🛑गिरणी कामगारांचा सोमवारी आजरा येथे मेळावा.
🛑हनुमान तरुण मंडळ, उत्तूर गणेशोत्सव २०२५ चे नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड.
🛑गिरणी कामगारांचा सोमवारी आजरा येथे मेळावा.
( गिरणी कामगार व वारदार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.)
आजरा.- प्रतिनिधी.

गिरणी कामगार वारसदारांना, नऊ जुलै रोजी आझाद मैदानात झालेल्या आंदोलनात संघटनेच्या वतीने मांडलेली भूमिका व सरकार चे धोरण यावर चर्चा करणे करीता सोमवार दि. २८ जुलै रोजी किसान भवन आजरा येथे स. ११ वा उपस्थीत रहाण्याचे आवाहन काँ. शांताराम पाटिल यानी केले आहे.
या मेळाव्यात काँ. अतूल दिघे काँ. दत्तात्रय अत्याळकर काँ. धोडिंबा कुंभार मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये सेलू वागंणी पनवेल या ठिकाणी मुबंई बाहेर गिरणी कामगारांना घरे लागल्याचे सांगून, कागद पत्रे मागणारे दलाल गिरणी कामगारांना फसवत आहेत. ही परस्थिती समजून घेण्यासाठी आजरा व दुपारी २ वा. चंदगड येथे मेळावे घेत आहोत तरी सर्व गिरणी कामगार व वारसदारानी उपस्थित रहावे असे आवाहन गिरणी कामगार संघटने वतीने केले आहे.
🛑हनुमान तरुण मंडळ, उत्तूर गणेशोत्सव २०२५ चे नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड.
आजरा.- प्रतिनिधी.

हनुमान तरुण मंडळ, उत्तूर गणेशोत्सव २०२५ चे नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड अध्यक्ष भारत लोखंडे, उपाध्यक्ष दिपक रावण, खजिनदार संतोष आमणगी, सचिव महेश करंबळी यांनी निवड करण्यात आली आहे.
यावेळी मंडळाचे सदस्य अजीत उत्तूरकर, सुहास पोतदार,राजू पाटील, पुंडलिक पाटील, अनिल लोखंडे,किसन पाटील, मुकुंद पाटील, व्यंकटेश मुळीक सुजय पाटील, स्वप्नील पाटील, आतुल घोरपडे,पराग देशमाने रोहण पाटील सर्व सदस्य उपस्थित होते.