Homeकोंकण - ठाणेस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत उडणार? -...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत उडणार? – निवडणुका तीन टप्प्यात होण्याची शक्यता.. अधिक पहा..👇

🟥स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत उडणार? – निवडणुका तीन टप्प्यात होण्याची शक्यता.. अधिक पहा..👇

मुंबई :- प्रतिनिधी.

स्थानिक स्वराज्य संस्थातंर्गत महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. कार्यकर्ते, पुढारी, नेते, नगरसेवकांचा गेल्या पाच वर्षांचा वनवास आता संपणार आहे. आता शहराशहरात आणि गावागावात चैतन्य संचारणार आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगर पालिका, महापालिकांमध्ये निवडणुकीचे वारे घुमू लागले आहे. त्यातच पालिका निवडणुका तीन टप्प्यात घेण्याची शक्यता समोर येत आहे. 1 जुलै पर्यंतची मतदार यादी वापरावी असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निर्देश दिले आहेत. विधानसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकांमध्ये मतदारांची संख्या वाढेल असा अंदाज आहे. प्राथमिक तयारीसंदर्भात राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी यांच्यातील बैठक पार पडली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तीन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. येत्या ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत पालिका निवडणुकीचा बार उडणार असल्याचे समजते. त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी हा सुगीचा हंगाम ठरेल. या सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी आयोगाला 6.5 लाख ईव्हीएमची गरज आहे. अपुऱ्या ईव्हीएम संख्येमुळे एकाच टप्प्यात मतदान घेणे अशक्य आहे. ईव्हीएमची संख्या कमी असल्याने आयोग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन टप्प्यात घेण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील २९ महानगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, ३४९ पंचायत समित्या आणि इतर मिळून एकूण ६७६ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत.

या सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी आयोगाला सुमारे साडेसहा लाख ईव्हीएमची आवश्यकता आहे. मात्र, अपुऱ्या ईव्हीएम संख्येमुळे आयोगासमोर एकाच टप्प्यात मतदान घेणे हे एक मोठे आव्हान आहे. यावर तोडगा म्हणून, आयोगाने निवडणुका तीन टप्प्यांत विभागण्याची योजना आखली आहे. या संभाव्य वेळापत्रकानुसार, पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर महिन्यात पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होऊ शकतात. त्यानंतर, नोव्हेंबर महिन्यात जिल्हा परिषदांसाठी मतदान घेतले जाईल, आणि शेवटच्या व सर्वात मोठ्या टप्प्यात, डिसेंबर महिन्यात सर्व महानगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका पार पडतील. या निवडणुकांच्या तयारीला आता वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने ११ जुलै रोजी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसोबत बैठक घेतली आहे. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नुकतीच या संदर्भात एक आढावा बैठक घेतली. सर्वोच्च न्यायालयानेही प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत, त्यामुळे आता लवकरच निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.