होमियोपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत (MMC) नोंदणी करावी. – आजरा ता. होमिओपॅथिक मेडिसियल असोसिएशनचे तहसीलदार यांना निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालूका होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन ही आजरा तालुक्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांची संघटना आहे. महाराष्ट्रातील होमिओपॅथीक वैद्यकीय व्यवसायिकांच्या हितासाठी झटत आहे. आय. एम. ए. संघटनेचे पदाधिकारी एक वर्षाचा सी. सी. एम. पी. कोर्स पास झालेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची बदनामी करणारी, दिशाभूल करणारी खोटी माहिती मीडिया मधून प्रसारीत करत असून, जनतेची, त्यांच्या सदस्याची व सरकारचीही दिशाभूल करत आहेत. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. महाराष्ट्रातील जनतेला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी ह्या उदात उद्देशाने एम. बी. बी. एस. डॉक्टर्स पोहचू शकत नाहीत किवा जाऊ इच्छीत नाहीत अश्या भागातील नागरिकांना चांगली वैद्यकीय सेवा मिळावी ह्या उद्देशाने विविध संघटना व संस्थानी केलेल्या मागण्या नुसार, विविध शासकीय कमिट्या तयार करून त्याचा सखोल अभ्यास करून, शासकीय समित्यांच्या शिफारशी प्रमाणे, विधीमंडळात विधेयक सादर करून, एम. एम. सी. एक्ट 1965 व एम. सी. एच एक्ट 1960 मध्ये बदल मंजूर करून, 1 जुलै 2014 रोजी मा. राज्यपाल महोदयांच्या सहीने कायद्यात बदल मंजूर करण्यात आले.
त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमानुसार विविध कमिट्यांद्वारे सखोल संशोधन व अभ्यास करून होमिओपॅथीक डॉक्टर्सना मॉडर्न मेडिसिनचा उपचार करण्यासाठी सक्षम वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी “एक वर्षाचा सर्टिफिकेट इन मॉडर्न फार्माकोलॉजी” हा अभ्यासक्रम तयार करून फक्त जेथे एम.बी.बी. एस. विद्यार्थीचे शिक्षण घेतात फक्त त्याच वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षित करण्यात आलेले आहे. फार्माकोलॉजी बरोबरच इतर विषयाचे प्रशिक्षण देऊन त्याची परीक्षा घेवून उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कायद्याप्रमाणे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये वेगळ्या परिशिष्टमध्ये नोंदणीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने कायद्यातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी दि. 30 जुन 2025 रोजी आदेश निर्गमित केला. हा निर्णय सर्वश्री महाराष्ट्रतील जनतेला दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यासाठीच घेण्यात आलेला आहे.
खरेतर मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये बहुतांशी आर. एम. ओ. हे आयुष डॉक्टर्स आहेत तेच डॉक्टर आय. सी. यू. मध्ये 24 तास कार्यरत असतात तेव्हा मात्र हे होमियोपॅथीक डॉक्टर्स सक्षम असतात परंतु
त्याची कायद्यातील तरतुदी प्रमाणे एम. एम. सी. नोंदणी करताना वेगळी भूमिका मांडतात असे दुटप्पी धोरण आय. एम. ए. चे पदाधिकारी करतात कारण पुढील काळात त्याच्या संघटनेच्या निवडणुका होणार आहेत म्हणून हे सर्व त्याच्या सदस्यांची, जनतेची तसेच शासनाची दिशाभूल करत आहेत,

अशी शंका येते. तसेच आयएमए सह काही संघटना कोणताही अभ्यास न करता असत्य व अर्धसत्य माहितीद्वारे प्रसारमाध्यमातून तसेच रुग्णांना वेठीस धरणाऱ्या आंदोलनाची भाषा करत शासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.
तसेच आज पर्यंत आय. एम. ए. या संघटनेने 4 वेळा मुंबई उच्च न्यायालयात व 1 वेळा सर्वोच न्यायालयात याचिका दाखल करून या कोर्सला परवानगी देऊ नये व एम. एम. सी. मध्ये नोंदणी करू नये असे सांगितले परंतु मा. न्यायालयाने आय. एम. ए. या संघटनेला कोणत्याही प्रकारचा अंतरिम स्थगन आदेश आज पर्यंत दिला नाही.

तरी दिशाभूल करणाच्या दबावाला बळी न पडता, कायद्यातील तरतुदीप्रमाणे 9 हजार पेक्षा जास्त सी. सी. एम. पी. पास डॉक्टर्सना महाराष्ट्र वैद्यकीय परीषदेत (MMC) नोंदणी प्रक्रिया राबवावी ही विनंती. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुहास गुरव, उपाध्यक्ष डॉ. सागर पारपोलकर , सेक्रेटरी डॉ. गौरी भोसले, डॉ. अमित बेळगुंदकर – खजिनदार, डॉ. अभिजीत दड्डीकर, डॉ. बी. जी. पाटील, डॉ. दिपक हरमळकर, डॉ. प्रविण निंबाळकर, डॉ. सागर तेऊरवाडकर, डॉ. रोहन जाधव. हेमंत भोसले, डॉ. सुरजीत मोटे, डॉ. भरत मोहिते, डॉ. अमित घुगरे, डॉ. सुहास देसाई,डाॅ. स्मिता कुंभार, डॉ. हिंमत भोसले यांच्या सह्या आहेत.
