Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रवसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यास एन सी डी सी अधिकारी यांची भेट.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यास एन सी डी सी अधिकारी यांची भेट.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यास एन सी डी सी अधिकारी यांची भेट.

आजरा.- प्रतिनिधी.


वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यास मार्च २०२५ मध्ये एन सी डी सी मार्फत १२२ कोटी ६८ लाख इतके दिर्घ मुदतीचे कर्ज मंजूर होवून मिळाले आहे. सदर कर्जाचा विनियोग तसेच उपयोगिता प्रमाणपत्र तपासणी कामी आज एन सी डी सी मुख्य कार्यालयाचे डेप्युटी डायरेक्टर श्री. आशुतोष शुक्ला व असिस्टंट डायरेक्टर श्री. मोहम्मद फइजल यांनी कारखाना कार्यस्थळावर प्रत्यक्ष भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी कारखान्याने कर्जाचा विनियोग व नियमांचे काटेकोर पालन करून कर्जावरील व्याजाची नियमित सुरू असलेली परतफेड यांची माहिती घेऊन विशेष समाधान व्यक्त केले. तसेच कारखान्यास अजूनही कोणती कर्जे मिळू शकतात, त्याचे निकष काय आहेत याबाबत माहिती दिली.
यावेळी व्हाईस चेअरमन सुभाष देसाई, जेष्ठ संचालक उदयराज पोवार, अनिल फडके,. रणजीत देसाई, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, चिफ अकौंटंट प्रकाश चव्हाण, डेप्युटी चिफ अकौंटंट रमेश वांगणेकर, कार्यालय अधिक्षक अनिल देसाई व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.