Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठपुराव्याला यश.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठपुराव्याला यश.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठपुराव्याला यश.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शहरात सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना एक वर्षांपूर्वी चालू करण्यात आला होता.

पण या दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध नव्हते यामुळे रुग्णांना सेवा मिळत नव्हती शिवसेनेच्या वतीने अनेक वेळा निवेदन देऊन सतत पाठपुरावा केला यामुळे या दवाखान्यात काही दिवसापूर्वी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आज त्या डॉक्टर मुबशीरा मॅमेल (MBBS) यांचा शिवसेनेच्या वतीने शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पवार यांनी सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेल्या या दवाखान्यात गोरगरीब रुग्णांना चांगली सेवा मिळावी अशी सूचना करण्यात आली यावेळी आरोग्य विभागाचे आरोग्य विस्तार अधिकारी काटकर , कौस्तुभ पाटील,स्वप्निल कोगेकर अधिपरिचारक, शाहीर मालदार एम पी डब्ल्यू याचबरोबर शिवसेनेचे देऊळवाडी ग्रामपंचायत उपसरपंच संजय सावंत युवा सेनेचे उपतालुका प्रमुख सुयश पाटील,महादेव गुरव विजय डोंगरे,सदानंद कदम हजर होते या दवाखान्यात खालील टेस्ट होतात लिव्हर टेस्ट,किडनी टेस्ट,कोलेस्ट्रॉल हिमोग्लोबिन टेस्ट,शुगर इत्यादी टेस्ट होतात याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.