इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत.- आदित्य मिसाळ राज्य गुणवंता यादीत सहावे स्थान प्राप्त.
भुदरगड.- प्रतिनिधी.
सन २०२५ घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत केंद्र शाळा पिंपळगावचा विद्यार्थी कुमार आदित्य दिगंबर मिसाळ याने ३०० पैके २८६ गुण मिळवून राज्य गुणवंता यादीत सहावे स्थान प्राप्त करत धवल यश मिळवले
.
आदित्य हा आजरा तालुक्यातील बेलेवाडी हुबळगी या गावचा रहिवाशी असून लहानपणापासून वाचनाची आवड असणाऱ्या आदित्य याने कोणतीही खाजगी शिकवणी न लावता मिळवलेल्या या यशाबद्दल उत्तूर पंचकृषितून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

मोठे होऊन आयएएस होऊन प्रशासकीय सेवेत जावून देश सेवा करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. त्याला वर्ग शिक्षक मधुकर भाटले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
