Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रव्यंकटराव हायस्कूल या प्रशालेत गुणवंत-यशवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळा संपन्न.

व्यंकटराव हायस्कूल या प्रशालेत गुणवंत-यशवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळा संपन्न.

व्यंकटराव हायस्कूल या प्रशालेत गुणवंत-यशवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळा संपन्न.

आजरा .- प्रतिनिधी.

एस.एस.सी.फेब्रु – मार्च २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व्यंकटराव हायस्कूल येथे संपन्न झाला. कार्यक्रमासाठी उपस्थित आजरा महाल शिक्षण मंडळाचे पदाधिकारी,पालक,दाते, हितचिंतक, यांचे स्वागत नूतन मुख्याध्यापक श्री एम एम नागुर्डेकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा महाल शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ संचालक कृष्णा पटेकर होते. शाळेच्या भौतिक सुविधा आम्ही पुरवल्या आहेत मात्र गुणात्मक विकासाकडे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे तसेच पुढील शिक्षणासाठी नवीन शैक्षणिक करिअरच्या वाटा शोधाव्या लागतील १९३२ पासून स्थापन झालेल्या या आजरा तालुक्याच्या खेडोपाड्यातील बहुजन समाजातील विद्यार्थी घडविणाऱ्या आपल्या व्यंकटराव शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व गुणात्मक विकास करणे हेच खरे ध्येय आहे मात्र स्पर्धा कुणाशीही नाही असेही ते म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे भरभरून असे कौतुक केले.
संचालक सचिन शिंपी यांनीही आपल्या मनोगतात सांगितले की, शाळेतील विद्यार्थ्यांनी नेहमी आपल्या पुढील वर्गातील विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केले आहे त्यापेक्षा पुढे जाऊन आपण शाळेच्या नावलौकिकात भर घालण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे.

संस्थेचे सचिव अभिषेक शिंपी यांनीही आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना एकाच छताखाली पहिलीपासून पदवीपर्यंतचे उच्चतम व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आपण नेहमी कटिबद्ध आहोत त्या दृष्टीनेच अकॅडमी सुरू केल्याचे सांगितले. तसेच इथून पुढच्या काळात विद्यार्थ्यांना व अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनाही आणखीन प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांचा सन्मान व सत्कार वेगवेगळी पारितोषिके देऊन सन्मान केला जाईल असे सांगितले.

दाते व माजी शिक्षक श्री एस जी इंजल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शाळेत पहिले पाच आलेले विद्यार्थी प्रथम पेडणेकर प्रणव बाळकृष्ण, द्वितीय.. पाटील प्रथमेश विजय, प्रभू गौरव तुकाराम, तृतीय.. गिलबिले आसावरी अशोक, चतुर्थ.. कविटकर शार्दुल लक्ष्मण, पाचव…. होरटे दिव्या परशुराम, सासुलकर प्राची धनाजी, पोवार वैष्णवी सदानंद. याबरोबर आजरा तालुक्यातून केंद्रात मृणाली संदीप तेजम (रोझरी हायस्कूल),प्रथम आलेली विद्यार्थिनी, कस्तुरी तुरंबेकर (भादवण हायस्कूल भादवण) संस्थेच्या तिन्ही शाखेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनींचे पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले. तसेच प्रत्येक विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा गौरव करण्यात आला. सन २००४/२००५ सालच्या माजी विद्यार्थी डॉक्टर रोहन जाधव व सुयोग जाधव यांनी आपल्या बॅच कडून शाळेला वह्याची भेट दिली.

तसेच इयत्ता दहावी, एमटीएस व स्कॉलरशिप मार्गदर्शक शिक्षक यांचाही सत्कार करण्यात आला.

प्रस्ताविकामध्ये प्राचार्य एम एम नागुर्डेकर यांनी एसएससी परीक्षेतील या गुणवंत विद्यार्थ्यांच्या निकालाचे वाचन केले. बक्षीस वाचन व दात्यांचा नामोल्लेख सौ ए एस गुरव यांनी केले. या कार्यक्रमंसाठी संस्थेचे खजिनदार सुनील पाटील, संचालक पांडुरंग जाधव, सुधीर जाधव, विलास पाटील, भादवण हायस्कूलचे मुख्याध्यापक आर.जी कुंभार, राज्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक जी.बी ढेकळे, एस जी इंजल, डॉ. रोहन जाधव, सुयोग जाधव, दाते व पालक उपस्थित होते. पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे.शेलार व संस्कृत अध्यापिका सौ एस डी .ईलगे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.एन. पाटील व आभार एस.के कुंभार यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.