🟣युवकांना समाज भान देणे
काळाची गरज : – मा. आम. राजेश पाटील ( मलिग्रे येथे सोलर हायमास्ट उद्घाटन सोहळा संपन्न.)
🟥लाडकी बहीण योजनेचा १४ हजार २९८ पुरूषांनी घेतला लाभ.
🛑उत्तुरच्या नवजीवन विद्यालयात मतपत्रिकेवर शालेय निवडणूक
🟣युवकांना समाजभान देणे
काळाची गरज : – राजेश पाटील
मलिग्रे येथे सोलर हायमास्ट उद्घाटन सोहळा संपन्न.
आजरा :- प्रतिनिधी.

मलिग्रे ता. आजरा येथील हायमास्ट दिव्याचे उद्घाटन करताना माजी आमदार राजेश पाटील यावेळी उपस्थित संपन्न झाले.
तालुक्यातील झालेला विकास सर्वसामान्य जनतेला माहिती असून युवकांना मात्र विकासाची माहिती देणेसाठी स्वतंत्र भारतात ग्रामीण भागात झालेले रस्ते, दळवळाच्या सोयी, शिक्षण व पाण्याची सोय व सहकारी संस्थाचा हा विकास युवकांच्या पर्यंत पोचवणे, त्याना व्यसनातून मुक्त करणे व तालुक्यातील झालेल्या विकास कामांची माहिती देत समाजभान देणे ही काळाची गरज असल्याचे मत माजी आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले. मलिग्रे येथे सोलर हायमास्ट उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. येथील मालिकार्जुन मंदिरासमोर परिसरामध्ये कार्यक्रम पार पडला.
स्वागत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष किशोर जाधव यांनी केले. प्रास्ताविकात माजी सरपंच अशोक शिंदे यांनी ४.४१ लाखाचा हायमास्ट दिवा लावण्यात आला असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, आजरा साखर कारखान्यासाठी माजी आमदार नरसिंगराव पाटील यांनी नॅशनल हेविच्या माध्यमातून विशेष लक्ष घालून कारखाना तालुक्यात उभा करण्यासाठी मोठे योगदान दिले. गेल्या २५ वर्षापासून लटकलेला उचंगी प्रकल्प माझ्या अत्यारित पूर्ण केला आहे. यापुढे मलिग्रे गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी योजना सुरू आहे. याच्या पुर्ततेसाठी विशेष लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आजरा साखर कारखाना उपाध्यक्ष सुभाष देसाई, संचालक अशोक तर्डेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आजरा कारखाना संचालक अनिल फडके, संभाजी पाटील, हात्तिवडे, राजेंद्र मुरूकटे, मार्केट कमिटीचे माजी अध्यक्ष अभय देसाई, माजी सरपंच गजानन देशपांडे, दत्ता परीट, सदाशिव माणगांवकर, शिवाजी कागिनकर, मारूती इक्के, वामन दरेकर, उत्तम पारदे, दिलीप बुगडे, शिवाजी भगुत्रे, सुनंदा बुगडे, सुमन सावंत, शोभा घोरपडे, तेजश्री आडसोळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. विश्वास बुगडे यांनी आभार मानले.
🟥लाडकी बहीण योजनेचा १४ हजार २९८ पुरूषांनी घेतला लाभ.- महिलांचे पैसे लाटणाऱ्या ‘लाडक्या पुरुषां’कडून होणार वसुली.- उपमुख्यमंत्री अजितदादांकडून कारवाईचे संकेत
मुंबई :- प्रतिनिधी

महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना वारंवार नवनव्या वादात अडकत आहे. कधी निधीमुळे तर कधी लाभार्थींवरुन लाडकी बहीण योजना वादग्रस्त ठरत असल्याचं दिसून येत आहे. आता तर पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून वर्षाला 40 हजार कोटींचा खर्च येत आहे. ऑगस्ट २०२४ पासून ही योजना सुरु झाली. लाडकी बहीण या योजनेचा लाभ तब्बल १४,२९८ पुरुषांनी घेतल्याचे समोर आले आहे. त्यांना २१.४४ कोटी रुपये वाटण्यात आले. योजनेत लाभार्थ्यांची छाननी करताना हा प्रकार उघडकीस आला. सार्वजनिक वितरण प्रणालीतील डेटा तपासल्यावर आणखी धक्कादायक गोष्टी समोर आल्या. २ लाख ३६ हजार १४ लाभार्थ्यांच्या नावांमध्ये संशय आहे. ते पुरुष असून त्यांनी महिलांच्या नावाने लाभ घेतला असावा, असा संशय आहे. ज्या १४,२९८ पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला, त्यांना दरमहा मिळणारं १५०० रुपये मानधन आता बंद करण्यात आलं आहे.
योजनेत झालेल्या घोटाळ्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. महिलांच्या योजनेतून पुरुषांनी अर्ज करुन पैसे कसे मिळवले, हे शोधण्यासाठी आता कागदपत्रांची छाननी सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितलं की, महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत धोका देऊन भाग होणाऱ्या पुरुषांविरोधात कारवाई केली जाईल आणि त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाईल. या लाडकी बहीण योजनेतील १४ हजार पुरुष लाभार्थी आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहिन्याला १५०० रुपये मिळतात. यासाठी वार्षिक उत्पन्न, कुटुंबाची स्थिती याबाबत अनेक निकष लावण्यात आले आहेत. ही योजने गेल्या वर्षी २०२४ च्या ऑगस्टमध्ये सुरू झाली होती. यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला फायदा झाला. याबाबत अजित पवार म्हणाले, सरकारी नोकरी करणाऱ्या काही महिलादेखील लाभार्थी झाल्या होत्या, त्यांची नावं हटविण्यात आली आहे.
🛑उत्तुरच्या नवजीवन विद्यालयात मतपत्रिकेवर शालेय निवडणूक
आजरा.- प्रतिनिधी.

उत्तूर ता. आजरा येथील नवजीवन विद्यालय, उत्तूर येथे वार्षिक शालेय मंत्रीमंडळ निवडणूक उत्साहात पार पडली नवजीवन विद्यालयात मतपत्रिकेवर झालेल्या निवडणूक नवजीवन विद्यालयात आर्यन जाधव याची मुख्यमंत्री पदी तर उपमुख्यमंत्रीपदी पुनित दोडमण्णी यांची निवड करण्यात आली नवजीवन विद्यालयात मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून रवींद्र येसादे यांनी काम पाहिले नवजीवन विद्यालयात मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर शिक्का उमठवण्यात आला. १२५ विद्यार्थ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला ३० उमेदवारातून दहा उमेदवार निवडण्यात आले यामध्ये श्वेता चोरगे -अर्थमंत्री, अर्पित कुराडे- स्वच्छता मंत्री, विघ्नेश पवार – क्रिडामंत्री, कौस्तुभ परीट – सहलमंत्री, आरोही गोसावी – सांस्कृतिक मंत्री , संभव खोत -प्रार्थना मंत्री , राजवीर पवार -आरोग्यमंत्री , साक्षी मगदूम – संजावट मंत्री आदीची मतदानाने निवड करण्यात आली. मतदान अधिकारी म्हणून मंगल कोरवी, दिंगबर कुंभार, सुरेखा परीट, रेश्मा आजगेकर, अर्चना पाटील, सारीका हिंगे, विमल कुराडे, फिजा मकानदार यांनी काम पाहिले.