🛑हिरण्यकेशी नदीवर – शेळप, दाभिल, साळगावं व हाजगोळी या बंधाऱ्यांना समांतर पुल व्हावा.- आजरा उबाठा सेनेची मागणी.
🟥कृषीमंत्री कोकाटे यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसची जोरदार घोषणाबाजी.
🛑हिरण्यकेशी नदीवर – शेळप, दाभिल, साळगावं व हाजगोळी या बंधाऱ्यांना समांतर पुल व्हावा.- उबाठा सेनेची मागणी.
आजरा.- प्रतिनिधी दि २४

आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवर असलेल्या शेळप, दाभिल, साळगावं व हाजगोळी या बंधाऱ्यांना समांतर पुल होणेबाबात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आजरा तालुक्यामध्ये हिरण्यकेशी नदीवर शेळप, दाभिल, साळगांव व हाजगोळी हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. हे बंधारे बांधून गेली अनेक वर्षे झाली आहेत. सध्या या बंधाऱ्यांवरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे.
हिरण्यकेशी नदीचा उमग आंबोली येथे असल्यामुळे आंबोली व आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त असते. यामुळे या नदीला दरवर्षी पूर येऊन हे बंधारे पाण्याखाली जातात. यावर्षी देखील पुरामुळे या बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे ते वाहतुकीसाठी अनेक दिवस बंद करण्यात आले होते. हे बंधारे अनेक गावांना जोडले असल्यामुळे यावरुन एस.टी, ट्रक्टर, ऊस वाहतूक करणारी वाहने, अवजड वाहने जात असतात. यामुळे बंधाऱ्यावरील रस्त्यात खड्डे पडलेले आहेत.
मुळातच या बंधाऱ्याची वाहतुकीची क्षमता कमी असल्यामुळे अनेक वर्षापूर्वी बांधलेले हे बंधारे कमकुवत झालेले आहेत. यामुळे या बंधाऱ्यावरुन वाहतूक करणे धोकादायक ठरू शकते. भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून या बंधाऱ्यांना समांतर पूल होणे गरजेचे आहे. तरी संबंधित विभागाला तात्काळ सूचना देऊन या ठिकाणी
आवक जावक विभातिनही बंधाऱ्यांना समांतर बांधण्यात यावे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर
उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील प्रमुख, ता. प्रमुख युवराज पोवार, शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, उपतालुकाप्रमुख संजय येसादे, युवा सेनेचे महेश पाटील, अमित गुरव, सुयश पाटील, अनिल सुतार, विजय गुरव, दिनेश कांबळे, महादेव गुरव सह पदाधिकारी शिवसैनिक यांच्या सह्या आहेत.
🟥कृषीमंत्री कोकाटे यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी.
( सिंधुदुर्ग राष्ट्रवादीतर्फे कृषीमंत्र्यांना पत्त्यांचा कॅट भेट.)
कुडाळ :- प्रतिनिधी.

विधानसभेत महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जे रमी खेळाचे प्रदर्शन केले त्याचा जाहीर निषेध सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आला. कोणत्या परिस्थितीत आम्ही सत्तेत आल्यावर कर्जमाफी करू अशी खोटी आश्वासन शेतकऱ्यांना देत. सत्तेत बसलेल्या सत्यधार्यांनी कोणत्याच प्रकारे आश्वासनांची पूर्तता न करता केवळ आश्वासित करून मतदारांना वाऱ्यावर सोडले.असे वारंवार निदर्शनास येताना दिसते.
त्याचबरोबर कोकणात गेल्या मे महिन्यात मुसळधार पाऊस पडला परंतु कोणत्याही प्रकारच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे देखील करता आले नाहीत. आंबा, काजू ,फोकळीअशा अनेक पीकांचे बेसुमार नुकसान झाले परंतु या मंत्र्यांना कोणत्याही प्रकारचं सोयर नासुतक अशा पद्धतीत हे या सत्तेचा उपभोग घेत असताना कृषिमंत्री कोकाटे साहेब असे म्हणतात की पंचनामा काय ढेकळां चा करायचा का ? अशा पद्धतीचे वक्तव्य एखाद्या कृषी मंत्र्याला शोभेल का ? अशा पद्धतीचे प्रश्नचिन्ह तमाम जनतेपुढे उभे राहते कृषिमंत्र्यांनी तर स्वतःचे घर बांधताना सुद्धा त्यामध्ये भ्रष्टाचार केला हेही निदर्शनास आले.
🟥कर्जमाफी झाल्यावर काही शेतकरी आपल्या कुटुंबातील विवाह समारंभ आणि कार्यक्रम पार पाडतात अशा पद्धतीचे ही बेताल वक्तव्य कृषिमंत्री करतात. तसेच लोकशाहीचे मंदिर असलेल्या ठिकाणी जनतेचा न्याय निवाडा आणि जनतेच्या दरबारात आपण जनहिताचे वक्तव्य करतो अशा ठिकाणी ऑनलाइन रमी खेळणे हा लज्जास्पत प्रकार सन्माननीय कृषि मंत्र्यांकडून घडला असतानाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अद्याप पर्यंत त्यांचा राजीनामा घेत नाहीत हेही जनतेला न पडलेली गोष्ट आहे. कृषी मंत्री म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असंही काही मंत्री कृषी मंत्र्यांना हिणवताना पहावयास मिळतात. या पद्धतीची निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त करून शासन दरबारी हा संदेश पोहोचवावा अशा पद्धतीचे वक्तव्य जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सिंधुदुर्ग नगरीत केले. याबरोबरच असंख्य पदाधिकारी यांच्यासोबत असून साबा पाटकर उत्तम सराफदार सचिन पाटकर रुपेश जाधव जयेश धुमाळे सावली पाटकर तेजस्वि कदम दीपिका राणे ममता नाईक सच्चिदानंद कनयाळकर चंद्रकांत नाईक उल्हास नाईक गौतम महाले अल्तमस शहा रविकांत गवस पुंडलिक दळवी देवेंद्र टेमकर योगेश कुबल इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.