गडहिंग्लज – मनसेचे वैभव माळवे यांचे दुःखद निधन.
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.
मनसेचे वैभव माळवे यांचे वयाच्या ३२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना , कोल्हापूर जिल्हा ग्रामीण विभागाचा जिल्हा सचिव व वडरगे ता. गडहिंग्लज हे त्याचे मूळ जन्मगाव कला शाखेमध्ये पदवीधर शिक्षण त्याने पूर्ण केले होते.
माळवे हे अविवाहित होते. राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कट्टर कार्यकर्ता अशी वैभवची ओळख होती. पक्ष स्थापनेपासूनच तो पक्षांमध्ये धडाडीने विविध आंदोलने सामाजिक उपक्रम कार्यक्रम यांच्यामध्ये त्याचा उत्स्फूर्त सहभाग होता.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील त्याच्या कार्याचे विशेष कौतुक केले होते. सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी त्याचे अतिशय चांगले संबंध होते. अत्यंत शांत संयमी व मनमिळावू स्वभावामुळे वैभवने अल्पावधीतच गावातील सर्व लोकांची व कार्यकर्त्यांची मने जिंकली होती.
अशा लढवय्या , निढर , निष्ठावंत महाराष्ट्र सैनिकास मनसे कोल्हापूर वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याच्या पश्चात आई वडील व भाऊ असा परिवार आहे..