Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रव्यावसायिक शिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांच्या हाताला कौशल्य व रोजगार - प्राचार्य डॉ.सादळेअकरावीच्या विद्यार्थ्यांचे...

व्यावसायिक शिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांच्या हाताला कौशल्य व रोजगार – प्राचार्य डॉ.सादळेअकरावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत व गुरुपौर्णिमा साजरी

व्यावसायिक शिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांच्या हाताला कौशल्य व रोजगार – प्राचार्य डॉ.सादळे
अकरावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत व गुरुपौर्णिमा साजरी

आजरा : – प्रतिनिधी.

विद्यार्थ्यांच्या हाताला कौशल्य व रोजगार मिळवून देण्याचे काम आजरा महाविलयातील व्यावसायिक शिक्षण विभागाने आजपर्यंत केले आहे. यांचीही काम निश्चितच कौतुकास्पद आहे असे स्पष्ट प्रतिपादन प्राचार्य प्रो.डाॅ.अशोक सादळे यांनी केले. ते व्यावसायिक शिक्षण विभागाकडील अकरावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत व गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजीत कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात व्यवसायिक शिक्षण विभागाकडे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पेढा भरवून, फुल व पेन देऊन स्वागत करण्यात आले. स्वागत प्रांजल पोवार या विद्यार्थिनींने केले. प्रास्ताविकात व्यावसायिक शिक्षण विभागाचा आढावा पर्यवेक्षक मनोजकुमार पाटील यांनी सांगितला. तंत्रज्ञानाच्या युगात आज विद्यार्थीच शिक्षकांचे गुरु बनले आहेत.

या तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग करावा असे आवाहन उपप्राचार्य दिलीप संकपाळ यांनी केले. कोरोनानंतर कौशल्य मिळवून हाताला काम मिळण्यासाठी व्यावसायिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपले व्यक्तिमत्व वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार व रोजगार मिळवून देण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक आपल्या सोबत असतील असेही प्राचार्य प्रो. डॉ. अशोक सादळे यांनी सांगितले. गौरी बागडी, ओंकार नवलकर, संस्कार आपके, प्रणव कांबळे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर संदीप देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले.

कार्यक्रमास नेहा पेडणेकर, सदाशिव मोरे, संदीप देसाई गिरीश कुरुणकर, सुषमा पारकर, तेजस्वीनी जाधव – शेवाळे, पल्लवी नार्वेकर,शिवाजी कांबळे, रविंद्र मस्कर,महादेव मुंडे यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन सानिका सुतार तर आभार रिया कांबळे या विद्यार्थिनीने मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.