Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रवसंतराव देसाई आजरा साखरचे - मिल रोलरचे पुजन संपन्न.

वसंतराव देसाई आजरा साखरचे – मिल रोलरचे पुजन संपन्न.

वसंतराव देसाई आजरा साखरचे –
मिल रोलरचे पुजन संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा साखर कारखान्यात सन २०२५/२६ गळीत हंगामाकरीता ओव्हर होलींगचे काम गतीने सुरू झाले असून कारखान्याचे चेअरमन मुकुंद उर्फ उदयसिंह देसाई यांचे हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत आज मील रोलर पुजनाचा कार्यकम मोठया उत्साहात संपन्न झाला.

या प्रसंगी बोलतांना चेअरमन श्री . देसाई यांनी येत्या सन २०२५/२६ चा गळीत हंगाम माहे ऑक्टोंबर २०२५ मध्ये सुरू करणेच्या दृष्टीने मशिनरी दुरूस्ती व देखभालीची कामे सुरू आहेत. कारखान्याने गळीत हंगाम २०२५/२६ करीता ८२०० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद पुर्ण केली आहे. येत्या गळीत हंगामात ४ लाख मे. टन ऊस गाळपाचे कारखान्याने नियोजन केले आहे.

मिल रोलर पुजन केले आहे. ३० सप्टेंबर २०२५ पुर्वी कारखाना दुरूस्ती व देखभालीची कामे पूर्ण करून कारखाना गळीतासाठी सज्ज ठेवणार आहे.

येणा-या गळीत हंगामासाठी सक्षम ३७५ परजिल्हयातील व स्थानिक तोडणी वाहतुक यंत्रणा उभारली असुन सदर यंत्रणेस पहिल्या अॅडव्हान्सची रक्कम वाटप केली आहे. त्याच प्रमाणे गळीत हंगामासाठी आवश्यक कामकाजाचे नियोजन व्यवस्थापना मार्फत केले जात आहे अशी माहिती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.