटी कॉलनी येथील परिसर स्वच्छ करून मिळणे बाबत :

गोठण गल्ली ते चराटी कॉलनी पर्यंतची दोन्ही बाजुची गटर्स व परिसर स्वच्छ करून मिळणे विषयी विनंती.

८) नवापूर येथील सार्वजनिक चावी ठिकाणची गटर्स स्वच्छता व परिसर स्वच्छता :
नबापूर येथील सार्वजनिक धावी ठिकाणची गटर्स व परिसर स्वच्छता करुन मिळणेबाबत. वरील सर्व मागण्यांची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर परशुराम बामणे अध्यक्ष, गौरव देशपांडे उपाध्यक्ष
तसेच सदस्य दयानंद भोपळे बंडोपंत चव्हाण, जागेद पठाण, गौरव देशपांडे उपाध्यक्ष, जोतिबा आजगेकर, मदन तानकड, संतोष बांदवडेकर, अभिजित संकपाळ, संजय जोशी, सुधिर सुपल सह पदाधिकारी उपस्थित होते.

🛑“महसूल सप्ताह २०२५” आजरा “महसूल दिन.- महसूल सप्ताह उत्साहात होणार शुभारंभ”- तहसीलदार समीर माने.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील महसूल विभागाच्या वतीने महसूल जिल्हास्तरीय महसूली कामे वेळच्या वेळी पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, वसुलीच्या नोटीसेस पाठविणे, मोजणी करणे, अपील प्रकरणांची चौकशी करणे इ. कामे वेळच्यावेळी व वेळापत्रकानुसार करणा-या अधिकारी/कर्मचा-यांचा आणि महसूल वसुलीचे उदिष्ट पार करणा-या अधिकारी/कर्मचा-यांचा सत्कार करण्याकरीता आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरीता दरवर्षीप्रमाणे दि. ०१ ऑगस्ट, २०२५ हा “महसूल दिन” म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो. त्यानुसार, यावर्षी देखील महसूल दिनापासून दिनांक ०१ ते ०७ ऑगस्ट, २०२५ या कालावधीत राज्यभरात “महसूल सप्ताह २०२५” शासनाकडील निर्देशानुसार साजरा करण्यात येणार आहे.या महसूल सप्ताहामध्ये, प्रत्येक दिवशी विविध घटकांतील नागरिकांसाठी पुढीलप्रमाणे विशेष मोहिम/कार्यक्रम/उपक्रम / शिबीरे/महसूल अदालती यांचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर “महसूल सप्ताह” मध्ये घ्यावयाच्या कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

कार्यक्रमाचे स्वरुप..दि. १ ऑगस्ट, २०२५

“महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ”

१) “महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभ”

०२ ऑगस्ट, २०२५

“शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटूंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करणेबाबत कार्यक्रम”

०३ ऑगस्ट, २०२५

पाणंद/शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे”

०४ ऑगस्ट, २०२५

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविणे”

०५ ऑगस्ट, २०२५

विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करणे”

०६ ऑगस्ट, २०२५

शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे/सरकारजमा करणे) निर्णय घेणे”

०७ ऑगस्ट, २०२५

“M-Sand धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे (SOP प्रमाणे) धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ” – तरी, महसूल विभागाच्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी हरिश सुळ, आजरा – भुदरगड उपविभाग गारगोटी यांनी केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.