🛑छत्रपती शाहू महाराजयांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव निमित्त.- रक्तदान शिबीरामध्ये रक्तदात्यांचा आजऱ्यात उस्फूर्तपणे सहभाग.
🛑आजरा पोळगाव रस्त्यावरील मंजीरीत वीज पोल काढल्याने पथदिव्यांचा अभाव.,- नवीन पोल व पथदिवे व्यवस्था करा.
🛑 आजऱ्यातील डॉक्टरांचे तसीदारांना निवेदन.
🛑छत्रपती शाहू महाराजयांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव निमित्त.- रक्तदान शिबीरामध्ये रक्तदात्यांचा उस्फूर्तपणे सहभाग.
आजरा.- प्रतिनिधी.
भारताच्या इतिहासातील अब्दीतीय व्यक्तीमत्व व कोल्हापूरकरांचा मानबिंदू असलेले आदर्श राजे, पुरोगामी विचारांचे महान समाज सुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव २०२४ ची सांगता सन २०२५ मध्ये करण्यात येणार आहे. दि. २६/६/२०२५ ते १०/७/२०२५ रोजी पर्यंत राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती पंधरवडा आयोजीत करणे आहे.
सदर सप्ताहमध्ये संबंधीत विभागांनी जिल्हा / तालुका स्तरावर नमूद केलेले कार्यक्रम नियोजन पुर्वक आयोजीत करावेत असे जिल्हा अधिकारीसो जिल्हा अधिकारी कोल्हापूर यांनी दि. २४/६/२०२५ रोजीच्या पत्राने कळविले आहे. त्यास अनुसरुन आरोग्य विभाग पंचायत समिती आजरा यांच्या वतीने आजरा तालुक्यातील सर्व शासकिय कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र तसेच तरुण मंडळे व रक्तदान करणारे इच्छुक नागरीक यांना रक्तदान करणे बाबत आवाहन करण्यात आले होते.
त्यास अनुसरुन आज दि. ९/७/२०२५ रोजी ग्रामिण रुग्णालय आजरा येथे रक्तदान शिवीर आयोजीत करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबीराचे उदघाटन आजरा तहसीलदार समिर माने यांचे हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी डॉ. अमोल पाटील वैदयकिय अधिक्षक ग्रामिण रुग्णालय आजरा, डॉ. आर. जी. गुरव तालुका आरोग्य अधिकारी पं.स. आजरा तसेच विजय थोरवत, इंद्रजित देसाई तसेच आज-यातील प्रतिष्ठीत नागरीक व तालुक्यातील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
तहसीलदार श्री माने यांनी स्वतः रक्तदान करुन जनतेसमोर रक्तदान करण्याबाबत आवाहन केले, डॉ. अमोल पाटील वैदयकिय अधिक्षक ग्रामिण रुग्णालय आजरा यांनी आज रक्तदान करुन त्यांनी आज अखेर ३३ वेळा रक्तदान केल्याचे सांगीतले.
रक्तदान शिबीरामध्ये सर्व तरुण मंडळे, इच्छूक नागरीक, आरोग्य कर्मचारी यांनी रक्तदान शिबीरामध्ये भाग घेवून ४४ रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे. त्यामध्ये आरोग्य विभाग – २७, शिक्षक-३, ग्रामपंचायत सदस्य-२, आजरा अर्बन बँक-५, तहसिल कार्यालय-१, पंचायत समिती-३, ग्रामसेवक-१ व इतर-२ इ. रक्तदान करुन राजर्षी छत्रपती शाहू महाराजयांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव २०२४-२५ मध्ये सहभाग घेवून रक्तदान शिबीरामध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेवून रक्तदान शिबीर पार पाडले. यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
🛑आजरा पोळगाव रस्त्यावरील मंजीरीत वीज पोल काढल्याने पथदिव्यांचा अभाव.,- नवीन पोल व पथदिवे व्यवस्था करा.
आजरा.- प्रतिनिधी

आजरा पोळगाव रस्त्यावरील मंजीरी परिसरात नवीन रस्त्याचे व गटार बांधकामाचे काम झाले असून या कामादरम्यान पूर्वी अस्तित्वात असलेले वीज पोल काढण्यात आले आहेत. परंतु सदर ठिकाणी अद्याप नवीन पोल बसविण्यात आलेले नाहीत.
त्यामुळे सायंकाळी व रात्रीच्या वेळेस संपूर्ण परिसर अंधारात झाकोळला जात असून त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
म्हणून मंजिरी भागात तातडीने नवीन वीज पोल बसवून त्यावर कार्यरत पथदिवे लावण्यात यावेत, जेणेकरुन परिसर प्रकाशमान राहील, वाहतुक सुरळीत होईल आणि नागरिकांना सुरक्षिततेची हमी मिळेल.
सदर निवेदनाची गांभिर्याने दखल घेऊन त्वरीत कार्यवाही करावी ही नम्र अपेक्षा. आशा आशयाचे निवेदन अन्याय निवारण समितीने दिले आहे. यावेळी समिती अध्यक्ष परशुराम बामणे, सह. समीतीचे सुधीर कुंभार, वाय बी. चव्हाण, दिनकर जाधव,पाडुरंग सावरतकर,जावेद पठान, मदन तानवडे , गौरव देशपांडे, जोतिबा आजगेकर, अशीक गाडे उपस्थित होते.
🛑 आजऱ्यातील डॉक्टरांचे तहसीलदार यांना निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.

महाराष्ट्र मेडिकल कोन्सील (MMC) ही अलोपया डिग्री प्राप्त असणाऱ्या डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन करणारी व नियंत्रण करणारी संस्था आहे. होमीओपॅथी व आयुर्वेद या वेगळ्या रुग्ण चिकित्सा पध्दती असून त्यांची औषध योजना उपचार पध्दती अॅलोपॅथीपेसा वेगळ्या आहेत. या शाखांमधील डॉक्टरांना त्यांच्या त्यांच्या पॅथीप्रमाणि रजिस्ट्रेशन करण्या साठी होमीयो पॅथीक मेडिकल कौन्सील व आयुर्वेदिन मेडिकल कौन्सील या वेगळ्या संस्था आहेत.
याप्रमाणे सुरु असणा-या पध्दतीचा IMA ने कधीही विरोध केलेला नाही.
असे असताना होमीयोपैथी शिकलेल्या डॉक्टरांना अॅलोपॅथील औषधे वाफ्ला यावीत म्हणून ‘महाराष्ट्र शासनाने सारीक्रिकेट कोर्स ऑफ मॉडकिमिलोजी हा एक वषर्षाचा कोर्स (CCMP) होमीनोपय च्या डॉक्टरांसाठी सुरु केला आहे.
वास्तीक अखोपॅथी मधील फार्मको हॉजी हा विषय विडवर्षे मरीकवला आतो व संपूर्ण अभ्यासक्रमात त्याचा मेडिसीन सर्जरी गायनॅकडॉजी या विषयां बरोबर संदर्भ येत राहातो असे असताना आठवडयातून दोन तीन विकास कार्यकॉलॉजी शिकवून होमीओपॅथी डॉक्टरांना MMC ने 30/6/25 च्या MMC/CCMP/Reg/2025/03866 या नोटिफीकेशन दारे MMC चे रजिस्ट्रेशन देण्याचे ठरविले आहे.
ही गोष्ट सारेपाच वर्षे अॅलोपॅथीचे शिसम घेतलेल्या व त्या पुढील उच्च शिक्षण घेतलेल्या डॉक्टरीवर अन्याय करणारी आहे त्यामुळे MMC ने घेतलेला हा निर्णय शासनाने रद्द करावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील IMA शाखीच्या वृत्तीने मा. मुख्यमंत्री महाराष्ट्रराज्य यांना निवेदन देण्यात येत आहेत, याचा विचार होऊन सदर नोटिफीकेशन रहून झाल्यास IMA तीव्र रोहनाच्या तयारीत आहे. आजरा IMA बैंच तर्फ सदर निवेदन आनयाचे जायन तहसीलदार मा. म्हाळसाकीत देसाईसो यांना देण्यात अलि. या वेळी IMA चे प्रेसिडेट डॉ दीपक सातोसकर व्हा प्रेसिडेंट डॉ रविंद्र गुख सेक्रेटरी डॉ अनिल देशपांडे, देसरर डॉ कुरुदीपदेसाई, डॉ अनिके मगदूम आदी उपस्थित होते,