Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमुल्य वर्धन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी बांबू लागवड कार्यशाळा ( शुक्रवार दि....

मुल्य वर्धन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी बांबू लागवड कार्यशाळा ( शुक्रवार दि. १८ जुलै २०२५ रोजी आजरा तहसील कार्यालय )

मुल्य वर्धन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी बांबू लागवड कार्यशाळा ( शुक्रवार दि. १८ जुलै २०२५ रोजी आजरा तहसील कार्यालय )

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकारच्या कृषी विभागाशी संलग्न असलेल्या कृषी विकास आणि ग्रामीण परिवर्तन संस्था आणि आजरा बांबू क्लस्टर फाऊंडेशन च्या वतीने शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला आजऱ्याचे तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी मा. संतोष नागटिळक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

आजरा तालुक्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांचे भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने हे पाऊल आहे. पुढील काळातील आमच्या योजनाबद्ध कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी उद्या शुक्रवार दि. १८ जुलै २०२५ रोजी होणाऱ्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हा. असे आवाहन आजरा बांबू क्लस्टर फाऊंडेशन यांनी केले आहे.

मुल्य वर्धन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी बांबू लागवड कार्यशाळा… काळाची गरज

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.