आजऱ्यात गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर – आजरा लेझर हॉस्पिटलचे उद्घाटन..
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील आजरा आंबोली रोडवर आजरा लेझर हॉस्पिटल व अत्याधुनिक पद्धतीने उपचार करणारे हॉस्पिटलचे उद्घाटन दि. १० रोजी गुरु पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत यामध्ये जनरल, लेजर, कॉस्मेटिक, स्किन, सर्जरी, फिजिओथेरपी सर्व उपचार मेजर व अत्याधुनिक पद्धतीने उपचार करणारे डॉ. सुजित काशीद, सौ. योगिता काशीद, डॉ. प्रशांत कुंभार आज पासून आजरा येथे सेवेत असणार आहेत.


या आजरा केअर सेंटर हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. या हॉस्पिटलचे उद्घाटक म्हणून सुलगावचे माजी सरपंच व रवळनाथ इंडियन गॅसचे मानसिंग देसाई यांच्या शुभहस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून नंदकुमार देसाई, जितेंद्र भोसले, डॉ कुलदिप देसाई, रणजीत सरदेसाई, विजय थोरवत, सचिन सावरतकर, नितीन कुंभार, एम. आर. पाटील, मारुती चोथे लाभले यावेळी आजरा शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
